Skip to main content

सासु...एक पुसटसं व्यक्तिमत्व

लेखक अश्विनि कोल्हे यांनी मंगळवार, 14/04/2015 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत बर्याच कविंनी, आई,बहीण,पत्नी,मुलगी या सर्वांवर अनन्य साधारण कविता रचल्या आहेत पण सासुवर कधी कोणी कविता रचलीय? कि नुसत्या नावानेच तुमची हिंम्मत खचलीय? अरे,असतील तुम्हाला खर्या भावना तर रचवा सासुवर कविता आणि समजू द्या या जगाला सासुच्याही मनातल्या यातना. आजपर्यंत सासुची प्रतिमा नेहमी सुनेला छळणारी म्हणुनच केली गेलीय पण कधी तिलाही सुनेने छळले असेल याची कल्पना तरी कोणी केलीय? प्रत्येक सासु सुद्धा कधी एक सुन असते तिलादेखील भावना असतात,मन असते तिचे मन जाणुन घेण्याचा प्रयत्न केला तर,कळेल की तिनेही किती सहन केलंय. तिलाही तिच्या सासुने छळलेलं असतं तिच्याही इच्छा मारल्या गेलेल्या असतात. संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेली ती तिच्याही आकांक्षा चिरडल्या गेल्या असतात. जेव्हा हीच सुन आता होणार असते सासु तेव्हा हळुच तिच्या चेहर्यावर उमलतं हसु ठरवते ती मनातल्या मनात स्वःताशीच की, मी माञ होइल एक चांगली सासु. तिनेही तिचा संसार फुलवलेला असतो तिनेही सासरची मनं सांभाळलेली असतात तिचाही कोणी आदर करावा, प्रेम करावं अशीच स्वप्न उराशी बाळगलेली असतात. तिचे हे स्वप्न समजुन घेण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही तिच्याही आपल्याप्रति अपेक्षा असतील याचा काडीमाञ ही विचार करत नाही. सुनेने आपली सेवा करावी,सुख द्यावं असेच तिला नेहमी वाटत असतं इतकेच नव्हे तर या समाजात फक्त आपल्याच सुनेचं कौतुक व्हावं असंही प्रत्येक सासुला वाटत असतं. पुर्वीची सासु "बोलकी" होती पण स्वभावाने नव्हती मनमोकळी कारण तेव्हा सासु-सुनेच्या वयात होती एक असाधारण पोकळी. आजची सासु पुर्वीसारखी राहीली नाहीय ती आता सुनेशी मैञी करायला लागलीय वाटुन घेतेय सुनांसोबत स्वःताचे सुखदुःख त्यांच्याही भावनांचा विचार करायला लागलीय. आपणही एक पाऊल पुढे जाऊया आपल्या पुढे आलेला तिचा हात कायमचा आपल्या हातात घेऊया करुया कधीतरी तिच्याही मनाजोगं तिच्या नाजुक मनाला अलगद जपुया.
लेखनविषय:

वाचने 32695
प्रतिक्रिया 85

प्रतिक्रिया

हत्ती असाच चालत राहूद्या, भुंकणार्‍यांची पर्वा न करता. आता सासरे, अजेसासरे, अजेसासुबाई, दिर, भावजय, नणंद, जावई, साडु, सवती- सवती, सवते- सवते, यांच्या भावनांना वाट मोकळी करुन देणारी अशी एक काव्य माला होउन जाउदे असे नम्रपणे सुचवू इच्छीतो. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

त्याचबरोबर गल्ली आणि दिल्लीतल्या काऊ-माऊ-चिऊ,भुब्बू,घोदा,दुक्कर,बगला वगैरेवर कविता बरसूद्यात.

सासूप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र. अतिशय सहज सुंदर कविता. सासूची बाजू घेणारी कविता येईल असं आमच्या मनीही नव्हतं. अजूनही अशाच काही हृदयाचा ठाव घेणाऱ्या कविता येऊ दया.

In reply to by प्रचेतस

आगोबाच्या निर् मळ मणानी दिलेल्या या प्रतिसादाशी मी ही तितुक्याच निर् मळ मणाणे सहमत आहे.

In reply to by प्रचेतस

>>>> सासूची बाजू घेणारी कविता येईल असं आमच्या मनीही नव्हतं. सासु आणि सुनबै यांचं अतिशय प्राचीन आणि गुंतागुंतीचं असं नातं आहे. वल्ली, एखाद्या शिल्पकलेत यांची कुठे शिल्प दिसलीत का तुम्हाला ? भग्वदगीतेत भगवंतांनी अर्जुनाला मार्गदर्शन करण्याऐवजी एखाद्या सासु-सुनेच्या समुहाला मार्गदर्शन केलं असतं तर...अनेक प्रश्न सुटले असते, असं मला वाटतं. मन की बाते : प्रा.डॉ. आजचा सुटीचा दिवस सासु-सुनेतच जाईल असं वाटतं. :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सासू - सून नै पण सासू आणि जावई अशी शिल्पे पाहिली आहेत मी बरीच.

काही यमके खुप आवडली कविता-यातना, हसु-सासु, मनमो़कळी-पोकळी, जाउया-घेउया अभिनंदन..

In reply to by होबासराव

मग आम्ही तर दुसरं काय म्हणतो ? हवे तर हे पहा http://www.misalpav.com/node/21458

त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र पाहिजे तितके घ्या आणि वापरा, फुकट आहेत.

अरे,असतील तुम्हाला खर्या भावना तर रचवा सासुवर कविता
रचवा हा शब्द लै म्हन्जे लैच आवडल्या गेला आहे. =)) काय एकेक भारी शब्द शोधून काढतात राव लोक! कम्माल आहे नुसती.

सासू =सारख्या सूचना सुना =सूचना को अखिल मिपा भावी-आजी-माजी(पाजी)हाजी-राजी-ताजी सास्वांच्या सामसूमजावई संघातर्फे सासूंच्या लेकी हितार्थ प्रसारीत.

In reply to by नाखु

मिपावरच्या एका प्रसिद्ध सासुबैंच्या प्रतिसादाच्या परतिकशेत.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यांची बालीका सुन्बै पण फिरकली नैयै बरेच दिवस...कै माहीत आलीपण असेल दुसर्या रुपात ;)

In reply to by मनीषा

म्हणजेच तुम्ही डायरेक पर्तिसाद वाचलेत ! त्याशिवाय का डोळे भरून येणारेत?

In reply to by खेडूत

नाही हो ... नाही वाचले प्रतिसाद . नुस्ता लेखाचा मथळा वाचला .. (हेडींग .. हेडींग) .... आणि असं झालं .. :( :))

यावेळी माञ आम्हाला अहंकार रुपी ठसका बसला नाही. कारण आपल्या लेखनातील आशय आम्ही समजुन घेतला आहे!

कविता मुक्तछंदात असली तरी तिलाही एक ताल हवा असे वाटले. बाकी, तुम्ही लिहित राहा. एकाच दिवसात सर्व कविता टाकु नका. कुठे तरी कोणाच्या तरी कवितेचं कौतुक करा. प्रतिसादही लिहा. बाकी, अजून चांगला विषय येऊ देत कवितेत. दाद आतुन आली पाहिजे. दत्ता हलसगीकर यांच्या चार ओळी... कविता रस्त्यांच्या येतात कुठुन हे रस्ते जातात कोणत्या गावा. भेटतात कोठे रस्ते अन त्यांचा कुठे दुरावा ? रस्त्यांना रस्त्याचीही असते का ओळख सांगा ? का रस्त्यांच्याही मनातुन चालतो दिशांचा दंगा ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाव्वा.किती सांभाळून घेतात ना प्राडॉ नव्या लोकांना. अशेच आस्ते सपोर्टीव, स्पोर्टीव्ह आम्चेही गुरजी। आमीबी शाने झालो अस्तो वदले यसवायजी।

In reply to by यसवायजी

@ आमीबी शाने झालो अस्तो वदले यसवायजी।>> ह्ह़ा ह्ह़ा ह्हा! SYG! :-D

जबरदस्त. सासुविषयी एवढा चांगला विचार करणारे लोक हल्ली विरळेचं असतात. एक विनंती आहे, एक कवी किंवा कवियत्रीचं फक्त आपल्या कवितांना सुरेल चाल लावु शकते. तुम्हीही तसा प्रयत्न करा नं. चाल लावुन, स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड करुन इथे शेअर करा. मिपाकरांना कविता वाचण्यापेक्षा सुरेल आवाजात ऐकायला आवडतात असं निरि़क्षण आहे. शिवाय तिथल्या तिथे कवितेचे शब्दही वाचायला मिळाल्यावर कवितेचा परिणाम अजुन गहिरा होईल असं वाटतं. आपलं मत जरुर कळवा. रेकॉर्डिंग आणि एंबेड साठी मदत लागल्यास इथेचं एक गद्य धागा काढा लोकं मदत नक्की करतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कॅप्ट्न, त्यो संदिप खरे का कोन हाय , तेला जमल काय चाल लावायला हितं?

In reply to by पॉइंट ब्लँक

दमलेल्या सासूची कहानी 'दमलेल्या...'ची चाल जगातल्या कुठल्याही गद्याला लागू शकते. तस्मात वरील कवितेस ती चाल लावून बघा.

In reply to by पॉइंट ब्लँक

@नाखु काका आणि @पॉईंट ब्लँक मी शिर्यसली सांगत होतो. माझ्या प्रतिसादामधे शप्पथ सांगतो एकही शब्द खवचटपणाचा नव्हता. :( तुम्हीचं सांगा तुम्हाला कविता वाचायला आवडेल का नीट चाल लावलेली ऐकायला आवडेल? आता कवियत्री तैंनी वाचलं तर परत त्या हत्ती आणि कुत्र्यावर घसरणार. परत वाद विवाद होणार. :(

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मी शिर्यसली सांगतोय वर्षानू वर्षे सासवांचे दमन झाल्येय आत्ता कुठं त्याला वाचा फोड्ली जातेय !

पुर्वीची सासु "बोलकी" होती पण स्वभावाने नव्हती मनमोकळी कारण तेव्हा सासु-सुनेच्या वयात होती एक असाधारण पोकळी.
आजकालची सून आहे मोकळी ढाकळी सासू चालू ठेवते सतत टकळी फूल ना फुलाची पाकळी रेल्वेत कधी ओढू नका साखळी

सासूच्या कोवळ्या, निरागस भावना मांडणारं काव्य आवडलं. तुमच्या सारख्या कवयि'ञी' आहेत म्हणून आम्ही मिपावर येतो.

In reply to by स्पा

स्पा, असं अर्धवट लिवून गोंधळ नई घालायचा. कुणी कशाला आवरायचे ते सपष्ट करणे. ;)

In reply to by जेपी

खालील शिर्षके राखीव आहेत. "सासरा -एक तुरगट व्यक्तिमत्व " "नणंद -एक खुस्पट व्यक्तिमत्व " "जाऊ -एक जळकट व्यक्तिमत्व " "दीर थोरला -एक कळकट व्यक्तिमत्व " "दीर धाकला -एक पोरकट व्यक्तिमत्व " "नवरा -एक मेंगळट व्यक्तिमत्व " अखिल मिपामापंकाढे मंडळ संचालीत दिसेल तिथे आरक्षण ! खड्ड्यात गेले संरक्षण !! समिती तर्फे नवजिल्बीकर हितार्थ प्रसारीत

In reply to by वेल्लाभट

प्रेरणास्थान एकता कपूर अन स्मृती इराणी असाव्यात काय?

सासु...एक पुसटसं व्यक्तिमत्व
ह्या शिर्षकाच्या निमित्ताने इथुन गायबलेल्या आणि सर्वांची प्रेमाsssSsssSSने
विचारपुस करणार्‍या, हातात हात घालणार्‍या, गवतात फिरायला जाणार्‍या, हातात हात धरुन पुसु शकणार्‍या
एका महान, एपिक कवियत्रीची आठवण झाली.

सून एक निसटतं व्यक्तिमत्व सासरा एक सपकसं व्यक्तिमत्व नणंद एक कुजकसं व्यक्तिमत्व जाऊ एक येडपटसं व्यक्तिमत्व ही डोमेन अव्हेलेबल आहेत.काव्यसंधीचा लाभ घ्यावा हि विणंती.

In reply to by अजया

कशाला ओ कशाला? आधीच दोन गद्य कवितांनी इथं वादळं उठलेत. कशाला उचकवताय त्यांना?

In reply to by स्पंदना

हे सासूच्या दृष्टीने झालं, सासरा कदाचित 'विहीण एक मैत्रीण' असं म्हणण्याची शक्यता नाकारता येत नाही. ;)

In reply to by सूड

दुसर्‍या दिवशी सासरेबुवा: एक आठवण किंवा सासरेबुवा: एक पुण्यस्मरण वगैरे पण कविता पाडायला लागतील मग. ;)

In reply to by सूड

आज हमारे दिलमें अजब ये उलझन है; गाने बैठे गाना, सामने समधन है! हम कुछ आज सुनाये, ये उनका भी मन है; गाने बैठे गाना, सामने समधन है! -एकालग्नाचीअखंडडीव्हीडी ऊर्फ हमाप्केहैकौन.

In reply to by अजया

सासू एक अवजड व्यक्तिमत्व सासरा एक सज्जड व्यक्तिमत्व मेव्हणा एक डोईजड व्यक्तिमत्व मेव्हणी एक भानगड व्यक्तिमत्व साडू एक बोजड व्यक्तिमत्व हे सुद्धा विषय विचारात घेता येतील.

_^_ धन्य आहात तुम्ही , आमच्या सारख्या भावी सुनांना तुमचा हां प्रेरणादायी लेख / कविता मैलाचा दगड ठरणार आहे याची णोंद घ्यावी , ए व्हड़े बोलून मी माझे ५० शब्द संपवते जय महाराष्ट्र

छान गं आशुताई ! तू लिहित रहा हळुहळु सफाई येइल लेखनात ! टवाळ मिपाकराङ्कडे दुर्लक्ष करणे हेच उत्तम !