ऋतु आला ऋतु गेला
लेखनविषय:
शिरशिर गारव्याचा
ऋतु आला ऋतु गेला
पानगळीने सकाळी
सडा पिवळा पडला
सूर छेडिले नभांत
नाद घुमे काळजात
श्वेत मेघांचे हे गाणे
गाती निळ्या अंबरात
हुरहुर काहीलीचा
ऋतु आला ऋतु गेला
शालू हिरव्या पाचूचा
काळ्या आईने नेसला
तुझे पाऊल पडता
अस्सा होता तो देखावा
तुजविना साहवेना
आज पुन्हा तो चांदवा
- संध्या
डिसें २०११
( पीले पत्तो का मौसम जा चुका है या जावेदसाहेबांच्या मध्यवर्ती कल्पनेवरून हा मुक्त अनुवाद ..)
वाचने
1935
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
( पीले पत्तो का मौसम जा चुका है या जावेदसाहेबांच्या मध्यवर्ती कल्पनेवरून हा मुक्त अनुवाद ..)>>> तभ्भीच मै बोल्या,की ये हमेशा की तरहा...सीधी गहेराइ मे क्युं नहि बोल रहा है? :)
In reply to ( पीले पत्तो का मौसम जा चुका by अत्रुप्त आत्मा
बुवा, आम्ही परतीकशेत आहो. :D
In reply to बुवा, आम्ही परतीकशेत आहो. by यसवायजी
यसवायजी,
आपल्या बोलण्यातुण कै अर्थबोध जाहला नाही. :-\
धन्यवाद!
In reply to यसवायजी, by अत्रुप्त आत्मा
ओह्ह..पूर्वीची कळ राहिली नाही बुवात. :(
In reply to "पीले पत्तो का मौसम" by यसवायजी
कसे पाडु मी विडंबन जेंव्हा अर्थहीन काव्य नाही
पाडिले जरी मी तरी ते तसे अता काही नाही!
In reply to ( पीले पत्तो का मौसम जा चुका by अत्रुप्त आत्मा
हमेशा की तरहा...सीधी गहेराइ मे >>> *smile*
हमारे दुकान मे हर एक मॉडेल की कविता मिलती है !
(कदाचित इथे पोस्ट करतांना अशाच कविता जास्त प्रमाणात झाल्या असतील.)
In reply to हमेशा की तरहा...सीधी गहेराइ by सांजसंध्या
:)
आमच्याकडे सध्या कुणी लक्ष देत नसल्याने आम्ही आता कवितांकडे लक्ष देणार आहोत
- खटखट बोनापार्ट
मस्त रचना..
सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार.
( पीले पत्तो का मौसम जा चुका