गुर्जी
लेखनविषय:
विसरलो नाही मी
तळव्यावरची जांभळी खूण
फोकाचा तो जाड व्यास
गणित म्हणजे काय अजून?
इतिहासाच्या सनावळी
एकाखाली एक शंभर ओळी
खाडाखोड केलीत तर
जाळ काढेन कानाखाली
शुद्धलेखन अलंकार
निबंधाचा सॅाल्लिड त्रास
वहीवरती लाल भोपळे
ओणवे रहा एक तास
आम्ल आणि अल्कली
सारी अक्कल बुडाली
शिवाय होती ठरलेली
शिव्यांची लाखोली
पाढे जर चुकलात तर
पायाखाली तुडवीन
कोंबडीचे पाय काढलेत तर
वहाणेने बडवीन
शीत वारे उष्ण वारे
इकडून तिकडे वाहून गेले
आमचे सारे बालपण
त्यांच्या संगे उडून गेले
गुरुजींच्या भितीमुळे
आपसूक शिकत गेलो
फटके खाल्ले थोडेफार
कणखर मात्र बनत गेलो
आयुष्यातले स्थैर्य
पाच आकडी पगार
कुणामुळे मिळाला
हा सुखी संसार?
ब्रॅंडेड शूज घेताना
तुटकी वहाण आठवते
कुणास ठाऊक कशासाठी
पापणी थोड़ी ओलावते....
वाचने
3290
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
कुठेतरी वाचलेली वाटते... पोस्ट केलेलीत का आधी कुठे?
असो.
मस्तच आहे. ग्रेट !
५ सप्टेंबरला कस्कायवर टाकली होती .
मस्त आहे कविता... भावापूर्ण शेवट !
मस्त आहे कविता... भावापूर्ण शेवट !
चितळे मास्तर पद्यात आले
व्वाह व्वा!
गुरुजनांविषयी माझ्याच भावना तुम्ही रचनाबद्ध केल्या आहेत असे वाटले.
आवडली
गुर्जी म्हटल्यावर मी जरा वेगळीच शक्यता वाटलीवती.
पण हे छान लिहीलंय.
धन्यवाद मंडळी!_/\_
ब्रॅंडेड शूज घेताना
तुटकी वहाण आठवते
कुणास ठाऊक कशासाठी
पापणी थोड़ी ओलावते....
अप्रतिम
सुरेख सुरेख!आवडली कविता.
धन्स हो!:)
आज कस्कायवर ही कविता अनेक वेळा आली.
फार छान कविता. आवडली.
समयोचित आणि छान कविता.
सुंदर कविता!!!
मस्तच!
झ्याक....
सुंदर कविता.
छान कविता . पुर्वी अशीच एक वाचलेली "मास्तर , तुम्ही जोडलेले वर्तुळ कुठे आहे ? " या नावाची कविता आठवली . कवी बहुतेक - फ. मुं. शिन्दे .
कुठेतरी वाचलेली वाटते...