मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुखाची परिभाषा - डेसिडेराटा (मॅक्स एह्र्मान)

बहुगुणी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
काही दिवसांपूर्वी The Real Shine या सुखाचं एक रुप सांगणार्‍या मुक्तकाचं मराठी रुपांतर इथे केलं होतं. आज मॅक्स एह्र्मान याच्या Desiderata (desired things) या भक्तिकाव्यावर आधारित सुखाची दुसरी एक व्याख्या सांगणारं तसंच एक मुक्तक इथे देतो आहे. मूळ गद्य-काव्य इथे मिळेल. कोलाहल अन् गर्दी-घाईत सोडू नकोस संथपणा विसरू नकोस तुझं हित शांतता शब्दाविणा शरण कुणा न जाता जमेल तिथे जमेल तसे आदर ठेव सर्वांभूता जपून कर आपलेसे तुझं सत्य जरूर मांड, स्पष्ट पण शांतपणे ऐक मात्र इतरांचंही तेवढा नक्की मान देणे अज्ञानींच्या गोष्टीलाही मनाला जे क्लेश देतील, आक्रमक ते टाळ नेहेमी उजवे-डावे करू नको, उगा कटुता, तू-तू, मी-मी साऱ्याचा आस्वाद घे - तुझं यश, तुझे इरादे, साधं असलं तरी तुझ्या ध्येयाकडे लक्ष ठेव सतत बदलत्या जगामध्ये तेच खरं तुझं वैभव काळजी घे व्यवसायात लबाडीने भरलंय जग गुणीही काही लोक असतात त्यांनादेखील शोधून बघ स्वत्व जप, नाटकी प्रेमाची नको रुजुवात पण प्रेमाची नको हेटाळणी केंव्हा निर्मम, शुष्क वास्तवात प्रेमच आहे खरा ओलावा वयाचा कर स्वीकार आदराने आनंदाने निरोप दे तारुण्याला सामोरा जा समर्थ मनाने अचानक येणाऱ्या दु:खाला कष्ट आणि एकटेपण भीतीला घालतात जन्मासी धाक मनी हवा कशाला कल्पनेतल्या भीतीचा धीराने वाग, पण कठोर होऊ नकोस स्वत:शी वृक्ष-ताऱ्याइतकाच आधिकार तुलाही आहे जगण्याचा विश्व उलगडेलच आपल्या गतीने तुला समजेल न समजेल तरी विश्वास ठेव आपल्या मतीने तुला वाटेल त्या देवावरी काहीही असोत तुझे कष्ट, आकांक्षा मनातील जगीच्या कोलाहलात, हृदयात शांतता पहा फसवणूक, दु:ख, भंगलेली स्वप्ने असतील तरीही हे जग सुंदरच आहे, आनंदी रहा!


वाचन 3184 प्रतिक्रिया 5