मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाव तिथे देव

निनाद जोशी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
काय हो वर्णावा त्या नराचा स्वभाव घेतला ज्याने देव विकत बाजारी चार मोजले रोकडे अन म्हणे आता धाव तुच मला वाचव संकटा पासून तुला मी रे दिले माझ्याकडले हे धन आता सोडव ह्यातुन मजला देवा अरे वेड्या त्याच्या लेखी तू आहेस कंगाल त्याला पाहिजे जो माल तुझ्याकडे नाही संत सांगती सज्जना मनी असुदेत भाव तोच करेल बचाव स्वता: हून

वाचने 1754 वाचनखूण प्रतिक्रिया 3

वेल्लाभट गुरुवार, 03/19/2015 - 16:17
एकदम मस्त..... काही ठिकाणी मीटर थो....डसं बसत नाही असं वाटलं. पण बाकी उत्तम काव्य ! सहीच.