कधीही वाजणारे डी.जे. एक डोकेदुखी.......
आज रविवार असल्याने सहज बाहेर फेरफटका मारायला चाललो होतो.तर अचानक डी.जे. चा कर्णकर्कश आवाज ऐकु आला.विचार केला की आज काही दसरा दिवाळी नाही,ना कुणाची जयंती वा पुण्यतीथी...मग कळाले की कुणाचा तरी मुलाचा पहिला वाढदिवस होता.
खरंच आज काहीही झाले तरी डी.जे. लागतोच का??? ज्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणपती बसवुन गणपती जन्मोत्सव साजरा करायला सांगितला तो उद्देश खरंच सफल झालाय क?? अशा सणांच्या वेळी गणपतीचे गाणे लावण्याऐवजी
चिपकादे फेविकॉलसे" यासारखे गीत वाजवले जाते.डॉ.बाबासहेब आंबेडकर हे एक थोर पुरुष होते.परंतु त्यांच्या जयंतीच्या वेळी असाच डी.जे. वाजवुन त्या तालावार दारु पिऊन नाचतात.या थोर पुरुषांनी नेमकं काय काम केल? याच्याशी या लोकांना काहीही देणं घेणं नसतं.त्यांना फक्त डी.जे.लावायला आणि त्यावर ठेका घ्यायला केवळ एक मुहुर्त पाहिजे असतो.यावर नक्कीच सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे.आणि आपल्या संस्कृतीचे सर्वांनी जतन करावे.
वाचने
10669
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
कधीही निघणारे धागे ...एक डोकेदुखी....
बाकी क्षमस्व
तुमचा अमुल्य वेळ काढुन माझ्यासारख्याच्या लेखाला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद!!!तुमचा शतशः आभारी
सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे.आणि आपल्या संस्कृतीचे सर्वांनी जतन करावे.अगदी तुम्ही व्हा पुढे आम्ही येतोच मागे !!! चिपकादे फेविकॉलसे ह्या अध्यात्मिक भजनावर घसरल्याने लेखकाचा निषेध :) कृ ह घ्या
तुम्हाला जे खटकल ते इथे मांडलत... छान.
साधारणतः आजकाल सार्वजनिक गणपती हे नाच गाण्यासाठीच बसवले जातात. फारच थोडी मंडळे ही समाजप्रबोधन करतात. मग त्यात नाचण्यासाठी 'फेवीकॉल' सारखीच गाणी वाजणार ह्यात विषेश असे काहीच नाही. उलट समाज प्रबोधना ऐवजी कोण किती डिजेच्या भींती लावतो आणि कोण कसे नाचतो यावर आता बक्षिसे द्यावित असे मला वाटते....
गणेशोत्सवात डीजे वाजण्यावर आक्षेप, रात्री १० नंतर डीजे वाजण्यावर आक्षेप, वाढदिवसाला डीजे वाजण्यावर आक्षेप, परीक्षांच्या काळात डीजे वाजण्यावर आक्षेप, डीजे ची ढणाणा वाद्ये विकण्यावर पण आक्षेप, डीजे चालवणा-याने जन्म घेण्यावरच आक्षेप..
आता वाटतंय आक्षेप घेणा-यांवरच आक्षेप घ्यावा की काय अशी परिस्थिति निर्माण झालीय...
बाकी धागा काढ़णा-यावर आक्षेप नाही बर का..
चालू द्यात चर्चा...
In reply to गणेशोत्सवात डीजे वाजण्यावर by सन्दीप१२३३०
तुमचा डीज्जे चा बिजिनेश दिसतोय. :)
In reply to तुमचा डीज्जे चा बिजिनेश by काळा पहाड
माझा डीजे चा बिजनेश असता तर एव्हाना मी धागा काढ़णा-यावर आक्षेप घेण्याचा नगारा वाजविला असता की.. असो.. समज गैरसमज यांची उहापोह होऊ न देता ह्या धाग्यातून समाजविघातक गोष्टींना आळा बसण्यास काही कृत्य होत असेल तर लै झाक होईल.
तो पर्यन्त डीजे चा बिजनेश कसा करावा असा धागा कोणी न काढो म्हणजे मिळविली.
स्वच्छ, पिण्याजोगे पाणी, खेळायला, चालायला, धावायला मोकळी जागा ह्या जशा निरोगी आयुष्य जगण्याकरता आवश्यक गरजा आहेत तशी शांतता हीही आहे. निदान रात्री १० ते पहाटे ६ पर्यंत अशी शांतता मिळायला हवी. नाहीतर अनेक व्याधी उद्भवतात. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ लोकांमधे.
परंतु सामान्यतः भारतीय लोक शांततेविषयी फार आग्रही नसतात. तो हक्कबिक्क असणे तर दूरच. हा दिवसातून पाच वेळा गोंगाट करतो ना मग मी निदान दिवसातून तीन वेळा तरी करणारच. पण अशाने एकंदरीत आठ वेळा असा गोंगाट लोकांच्या कानावर आदळणार ह्याचा विचार नाही.
सार्वजनिक स्थळी थुंकणे आणि सार्वजनिक शांतताभंग हे खरे तर एकाच तोडीचे आणि गंभीर गुन्हे आहेत. पण तसे बघितले जात नाही. सामान्य लोकांनी संघटित होऊन ह्याबद्दल आग्रही आणि आक्रमक बनायला हवे.
हे खरेच खुप त्रासदायक आहे. आजच्या खालील बातमीवरुन त्याची तिव्रता लक्षात येते.
http://www.loksatta.com/thane-news/engineer-arrested-1081733/
In reply to हे खरेच खुप त्रासदायक आहे. by मराठी_माणूस
या माणसाला मदत कशी करता येईल? बाकी एक विशिष्ट समाज म्हणजे 'तो' च का?
In reply to या माणसाला मदत कशी करता येईल? by काळा पहाड
एक विशिष्ट समाज म्हणजे 'तो' च का?जणु काही इतर समाज म्हणजे टपून बसलेले हिंस्त्र श्वापद असून या बातमीत नाव आल्या आल्या तलवारी, बंदुका घेऊन निघणार आहे.. :))) आणि त्या व्यक्तीचे नाव मात्र दिलेय म्हणजे "त्या" समाजातील कोणी उद्या त्याला टपकवला तरी चालेल, नै का ?
शेजारीच एक लग्नाचा हॉल आहे. त्यामुळे रोज रोज डीजे ऐकून अतिशय वैताग आलाय. त्यामुळे ते संस्कृती वगैरे जाऊदे, माझ्या डोक्याच्या शांततेचं जतन करण्यासाठी माझा डीजे या प्रकाराला तीव्र आक्षेप आहे.
In reply to शेजारीच एक लग्नाचा हॉल आहे. by पिशी अबोली
घर घेताना कधीही मॅरेज हॉल शेजारी घेवू नये. सध्याचे लग्न करणारे 'भूमिपुत्र' किंवा 'गुंठामंत्री' प्रकारातले टगे बघता त्यांना दुसर्याला होणारा त्रास वगैरे काही पडलेली नसते.
In reply to घर घेताना कधीही मॅरेज हॉल by काळा पहाड
अगदी अगदी. माझ्या मित्राचं घर एका ओपन-एअर मंगल कार्यालयाच्या शेजारी होतं. तिथे जंगी लग्नं होत असत. जातेगावच्या आनंदरावांनी काय आहेर दिला, वडूजच्या मंगलमावशीकडून काय भेट मिळाली वगैरे सगळं रीतसर ऐकू येत असे.
शेवटी मित्राने घर बदलायचं ठरवलं. पण विकलं जाईना. जेव्हा विकलं गेलं तेव्हा कळलं की मंगल कार्यालयाच्या केटररने विकत घेतलं आहे. आता त्याचे कामगार तिथे रहातात!
१. खरंच आज काहीही झाले तरी डी.जे. लागतोच का???
>> नाही. अंतिम संस्कारांसाठी नाही. पण जगजितसिंगचे 'हे राम.. हे राम' डि.जे.त मोडते का ते माहित नाही.
२. ज्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणपती बसवुन गणपती जन्मोत्सव साजरा करायला सांगितला तो उद्देश खरंच सफल झालाय का??
>> कोणता उद्देश? त्याचा डिजेशी काय समंदं..
३. अशा सणांच्या वेळी गणपतीचे गाणे लावण्याऐवजी "चिपकादे फेविकॉलसे" यासारखे गीत वाजवले जाते.
>> गणपती गाण्याने कान्ठळ्या बसत नाहीत?
४. डॉ.बाबासहेब आंबेडकर हे एक थोर पुरुष होते.परंतु त्यांच्या जयंतीच्या वेळी असाच डी.जे. वाजवुन त्या तालावार दारु पिऊन नाचतात.
>> मग पुण्यतिथीला डि़जे लावून दारू पिऊन नाचावे काय?
५. या थोर पुरुषांनी नेमकं काय काम केल?
>>पब्लिकला बिन्दास दारू पिउन डिजे लावून नाचता यावे अशी सोय केली.
६. यावर नक्कीच सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे.
>> विचार करणारी जनता पब मधे जाऊन नाचते आहे सो ती परत येइपर्यंत थांबूया का?
७. आणि आपल्या संस्कृतीचे सर्वांनी जतन करावे.
>> आपल्याला अभिप्रेत संस्कृती कोणती?
बाकी, संगीत-दारू-नाच-संस्कृती सगळ्या जगात कॉमन आहे. आदिवासींपासून कॉर्पोरेट कल्चरपर्यंत.
जे नाचत असतात त्यांना त्रास होत नाही. जे सामिल नसतात त्यांना त्रास होतो.
आपला तो आनंद व्यक्त करणे, दुसर्याचा तो धिंगाणा घालणे असा विचार करणे थांबवले तर फायदाच होईल.
आपला तो आनंद व्यक्त करणे, दुसर्याचा तो धिंगाणा घालणे असा विचार करणे थांबवले तर फायदाच होईल.
+१ हे अगदी योग्यं आहे.
पण तरीही अतिरेकी आवाजा बद्दल काही करणे खरच जरूरी आहे.
आमच्या पुण्यातील घरासमोरील रस्त्यावरून वाहने जोरजोरात हॉर्न वाजवत जातात दिवस रात्री
तेथे एक शाळा आहे, दवाखाना आहे त्यांना किती त्रास होत असेल् ?
आणि रात्री ते आवाज फारच भयाण वाटतात.
चेतन६७७, पूर्ण सहमत.
सर्व प्रथम नाच आणि गाण्याने त्रास होऊ शकतो याचेच लोकांना आश्चर्य वाटते. दुसऱ्या एका प्रकारात मला त्रास होत नाही म्हणजे दुसऱ्याला पण होऊच शकत नाही अशा वृत्तीचे लोक आहेत. जसे काही सिगारेट ओढनार्यांना वाटत असते. तिसरा प्रकार जगात सगळीकडे हे चालते असा वाटणार्यांचा आहे. सगळ्या जगात नाच गाणे चालते हे ठीक आहे. पण त्याचा त्रास दुसर्याला होतो हा प्रश्न इथे आहे. सर्व आदिवासी राहतात त्या जंगलांमध्ये नेहमीच शांतता असते आणि कधी तरी ते नाचणे गाणे ध्वनी प्रदूषण वाटत नाही. आधुनिक देशांमध्ये घरे साउंड प्रुफ असतात. शेजाऱ्याच्या घरात वाजणाऱ्या डीजे चा त्रास होत नाही. फक्त मागास आणि डेव्हलपिंग देशांमध्येच हा दुसऱ्याला छळण्याचा आनंद घेतला जातो. रोजचे जीवन आधीच प्रचंड धकाधकीचे बनलेय. ट्राफिकजॅम रस्ते, गाड्यांचे आवाज आणि कर्कश्य हॉर्न सगळ्यातून सुटका होणे शक्य नाही. सार्वजनिक जागांवर कोणत्याही प्रकारचे ध्वनी प्रदूषण न करता डीजे उत्साही मंडळींकरता साउंड प्रुफ हॉल बनवावेत किंवा पब त्यासाठीच तर आहेत आणि काय तो आपला आनंद उत्साह वगैरे तिथे वारेमाप मनसोक्त वगैरे उधळावा. त्याला कोणाचीही हरकत नसेल. दारूचेही तेच. एखादा दारू पिऊन मेला तरी कोणालाही (त्यात त्याचे कुटुंबही असू शकते) काहीही घेणेदेणे नाही पण त्याने दारू पिऊन धिंगाणा घातला कोणाला शिव्या त्रास देत फिरला तरच आक्षेप असेल. संस्कृती चे जाऊ देत पण किमान एक माणूस दुसऱ्याला आपला त्रास होऊ नये किंवा निदान कमीत कमी व्हावा एव्हढे प्रयत्न तर नक्कीच करू शकतो.
In reply to सगळ्या जगात by चिऊकाऊ
फक्त मागास आणि डेव्हलपिंग देशांमध्येच हा दुसऱ्याला छळण्याचा आनंद घेतला जातो
चांगलंय....
फक्त नाही. निवासी परिसरातील कारखाने welding चे हा सुध्दा अतोनात अस्वस्थ करणारा आवाज आहे.आई राहते तिथे समोरच एकाने असा कारखाना सुरू केला. तो मशिन चा आवाज इतका मोठा आहे की घरात एकमेकांना हाक मारली तरी ऐकू जात नाही. तयातच माझी आजी वय 81 ती सुद्धा वैतागली आहे. 291 कलमान्वये पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. महापालिका आयुक्त यांच्या कडे निवेदन दिले. शेवटी एकदाचा बंद झाला कारखाना. D j बाबत जर 100 नंबर वर तक्रार केली तर पोलीस कारवाई करतात.
पोलीस परवानगीत जसे वेळेचे बंधन असते तसे आवाजाच्या पातळीचे पण बंधन असते का ?
हे लिमिट आहे
In reply to हो 65 डेसिबल by मनिमौ
बायदवे हे डेसिबल किती अंतरावरून मोजतात?
समजा, १५० डेसिबलचा आवाज १ किलोमीटर वरून ऐकला तर हळू ऐकू येईल. त्याउलट कानाजवळ वाजणार्या ६४ डेसिबलनेही डोकं उठू शकतं.
या समस्येवर डॉ. यशवंत ओक यांच्या लढ्याबद्दल आज लोकप्रभेत वाचले.
आवाजावर वचक
In reply to डॉ. यशवंत ओक by श्रीरंग_जोशी
काय जबरदस्त माणूस आहे राव. एकच नंबर!!!! मान गये. _/\_
माहितीकरिता अतिशय धन्यवाद.
आपल्या देशात सामाजिक जाणीवेचा खूप मोठा अभाव आहे. मी मला हवे तसे वागणार. कुणाला त्रास होत असेल तर त्याने त्याचे बघून घ्यावे अशी मानसिकता असते बर्याच जणांची. मोठ्या आवाजात डी. जे. लावणे, रस्त्यावर थुंकणे, कुठेही कचरा फेकणे, उलट्या दिशेने गाडी चालवणे, चुकीच्या पध्धतीने ओव्हर्टेक करणे, सिग्नल तोडणे,
ह्या सर्व गोष्टी ह्याच मानसिकतेच्या द्योतक आहेत. विनाकारण होर्न वाजवणे हा तर बहुतेकांचा छन्द्च आहे. आपली जनता साक्षर आहे पण सुशिक्षीत नाही. आणी ती होईल असे वाटत पण नाही.
कधीही निघणारे धागे ...एक