मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घरी जाताना

शिव कन्या · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
अलीकडे घरी जाताना तसे काही न्यायचे नसतेच...... तेव्हा आराम खुर्चीसाठी पार्ले पुडा, शिलाई मशीनसाठी बॉबीन, पडक्या दातांसाठी चिंचाबोरे, अन मांजरी साठी दूध, इतकेच किडूकमिडूक.... पण .... अलीकडे 'घरी' जातोच कुठे आपण?

वाचने 1009 वाचनखूण प्रतिक्रिया 1