एके दिवशी
लेखनविषय:
एके दिवशी अशी अचानक समोर माझ्या आलीस
आणि भूतकाळात मला तू घेऊन गेलीस
तुझ्या आणि माझ्या मैत्रीची चाले सर्वत्र चर्चा
तुझ्या चाहत्यांनी पण आणला घरी माझ्या मोर्चा
पण तू मात्र लग्नाचा आमंत्रण घेऊन आलीस
एके दिवशी अशी अचानक समोर माझ्या आलीस
आणि भूतकाळात मला तू घेऊन गेलीस
तुझ्याकडे व्यक्त करायचं होत मला माझं प्रेम
पण तू "हो" म्हणशील याचा नव्हता नेम
माझी प्रेमाची भावना मनातच माझ्या विरून गेली
एके दिवशी अशी अचानक समोर माझ्या आलीस
आणि भूतकाळात मला तू घेऊन गेलीस
पूर्वी इतकी "सुंदर" तू आजही दिसतेस
केसाची एक बट गालावर तुझ्या आजही खेळते
पण तू मात्र माझ्या उडून गेलेल्या
केसांकडे पाहत मुक्त पणे हसलीस
एके दिवशी अशी अचानक समोर माझ्या आलीस
आणि भूतकाळात मला तू घेऊन गेलीस .
नवऱ्याशी तुझ्या तू ओळख मला करून दिलीस
कॉलेज मध्ये "बरोबर" होतो एवडेच तू म्हणालीस
मात्र तुझ्या " चिमुरड्याचा" मला तू "मामा" करून गेलीस
एके दिवशी अशी अचानक समोर माझ्या आलीस
आणि भूतकाळात मला तू घेऊन गेलीस
वाचने
1235
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
अगदी लील्याच.
ये बात! झकास कविता!
कलोनियल कझिन्स टाईप वाटली.
नुसत्या चिमुरड्याचा नाही तर
मस्त!
सुंदर कविता...अनेक मित्र