रुसलेले शब्द
लेखनविषय:
शब्द माझ्यावर रुसलेत...
बहुतेक कोप-यात लपलेत.
शोधून त्यांना दामले;
मीच फ़ुरगटुन बसले!
वाटल येतील सोबतीला...
फुगा फोडतील मनातला...
वाट पाहून थकले;
ते अजुनही लपले.
लिहायची होती एक शायरी...
निदान एक इटकुली नज्म तरी..
बहुतेक त्यांना वाटल...
हिला जमणार कुठल?
त्यांच ही बरोबरच आहे;
नज्म-शायरी... अपना बस कुठे?
नाद मी सोडून दिला...
शब्दांनी परत हात दिला!
वाचने
2832
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
तुमची केकता कपुर झालिये हो...
तीन तीनदा रुसलेले शब्द !!!! रुसलेले शब्द!! रुसलेले शब्द !!!
माफ़ करा. अपलोड नव्हती होत कविता बराच वेळ. आणि मग काहीतरी गड़बड़ झाली.. अचानक 3 वेळा अपलोड झाली.
दामले यांची कविता आवडली.
In reply to दामले यांची कविता आवडली. by आदूबाळ
फ़ुरगटुनजीवन दामले का? :)
In reply to फ़ुरगटुन जीवन दामले का? by आनन्दिता
शोधून त्यांना दामले;हे दामले म्हणजे कोण? असो गंमत होती ही. कविता छान आहे, भाव आवडले. (कवितेतले)
वाटल येतील सोबतीला...
फुगा फोडतील मनातला...
व्वा व्वा!! अतिशय सुंदर रचना.
syg-
नाद मी सोडून दिला... :))
तुमच्यावरा रुसलेले शब्द शोधायला दामले का आले ?
इथंच अडलंय
इथेतिथे शब्दांनी एवढं दमवूनही तुमच्या अबाधित राहिलेल्या निर्मितीशीलतेचं खरंच कौतुक वाटतं!
हल्ली दर दोन दिवसा आड होते का(कविता)?
In reply to हल्ली दर दोन दिवसा आड होते का by अत्रुप्त आत्मा
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
In reply to हल्ली दर दोन दिवसा आड होते का by अत्रुप्त आत्मा
:)
लेले आणि दामले यांचं काहीतरी दिसतंय!!
वाईट वाटले काही प्रतिसाद वाचून. मान्य आहे अनेक मेंबर्स एकमेकांना अगोदर पासून ओळखतात. पुणेकर असल्याने भेटी देखील होतात... चेष्टा होणारच नविन लेखक/कवी यांची आणि त्यांच्या लेखनाची. परंतु इथे काही प्रमाणात वैयक्तिक बोलले गेले. कदाचित यावर तुम्हा मी पा करांचे म्हणणे असेल की आम्ही तुम्हाला आमंत्रण दिले नव्हते. चालायचेच. फ़क्त इथले प्रतिसाद वाचून वाईट वाटले ते सांगावेसे वाटले.
In reply to वाईट वाटले काही प्रतिसाद by ज्योति अळवणी
लक्ष नका देऊ...
पण म्हणजे हळुहळू मिपाकरांचा अंदाज येतोय तर.. !
चिकाटी सोडू नका.
In reply to वाईट वाटले काही प्रतिसाद by ज्योति अळवणी
@ज्योती अलवनि
तुम्हाला वाईट वाटावं अश्या उद्देशानी एकही प्रतिसाद इथे लिहिलेला नाही. तुम्हास राग आला असल्यास क्षमस्व. आमची आमची अशीचं मस्ती नियमित चालते. त्यात तुम्हीही सगळे सं.मं,च्या डोक्याला त्रास नं देता सामिल झालात तरं आनंदचं होईल.
तुमची केकता कपुर झालिये हो...