मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाटक

पदकि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आयुष्याचे माझ्या | जाले जे नाटक त्याचे हे फाटक | उघडितो होतो (आणि आहे)| तसा मी सावळा जनही बावळा | म्हणताती रूप-हीन मुख| नसे मी देखणा डोळ्याने चकणा/ थोडाफार ऐसे कैसे रूप| कॉर्पोरेटी न्यावे जनां न साहवे| माझी चिंता अरे जरा शर्ट| पॅंटीमघ्ये खोच कशी नाही बोच | तुला मुळी? केसही जरासे | बारीक कापावे तेलही लावावे | स्नानोत्तर पायी असू द्यावे| चामड्याचे बूट घ्यावयास सूट| पैसा देतो वगैरे इत्यादि | ठोकून ती मूर्ती थोडीफार कीर्ती | मिळविली कंपनीत झालो | थोडासा साहेब लटका रुबाब | दिनरात्री नोकर धावती | हुकुमात आज मनामाजी लाज | वाटतसे उचलली जर| माझी मीच बॅग वरिष्ठांना राग | मनामाजी असावा हा साला | मनाने मार्क्सिस्ट आतून उद्दिष्ट | काय याचे? कसे हा साधेल| कंपनीचे "गोल" खुर्ची एक फोल| अडवितो विद्यापीठे केला | विद्या-वाचस्पती नसे त्याची क्षिती | मुळी आम्हा कंपनीचे येथे| "पॉवर स्ट्रक्चर" त्याची थरथर | वाढतसे लठ्ठ पगाराची | सोडून नोकरी बसणेही घरी | शक्य नसे ऐसे चालतसे| आयुष्य-नाटक मनाने काटक| झालो आता! xxx

वाचने 1078 वाचनखूण प्रतिक्रिया 3