"खरे सत्य बोला/ जपून जपून"
लेखनविषय:
काव्यरस
खरे सत्य बोला/ जपून जपून
तेज लपवून / ठेवा थोडे
अर्धोक्तीने करा / सत्य - सुरुवात
जनां भयभीत / करू नका
अंधाऱ्या अंबरी / विजेची उपज
बालकां समज/ नाही तिची
महा त्या तेजाने / अंधत्व नेत्रांना
साध्या माणसांना / कशासाठी?
क्षीण मानवाची/ क्षीण असे दृष्टी
प्रकाशाची सृष्टी / सोपी नसे
---
वाचने
3050
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
Tell all the truth but tell it slant,
: Emily Dickinson
मस्त!!
मस्त आहे. आवडली.
अनुवाद आवडला, पण'खरे सत्य' हे redundant वाटतंय. मूळ कवितेत संपूर्ण सत्य असा अर्थ असावा.
अंधाऱ्या अंबरी / विजेची उपज बालकां समज/ नाही तिचीआवडलं. "॥"(खडीपायी)साठी '/' ऐवजी Ctrl+ H वापरा.
आवडली
छान !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- HTTP/2 finished, coming to browsers within weeks HTTP/2 Frequently Asked Questions
पूर्वी वाचलेलं काही आठवलं:
Before you speak, THINK,
T - is it true?
H - is it helpful?
I - is it inspiring?
N - is it necessary?
K - is it kind?
अनुवदित