फायर एक करणे ३ (अंतिम)
फायर एक करणे २
अमेरिकेतील कोणत्याही क्षणी पिंक स्लीप / युरोपातील कायद्याच्या चौकटीत राहून बऱ्यापैकी पारदर्शक प्रक्रियेतून येणारे फायरिंग / जपान मध्ये 'शक्यतो नाहीच' असे फायरिंग (ऐकिव माहिती नुसार) इथे संबंधित देशात प्रदीर्घ नोकरी करणाऱ्यांनी प्रकाश टाकावा हि अपेक्षा (डेप्युटेशन वर गेलेल्यांना फार तपशील कळू शकत नाहीत ह्या गृहितकावर).....ह्यात आपण भारतात कुठे तरी मध्ये आहोत ...म्हणजे कायद्याचे संरक्षण असेल तर कामात कुचराई / कायद्याचे संरक्षण नसेल तर सत्ताधार्यांची मनमानी .. अर्थात ह्यात अनेक शक्यता /अपवाद वगैरे आहेतच ..
असो तर फायरिंग मधले अनुभव आठवतांना सगळ्यात सनसनाटी ठरावा असा हा अनुभव..ह्या अनुभवाला
राज ठाकरे जबाबदार होते :)माझ्या कडे जवळपास ९० फ्रेशेर्स चे इंडक्शन नंतरचे को ओर्डीनेशन होते ...रोज सकाळी सगळ्यांची व्हर्च्युअल हजेरी ..कुणाचे काही तांत्रिक प्रॉब्लेम्स सोडवणे ..त्यांना प्रोजेक्ट वर tag करण्यासाठी प्रयत्न आदी .. ह्यात एक दिवस लक्षात आले कि एक चिरंजीव डेली मिटींगमध्ये काहीश्या चढ्या सुरात जणू जाब विचारत आहेत अशा थाटात बोलू लागले (अजून किती दिवस प्रोजेक्ट नाही ? / हे काय चाललंय /अमुक माणूस काय करतोय ..कसली management चालू आहे वगैरे ) ...२ दिवस झाल्यावर आम्ही त्यांना सौम्य शब्दात समजावले तथापि परिणाम शून्य ..शेवटी समन्स ...गर्द निळी pant जांभळा शर्त वरचे बटन उघडे ..दाढीचे खुंट ..विस्कटलेले केस डोळ्यात आत्मविश्वास आणि मग्रुरी ह्यांच्या सीमारेषेवरचे भाव ... म्हटले हम्म संवाद सुरु झाला ...कि कारे बाबा काय म्हणणे आहे ..म्हणाला कि तुमच्या (!) कम्पनीच्या पोलिसिज बेकार आहेत कुचकामी आहेत ...एक गोष्ट धड नाही ..वगैरे वगैरे ... शेवटी म्हटले कि झाले काय? तर म्हणाला 'मै जहा भी गया राज किया हुं ...अपने बलबुते पे जिता हुं ...किसीसे डरता नाही ...और यहा आय हुं तो ठोक बजाके जीयुंगा'... नीट बघितले तर डोळ्यात वेडाबिडाची झाक नव्हती ..बर पुढे ?..."आपने कहा था .याहांपे मेल्स पे ध्यान दिया जाता है कोई ऐसी वैसी बात होती नाही .... च्यामारी मला टोटल लागेना ..आणि हा हळू हळू सरकतच चालला ...किधर है वो HRD हेड ...मै सी इ ओ तक जाऊंगा ... थोड्या वेळाने कळले ते असे कि तेव्हा राज ठाकरेंनी परप्रांतीयांविरुद्ध एक मोहीम उघडली होती आणि कंपनीतल्या कंपनीत कुणीतरी त्याची खिल्ली उडवणारी मेल सर्क्युलेट केली ह्या महाशयांनी ती भलत्याच कुणाच्या अकौंट वर ती वाचली आणि हे सगळे कुणी थांबवले नाही त्यामुळे हा भडकला होता ... पुढे तर आप भी महाराष्ट्र के हो तो आपको तो इसमे कूच गलत दिखेगही नही .... आपके वो बॉस वो भी वैसेही .. अर्थात हे रेकॉर्ड वर येऊ शकले नाही ...पण मग एच आर ला लेखी रिपोर्ट दिला आणि रीतसर कारवाई चालू झाली दरम्यान पुढे ह्याच्या ट्रेनिंग चा रिपोर्ट वाईट आला ७०% अस्सेस्मेंत मध्ये फेल ..शिकण्यात लक्ष देत नाही / इतरांना डीस्टर्ब करतो ...फालतू शंका विचारतो ... सहकार्यंशी क्षुल्लक कारणांवरून भांडतो...ट्रेनर लोकांना हुज्जत घालून त्रास देतो ... शेवटी १ महिन्याच्या पी आय पी वर टाकला तर ज्याच्या हाता खाली दिला तो मला येऊन रोज कोपरापासून नमस्कार करून जायचा कि हे काय प्रकरण दिलंय माझ्याकडे ... सोडव मला म्हणून ...कसा बस एक महिना वाट बघून एच आर ने तडक कोर्या कागदावर राजीनामा हाती लिहून घेऊन तत्काळ रिलीज केले ... रिलीज केल्या नंतर १ १.५ महिन्याने त्याचे आई वडील कंपनीत आले होते कि आम्ही त्याला समजवले आहे .. कृपा करून त्याला परत घ्या वगैरे ...पण काही उपयोग झाला नाही ... जाता जाता शेवटचे : मझ्या मित्राच्या एका दुसर्या प्रोजेक्ट वर एका २-३ वर्ष अनुभवी (?) मुलीला नोन पेर्फ्रोमंस साठी नारळ दिला ..उर्वरित कार्यवाही साठी एका ऑफिस मधून हेडोफीस ला जायला सांगितले ... ती नंतर हेडोफीस ला गेली नाही ... एखाद्या गूढ कथे सारखी जी गायब ती गायबच ..सिस्टीम मध्ये ती रिज़ाइन्द पण अकौंट सेटल्ड नाही....तो प्रोजेक्ट मनेजर नंतर १ २ महिने बेचैन होता ...पुढे काय झाले देव जाणे ... असो इत्यलम
वाचने
5653
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
अग्ग्गागा....च्यायला त्याला
असाच एक किस्सा माझ्या जुन्या
हो अशी माणसे काढुन टाकली
In reply to हो अशी माणसे काढुन टाकली by गणेशा
ज्याल मदतिचि गरज
फायर
In reply to फायर by चिकित्सक
कठीण आहे
In reply to कठीण आहे by अत्रन्गि पाउस
मला याच्या विरुध्द किस्सा
चांगली माहिती.
एक अनुभव
माझ्या एका कंपनीत घडलेला