चॉकलेटचा बंगला ऽऽ
लेखनविषय:
काव्यरस
चॉकलेट चा बंगला अजून
आठवतो का हळूच मनात
खरं खरं सांगा बरं
गोष्ट राहील आपल्या आपल्यात...
लहानपण जर जपलं असेल
. बिस्किटांची गच्ची दिसेल
टॉफीच्या दारामधली
झुपकेवाली खार दिसेल ...
लेमनच्या खिडकीमधून
. उंच उंच झोका दिसेल
झोक्यावर बसलात तर
मैनेचा पिंजरा दिसेल
चॉकलेट डे च्या दिवशी आज
पुन्हा ऐकदा बंगला दिसला
तुझीच वाट पहात होतो
असं म्हणून हळूच हसला ...
चॉकलेट च्या या बंगल्यामध्ये
तुम्ही सुद्धा जाऊन या
बालपणीच्या आठवणी त
फेरफटका मारून या!
वाचने
3818
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
पाडगावकरी शैलीतील एक अतिशय हृद्य म्हणावी अशी कविता.
कित्ती गोड
किती सुरेख आहे गं :)
आले फिरून सगळा चॉकलेटचा बंगला तुझ्याबरोबर.
छानच कविता. :)
कविता आवडली आणि चॉकलेटचा बंगला देखील आठवला.
कविता आवडली. कुठेतरी मनाच्या मागच्या कप्प्यात राहिलेला चॉकलेटचा बंगला आठवला.
बोलकं गाणं. हेसुद्धा आणि मूळ गाणं सुद्धा. "ऐकदा" शब्द बहुदा चुकला असावा. तरीही छान वाटला - एक नविन अर्थ लागला - ऐक + एकदा = ऐकदा
खूप गोड कविता . आणि साध्या शब्दांत खूप काही सांगणारी :)
हॅलो हॅलो करायला छोटासा फोन!!
:( गाण पुन्हा ऐकायच आहे.
In reply to हॅलो हॅलो करायला छोटासा फोन!! by स्पंदना
@हॅलो हॅलो करायला छोटासा फोन!! >>> +++१११
फ़क्त त्यात- "शोताशा फोन " -असे त्या चोकलेट पेक्षा गोssssड उच्चार आहेत!
खरंच खूप गोड कविता आहे.आवडली गं.
आवडल
खरच आठवला चॉकलेटचा बंगला. ते लहांपण आठवल
कविता फार आवडली... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आद्य आम आदमी
पाडगावकरी शैलीतील एक अतिशय