मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेमदिन स्पेशल - व्हेरी बेरी चॉकलेट कप्स

सानिकास्वप्निल · · पाककृती
प्रेमदिनानिमित्त चला एक सोपी डिझर्ट पाककृती करुया :) . साहित्यः कुकिंग चॉकलेट (आवडीनुसार प्रमाण घ्यावे) फ्रेश क्रीम (आवडीनुसार प्रमाण घ्यावे) १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स Confetti सजावटीकरता ब्ल्युबेरीज (आवडीनुसार प्रमाण घ्यावे किंवा आवडीनुसार कुठल्याही बेरीज घेऊ शकता) . पाककृती: चॉकलेटला थोडे बारीक चॉप करुन घ्या. मायक्रोव्हेव सेफ बाऊलमध्ये तुकडे केलेले चॉकलेट घालून मिडियम पॉवर वर २०-३० सेकंद गरम करुन घ्या (हलके गरम झाले असताना बाहेर काढून मिक्स करा म्हणजे ते वितळायला लागेल). गरज वाटल्यास आणखीन १० सेकंद गरम करुन घ्या. चॉकलेट २ मिनिटे गार होऊ द्या म्हणजे ते चांगले पसरेल. आता २ चमचे वितळलेले चॉकलेट सिलिकॉन मफिन कपमध्ये घालून कप सगळीकढून फिरवून घ्या,म्हणजे चॉकलेट सारखे लागेल. असे सगळे कप्स तयार करुन घ्यावे व फ्रिजमध्ये ३० मिनिटे सेट होण्यासाठी ठेवावे. . एका भांड्यात बर्फाचे पाणी घ्यावे व त्यावर मिक्सींग बाऊल ठेवावा. त्यात गार असलेले फ्रेश क्रीम ओतावे व बीटरने २-३ मिनिटे फेटावे. (असे केल्याने क्रीम लवकर फेटले जाते) आता त्यात चवीपूरती साखर व १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालावे. पुन्हा २-३ मिनिटे क्रीम सॉफ्ट पिक्स तयार होईपर्यंत फेटावे. सेट झालेले चॉकलेट कप्स हलक्या हाताने सोडवून घ्यावे. व्हिप्ड क्रीम एका पायपींग बॅगमध्ये घालून घ्यावे व चॉकलेट कप्समध्ये पाईप करावे. त्यावर ब्ल्युबेरीज लावून Confetti ने सजावट करावी. वरून थोडी पिठीसाखर भरभूरून घ्यावी. . हे डिझर्ट गारच सर्व्ह करावे. लगेच सर्व्ह करणार नसलात तर बेरी चॉकलेट कप्स तयार करून फ्रिजमध्ये ठेवावे. . सगळ्यांना व्हॅलेंटाईन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा !!

वाचने 14407 वाचनखूण प्रतिक्रिया 39

मधुरा देशपांडे 14/02/2015 - 04:58
काय झक्कास सादरीकरण. सुंदरच. ही बर्फाच्या पाण्याची टीप नवीनच कळली. पुढच्या वेळी तसेच करण्यात येइल.

अत्रुप्त आत्मा 14/02/2015 - 08:21
सानिकाताय्ना ,आधी १ कडकडित श्याल्युट ठोकुन शलाम करून, . . . . . . . आम्ही शेवटच्या फ़ोटुत उडी टाकायला जात हाओत!

सुहास झेले 14/02/2015 - 12:04
खल्लास !!

डॉ सुहास म्हात्रे 14/02/2015 - 12:26
एक लंबर !!! तुम्ही काढाच ऑनलाईन शॉप्पी... नुसते फोटो पाहणे लै कठ्ठीण झाले आहे :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 14/02/2015 - 14:36
ऑनलाईन शॉपी काढाच. मिपाकरांना सवलत द्या. अहो, हातात कला आहे, तर फायदा घ्याच. सेंट व्हेलेंटाईन डेची परंपरा राखणार्‍या तमाम मित्र मैत्रिणींना माझ्याकडून मनभरुन शुभेच्छा आणि हीच बेरी चॉकलेट्स. :) -दिलीप बिरुटे

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आदूबाळ 14/02/2015 - 22:48
खरेक्ट. त्यात अजून एक सर्विस ऐडवा - "तुमच्या घरच्या (कशाही दिसणाऱ्या) पदार्थांचे चिकने फोटो काढून मिळतील. जब्री पाकृ. केल्या जाईल.

आरोही 14/02/2015 - 14:09
मस्त मस्त !!नक्की करण्यात येईल !!मागच्या वर्षीच्या प्रेम दिनानिमित्त दिलेल्या केक च्या recipe नुसार आज तो केक हि केलाय ,आणि खूप प्रशंसा मिळवलिये बर का !!

hitesh 14/02/2015 - 16:54
छान

michmadhura 14/02/2015 - 19:22
अप्रतिम!. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे सानिका.

स्वाती राजेश 14/02/2015 - 23:24
मस्त रेसिपी...फो टो पण मस्त...नक्की करुन पाहीन.. :)

स्पंदना 16/02/2015 - 04:04
सुरवात काय म्हणे " सोपी पाक्कृती" ऑ? हे सोप्प्प्प्पी पाककृती? असेल बाई तुझ्यासाठी. माझे तर डोळेच पांढरे झालेत.

In reply to by स्पंदना

पिलीयन रायडर 16/02/2015 - 09:16
+११११ सोप्पी???? काय ते जीवघेणे फोटो.. चुकुन नवर्‍याला दाखवलं तर.. जौ दे... तू का नाही मास्टरशेफ मधे भाग घेत ग सानिका? आम्ही करु ना वोटींग वगैरे!!!