मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वैभवशाली वाडा जुना

प्रमोद देर्देकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
वैभवशाली अस्तित्वाच्या उध्वस्त खुणा, पदोपदी सांगत असतो तो वाडा जुना, ढासळलेल्या भिंती अन ओसाड जोतं, गवताच्या पातीशी आता जडलंय नातं, दरवाजांच्या बिजागरांचे ते भयाण किरकिरणं, अन वाळवीच्या रांगांनी ते वासे पोखरणं, कोळयांची जळमटं अन धुळिचे साम्राज्य, असाह्य कुरकरणं, जिन्यातल्या पायर्‍यांचं कित्येक आप्तांची वंशावळ अंगावर खेळवली यानं, डावपेच, शिकार, फितुरी सगळं पाहिलंय यानं, आत्मक्लेषाच्या खुणा झेलत जगतोय जिणं, मातीशी संग होताच, शेष ते ना राहील भग्न, कोणा एके काळी झडत असतील नौबती, अन कोस कोस असेल त्याच्या श्रिमंतीची महती, आज खंगला असेल, मोडकळीस आला असेल, तरीही, वैभवशाली अस्तित्वाच्या उध्वस्त खुणा, पदोपदी सांगत असतो तो वाडा जुना.

वाचने 3938 वाचनखूण प्रतिक्रिया 9

प्रचेतस 11/02/2015 - 16:20
खूप छान. आवडली कविता.
आत्मक्लेषाच्या खुणा झेलत जगतोय जिणं, मातीशी संग होताच, शेष ते ना राहील भग्न,
आत्मक्लेषाच्या खुणा झेलत जगतोय जिणं, मातीशी संग व्हायची वाट पाहात ते दिवाभीतासारखं भिणं असा बदल सुचवतोय.