चला मंडळी "पॅरीस" पाहुयात ... पॅरीस : एक प्रेमनगरी
अखेर होय-नाय होय-नाय करता करता गेल्या आठवड्याच्या शेवटाला आम्ही "पॅरीसला" जाऊन आलो, २ दिवस पुर्ण अगदी शक्य तेवढा वेळ वापरुन अख्खे शहर पायी, बस, बोट, रेल्वे ह्या मार्गाने हिंडुन पाहिले. पण खरं सांगतो मंडळी, पॅरीस हे अशा २ दिवसात गडबडीत पाहण्याचे शहर नाहीच, मस्त तब्येतीत महिनाभर सुट्टी टाकुन मग जावे पॅरीसला आणि पाहुन घ्यावे असे वाटते आहेत, २ दिवसात पॅरीसचा "प" सुद्धा होणार नाही ....
जेवढे शक्य तेवढे पाहिल्यावर "फ्रेंच माणुसाला कलासक्त का म्हणतात " ह्याचा पुरेपुर प्रत्यय आला ....
तेव्हाच ठरवले की अनुभव आपल्या मायबाप मिपाकरांसमोर मांडायचा ...
मग चला मंडळी पाहु यात आणि वाचुयात पॅरीस माझ्या नजरेतुन आणि लेखणीतुन ...
जर उत्साहात ( आणि गडबडीत ) काही चुका आढळल्यात तर कॄपा करुन गोड मानुन घ्याव्यात ...
तर दिवसाच्या सुरवातीला आम्ही हॉटेलमधुन निघुन "हाव्र कॉमार्टीनी ( हा माझा देशी उच्चार, ह्याचा अस्सल फ्रेंचशी दुरचा सुद्धा संबंध नाही ) " ह्या भु-रेल्वे स्थानकावर पोहचलो व तेथुन जवळच आम्हाला आमची "ओपेन डेक बस" मिळणार होती व त्यातुन पुढे आम्ही प्रवास करणार होतो.
जातानाच आम्हाला लांबुनच एक जहबहर्या इमारत दिसली, गर्दीही बर्यापैकी होती तिथे. आम्ही मग लगालग तिथे गेले व जवळुन पाहिले तर मंडळी ते "पॅरीसचे ऑपेरा हाऊस" होते, जिथे राजा हेन्री खास ऑपेरा पहायला यायचा. आम्ही मग तोंडाचा आऽऽऽऽ करुन चर्चा करत फोटो काढत होतो. तेव्हा तिथला म्हातारा जवळ आला व बिल्डींगबद्दल काही सांगु लागला, त्याचे फ्रेंच व आमचे हिंग्लिश असे काही जमेना, पण तो ज्या पद्धतीने सांगत होता ते पाहुन वाटते की तो म्हणत असावा "बेटा, ही तर सुरवात आहे. खरे पॅरीस अजुन पुढेच आहे.". असो.
तर मंडळी पहा "अत्युत्तम ऑपेरा हाऊस" व त्याचा परिसर ...
नंतर आम्हाला ती "ओपेन डेक बस" मिळुन आमचा प्रवास पुढे सुरु झाला. खर सांगतो त्या बसच्या वरच्या मजल्यावर बसुन शहर पहायला जाम मजा येत होती.
मध्येच आम्हाला एक मस्त हॉटेल दिसले, ते होते "जगविख्यात लुव्र म्युसीअमचे हॉटेल" ...
लै भारी लै भारी म्हणुस्तोवर गाडी एका चौकात पोहचली व आम्ही "हे काय ,हे काय ?" म्हणत असताना तो "लुव्र म्युसीअमचा प्रसिद्ध काचेचा पिरॅमीड " दिसला व घोषणा झाली की तुम्ही आता " ला लुव्र म्युसीअम" समोर आहात, आम्ही इथे उतरण्याचा निर्णय घेऊन हे पाहण्याचे ठरवले, इथुन पुढे सगले चित्रस्वरुपात, सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, केवळ अप्रतिम ...
आता सफर करुयात "जगप्रसिद्ध लुव्र म्युसीअमची" ... काही निवडक फोटो इथे देतो आहे ...
मंडळी शप्पथ सांगतो की आपण पाहता पाहता व फोटो काढुन थकुन जाऊ पण इथला अनमोल नजराणा संपणार नाही. " दाखवणार्याचे हजातो हात, फाटका माझा कॅमेरा" अशीच गत झाली होती. विस्तारभयाने जास्त फोटो इथे देत नाही, काही निवडक "पेंटिंग्स" पहा ...
आणि हीच ती, "लिओनार्डो दा विंची ची जगप्रसिद्ध मोनालीसा" ...
ह्याच अनुपम तस्वीरीच्या शोधात दरवर्षी लाखो लोक "मोनालिसा मोनालिसा" चा गजर करत ह्या वास्तुला भेट देतात ...
आम्ही नुसते धुंद होऊन एका वेगळ्याच कैफात हे सगळे अलौकीक सौंदर्य पहात होतो, आम्हाला पुढेचे उरकायचे असल्याने आमची पळापळ करत पहाणे चालु होते पण तुम्हाला सांगतो मंडळी काही "अस्सल रसिक " एकेक गोष्ट तासनतास पहात असतात व त्या सौंदर्याचा अस्वाद घेतात, हीच खरी कलेची कदर ...
आम्ही काय नुसते वखवखल्यासारखे पाहुन घेतले व पुढच्या प्रवासासाठी बाहेर पडलो ...
बाहेर आल्यावर वाटत होते की कोणत्या तरी वेगळ्याच दुनयेत आलो, आत जे काही होते ते दैवी, अलौकीक, अप्रतिम, अमानवी, उच्च असे काही आणि बाहेर तुमच्याआमच्यासारखे सामान्य, छे शब्दच नाहीत आतले सौंदर्य शब्दातुन उतरवायला, फोटो तरी किती काढणार ???
असो.
आता अख्खे पॅरीस पहायला जर १ महिना पुरणार नसेल तर त्याचे वर्णन एका भागात कसे शक्य आहे ?
मला हा लेख क्रमशः लिहावाच लागेल, म्हणुन आता इथेच थांबतो ...
बाकीचे वर्णन पुढीच (कदाचीत २ ) भागात आणि अर्थात वाचकांची इच्छा असेल तर....
ता.क.: जवळपास ५०० + फोटो काढले आहेत व सर्व आंतरजालावर चढवले आहेत, त्याचा "दुवा" सुद्धा शेवटच्या भागात ...
वा रे वा, आत्ताच दुवा दिल्यावर तुम्ही कशाला ही "पॅरीस यात्रा" वाचताय ... ;) ;) ;)
अर्थातच क्रमश :
( पुढचा भाग जास्तीत जास्त २-३ दिवसात नक्की )
वाचने
17085
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
फोह्मिदाब्ल :)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुंदर..
तू ज्या
In reply to तू ज्या by प्राजु
अगं असे काही नाही ....
वॉव!!
मस्तं डॉन
मस्तच रे.
मिस्टर मोनालिसा
डाण्याच्या डोक्याला शॉट झालाय
मस्त
मस्त..
पण
In reply to पण by कपिल काळे
??
In reply to ?? by आनंदयात्री
छंदशात्र
In reply to छंदशात्र by सुनील
ठ्ठो
In reply to छंदशात्र by सुनील
आनंदयात्र
In reply to ?? by आनंदयात्री
जे चूक
In reply to जे चूक by कपिल काळे
बॉस , मी काय म्हणतो ...
In reply to जे चूक by कपिल काळे
बापरे,
In reply to पण by कपिल काळे
पाहूया आणि पाहूयात ही दोन्ही
पॅरीस ची
डॉन्या
फॅन्टॅब्युलस!!
अल्टी!
मस्त फोटू
>>"दाखवणार्
मस्त फोटू
In reply to मस्त फोटू by ३_१४ विक्षिप्त अदिती
बिल्डिंगी
In reply to मस्त फोटू by ३_१४ विक्षिप्त अदिती
बरोबर ...
छान
झकास
जबरि.
डॉन भाऊ
५००!!!!!!!!!
अरे वा वा
रंगीन शाम
अतिउत्तम
हल्ली फिरणे बंद केले की काय
प्रेमनगरी ....
झकास व तजेलदार सचित्र लेख
आवडला लेख.
In reply to आवडला लेख. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
14/11/2008 सालचा लेख आहे हा
In reply to आवडला लेख. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
२-३ दिवसात पुढचा भाग देणारेत
मस्त !!!पुढिल फोटो अन