काल पासून हे शब्द माझ्या मनाला अनंत यातना देत आहेत. अर्थ मी लावावा,तर अभिप्रेत अर्थ सुटून ..होणार्या अनर्थाचे भय. आणि तरिही लावला,तर मूलार्थाचे काय? याची चिंता! मला प्रतीत होणारा असा एक अर्थ आहेच..प्रतिबिंब म्हणून आलेला..! पण मूळ बिंबाचे काय मग??? ते कसे आहे??? तर कविने ते मानले आहे..मानवाच्या अज्ञेयवादाचे बीज असलेल्या परमेश्वरी स्वरूपात..! मानवाच्या अस्तित्वाचा (त्यानीच मानलेला..)काल्पनिक सहभागिदार:- परमेश्वर्,देव ,भगवंत,सखा ,सोबती,निर्मिक..सारे काहि!
(मग मी म्हटलं.की आपण आज आधी "हे" पाहू! आणि आपल्या तडफडिचं बीज कशात आहे? ते नंतर पाहू!)
===================================================================
त्या फुलांच्या गंधकोशी, सांग तू आहेस का?
हे भगवंता.., आंम्ही मानवांनी..अज्ञानातून ज्ञानाच्या कक्षेकडे जाताना, तुला मारलेली..ही पहिली हाक आहे.. गंधासारखी एक गोष्ट ही नेमकी हरेक फुलाप्रमाणे बदलत जाते,परंतू त्या तिथे ..त्याची असण्याची पद्धति तीच रहाते..म्हणजे आशय एक आणि शब्द फक्त वेगळा,अशी काहिशी काव्यात्म स्वरुपाची ही स्थिती..या फुलांच्या ठाई निर्माण कुणी केली??? तर ही त्या निसर्गाची एक जीवनक्रीया. म्हणुन हे परमेश्वरा..माझे भाबडे मन तुला तिथे शोधते आहे.
त्या प्रकाशि तारकांच्या,ओतिसि तु तेज का?
इश्वरा...मी हे सुवर्ण वा रौप्यकांतिमय गोलक हज्जारो वर्षापासून अवकाशात पहात आलो..त्यांची दीप्ती ,प्रकाश सर्व काहि मनाला वेड लावते! आणि ब्रम्हांडांच्या पसार्यात, हे गोलक अजुनंही तगून आहेत..इतकेच नाही..तर त्यांची कांति नित्य नूतन वाटावी असे ते लखलखतात..मग हे तेज तुझ्याच या अनंताच्या पसार्यातले त्यांना लाभलेले एक दान आहे,असे आंम्ही समजावे का? हे अज्ञाता सांग मला... या तेजाचा दाता तूच तर नाहिस?
त्या नभाच्या नीलरंगी होउनीया गीत का?
भगवंता.., हे न कळणारे अथांग..विस्तीर्ण..अफाट..अद्भूत..,असे आकाश ज्याच्याकडे केवळ दृष्टी वळली तरी मला त्यात सामावून जावेसे वाटते.. नव्हे..ते माझेच वाटते! .. ते नीलरंगी आहे..परंतू त्याची एकंही छटा ,इहलोकिच्या कोणत्याही कृत्रिमात पकडता येत नाही..जे केवळ शब्दांनी व्यक्तवता येते..असे ते जे आहे...आणि तसेच ते आकलनंही होते..ही किमया तूच त्याच्याशी एकरूप अथवा समरूप होऊन ..गीत होऊन.. आमच्या पर्यंत पोहोचवित तर नाहीस ना?
गात वायूच्या स्वराने, सांग तू आहेस का?
वायूचा देहास घडणारा स्पर्श..हे तर तुझे भौतिक रूप झाले. पण मला ते तुझेच बोल वाटतात...तू त्या वायूलाच माध्यम करून स्वररूप होऊन माझ्या कानांपर्यंत मनापर्यंत तर पोहोचायचा प्रयत्न करित नाहीस ना? जे काळायला माझे मन तुजविषयी प्रथमतः अनुकुल नसते...म्हणून तर..तू ही किमया,घडवित नाहीस ना?
मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का?
आंम्ही माणसे इहलोकी जिवंत आहोत्,हे सृष्टीचे दातृत्व आंम्ही मान्य करतो..परंतु आंम्ही नक्की जगतो कसे? कुणासाठी? आणि का म्हणून? आमची सहजीवनाची..समुहजीवनाची-ही नक्की कुठची प्रेरणा??? जिवंत असण्यातला आणि जगण्यातला हाच काय तो मूलभूत फरक!? जो आमच्या अंतरी ..प्राण नामाच्या तत्वानी.. कामना रूपात व्यक्त होत असतो!..तो तूच तर नाहिस ना?....आमच्या अंतरीचा प्राण! आंम्हाला जगविणारा आमचा जीव!
वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का?
ज्या विषयी आंम्हाला आकर्षणंही वाटतं,आणि ज्यापासून भयंही आहे..असे तूझे रूप..मग ते समुद्ररूपी येवो अगर तुझ्या कुठल्याही चमत्कृतीचा तो आविष्कार असो...तो घोर आहे.त्याविषयी बुद्धी..,शोध करून थकते.परंतू उत्तर न मिळवावे..तर जगण्याच्या मार्गात येणारे जे 'वादळ'.. ते हेच तर नाहि ना? तुझ्या रूपातले आणखिन एक..?असा प्रश्न आंम्हाला पाडते,आणि सारे काहि अगम्य होते..म्हणजे हे ही पुन्हा तूच!
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का?
कृपा...! , - भगवंता...,ज्यानी निश्चित पणे फलाची प्राप्ती होते..असे तुझे हे कृपा-स्वरूप्..तुझे परिमाणच का म्हणू नये आंम्ही? हे तुझे कृपा-रूप..त्या धरतीवर बरसणार्या मेघांप्रमाणे केवल फलप्राप्तीसाठीच तर तयार झालेले नाही ना? खरेच!!!.., इहलोकिच्या आमच्या या जीवनावर..,जगण्यासाठी आवश्यक अश्या सर्व फलांची प्राप्ती होण्याकरिता तू,आमच्याकडे..त्या कृपेचा मेघच होऊन येतो आहेस! (तुला नमन असो..)
आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का?
ती वीज असेल पंचमहाभूतांपैकि! ती तर तिची स्थिती-झाली..पण तू तिला घेऊन ज्या रूपात अवतरतोस ..त्या तुझ्या-गति नुसार, असे काहि चैतन्यमय..अद्भूत..विस्मयकारक .ज्याला पहाता क्षणी स्तब्ध व्हावे...काहि क्षण थबकावे..भ्यावेही!..असे ते तुझे, आसमंतातून लखलखत जमिनीवर येणारे-रूप आहे, हे आंम्ही आता ओळखले आहे...निश्चित!-ते तुझेच रूप आहे..(पण खरेच!..,आहे का???)
जीवनी संजीवनी तू ,माउलीचे दूध का?
आंम्हाला निसर्गाचे अपत्य म्हणून ..,मनुष्याच्या मुलाचा जो जन्म मिळतो..ती 'घटना' म्हणजे आमुची प्रथम माऊलि..आणि त्यातून आमच्यामधे ही...,निसर्गाशी लढत झुंजत जगण्याची जी प्रेरणा मिळते..ते आमचे खरे स्तन्य! ..दूध! म्हणून ती अवस्थारूपमाऊली जर जीवन असेल..तर हे प्रेरणारूप दूध... ही आमची संजिवनी आहे,,आणि संजिवनी सहजंप्राप्य नाही..म्हणुन ती तू आहेस!
कष्टणा-या बांधवांच्या रंगसी नेत्रात का?
जीवन जगण्यापासून आणि ते जगण्याकरिता ,आंम्ही सरेच कष्टतो.. पण आमच्यापैकि काहि असेही आहेत..कि ज्यांना या कष्टाचा परतावा म्हणूनंही पुन्हा उपेक्षा अथवा दु:ख्ख वाट्याला येते.म्हणून..., तसे जे खरेच कष्टं'तात..त्यांच्या डोळ्यात तर तू कारुणेनी वा झरणार्या दु:ख्खाच्या रूपानी प्रकट होत नाहिस ना? आणि तो तूच असला पाहिजेस..!!! कारण त्याशिवाय... आंम्हाला हे सर्व जाणवले तरी असते का रे!?
मूर्त तू मानव्य का रे,बालकांचे हास्य का?
तुला एका ठराविक कल्पनेत कोंडता यावं अगर वर्णिता यावं असं तुझं(मूर्त) स्वरूप आहे का रे?, का त्याही बाहेर तू केवळ मानवतेच्या रूपात आहेस? की हे सारे नाहिच मुळी...!, अन तू फक्त ..जन्मापासून फक्त काहि कालावधी जाइपर्यंत..जे आंम्ही तुझे एक निरागसतेचे समरूप म्हणून जगतो... ते केवळ बाल्य आणि त्याचे प्रकटीकरणरूपं असलेलं..- जे हास्य आहे.. ते बालकांचे निरागस हास्य तू आहेस का? .. असायलाच हवसं! आणि तुला याविरुद्ध तक्रार करता येणारंही नाही..कारण जर तू या रुपातून वजा झालास,तर आंम्ही तुज विषयी अधिक काय कल्पायचे??? सांग बरं!
या इथे अन त्या तिथे रे सांग तू आहेस का?
किती तुझी रूपे वर्णावी..? किती विशदावी? किती कोड्यात पडून पहावी? तू नाहिस अशी पूर्ण खात्री पटली..तरिही...तुझ्या शोधाची भूक शमूच नये... या आमच्या..जीवन जगविणार्या प्रेरणाबीजाकडे...म्हणजेच- न संपणार्या कुतुहला कडे पाहून, तरी सांग आता.... "या इथे अन त्या तिथे रे सांग तू आहेस का?"
////////////////////////////////////////\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\
गीतः-सूर्यकांत खांडेकर __/\__/\__/\__
आणि ज्यांच्या संगीतंगायकी शिवाय, हे गीत माझ्या(सारख्या)पर्यंत-पोहोचूच शकले नसते,
त्या पं.हृदयनाथ मंगेशकर. यांस _-/\-_
==============================================
हे या गीताचे फक्त बिंब झाले...प्रतिबिंब..आता पुन्हा....असेच केंव्हातरी!
जेंव्हा मला ते पूर्ण छळेल.....तेंव्हा! :)
वाचने
12044
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्या आत्म्याला बर्याच गोष्टी
सुरेख लिहिलंय हो गुरुजी.
_/\_ अप्रतीम -- धन्यवाद
अप्रतिम
ही कविता एकदा ऐकल्यावर झपाटूनच टाकते
बुवा काय हे ....?
बुवांना "पद्मश्री" हवीच हवी..
In reply to बुवा काय हे ....? by चौकटराजा
कितीदा वाचावं? कितीदा ऐकावं?
आवडले.
मूळ गाणंच माहिती नसल्याने
@मूळ गाणंच माहिती नसल्याने
In reply to मूळ गाणंच माहिती नसल्याने by प्रचेतस
अहो मोबल्यावर आहे म्हणून
In reply to @मूळ गाणंच माहिती नसल्याने by अत्रुप्त आत्मा
आईग्ग
In reply to मूळ गाणंच माहिती नसल्याने by प्रचेतस
हो ना. खरंच माहिती नै.
In reply to आईग्ग by सविता००१
अरे..
In reply to हो ना. खरंच माहिती नै. by प्रचेतस
गाण्यांच्या बाबतीत औरंगजेब
In reply to अरे.. by सविता००१
आता
In reply to गाण्यांच्या बाबतीत औरंगजेब by प्रचेतस
काही गाणी सोडली तर मी
In reply to गाण्यांच्या बाबतीत औरंगजेब by प्रचेतस
आता मात्र "कहर" झाला
In reply to अरे.. by सविता००१
:)
In reply to आता मात्र "कहर" झाला by कहर
आँ ????????????????????????
In reply to हो ना. खरंच माहिती नै. by प्रचेतस
सुरेख!!!
आवडले !
बुवा-बुवा-बुवा-बुवा-बुवा
काही
छानच ...
अप्रतिम हो बुवा!!
थोडीशी भर - आसमंती नाचणारी तू
In reply to अप्रतिम हो बुवा!! by अन्या दातार
अतिशय सुरेख
सुरेख.
अप्रतिम!
फार सुंदर लिहिलयेत ! हे
aparna akshay
In reply to फार सुंदर लिहिलयेत ! हे by स्रुजा
आवडतं गाणं !!
सर्व वाचक,प्रतिसादकांचे
In reply to आवडतं गाणं !! by सूड
अहो आभार तर आम्हीच तुमचे
In reply to सर्व वाचक,प्रतिसादकांचे by अत्रुप्त आत्मा
वाह !
_/\_