डोळा लवतो लकी नसतो;
लेखनविषय:
काव्यरस
डोळा लवतो लकी नसतो;
विचारा मला मी सांगतो!
एक सुंदरी शेजारी आली,
हसली आणि 'नाव काय?' म्हणाली;
खुश होऊन बोलायला जातो....
इतक्यात मेला डोळा लावतो!
शब्द घशात अन् स्वप्न ढगात...
कोण म्हणत...
नशीब उघडत डोळा लवण्यात?
गाडी पुढे सरकते.. लग्न ठरते...
लग्नात बायकोची चिकणी मैत्रीण समोर येते...
ओळखिच हसून 'नमस्ते' म्हणते;
मी ही हसतो ... खुशीत येतो...
इतक्यात डोळा परत घात करतो!
हळूच लवतो अन् 'सुहाग रात'ची वाट लावतो.
संसार होतो... एक मुलगी अन् एक मुलगा देखिल होतो;
कालमानाने सर्वच मोठे होतो;
लेकीचा मित्र भेटायला येतो...
लग्नासाठी मागणी घालताना बायकोकड़े बघतो...
अन्.. यावेळी मात्र....
त्याचा डोळा लवतो...
हाय रे किस्मत.. छोकरा त्याला घरातून पळवतो;
कोण म्हणतो...
डोळा लवतो लकी असतो;
विचारा मला मी सांगतो!
वाचने
6191
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
=))
=))
=)
*crazy*
:))
तुफ्फान =))
कसं काय सुचतं ओ तुम्हाला हे असं?
=)) मी तर तुमची फॅन झाली आहे.
In reply to मी तर तुमची फॅन झाली आहे. by अजया
मी पन :) :)
"आंबा पिकतो रस गळतो" च्या चालीवर म्हणून पाहिलं.
-बॅटमॅन आणि कार्यकर्ते, आर्य आम्रप्रेमी मंडळ.
In reply to "आंबा पिकतो रस गळतो" च्या by बॅटमॅन
=))
In reply to "आंबा पिकतो रस गळतो" च्या by बॅटमॅन
अगगागागाग्गागागा =))
In reply to "आंबा पिकतो रस गळतो" च्या by बॅटमॅन
यासाठी आणि यासाठीच्च ळॉळ !
In reply to "आंबा पिकतो रस गळतो" च्या by बॅटमॅन
=))
In reply to "आंबा पिकतो रस गळतो" च्या by बॅटमॅन
तुफ्फान ठ्ठो =))
In reply to "आंबा पिकतो रस गळतो" च्या by बॅटमॅन
@आर्य आम्रप्रेमी मंडळ.>>
ह्या खाटुकाला धरून बुकला रे कुणितरी!
काय खोकलिचा एकेक शब्द प्रसवतो पण! 
ह्या खाटुकाला धरून बुकला रे कुणितरी!
काय खोकलिचा एकेक शब्द प्रसवतो पण! 
In reply to "आंबा पिकतो रस गळतो" च्या by बॅटमॅन
अगगागागाग्गागागा Lol
बोलताना डोळे लवणारा (मारणारा) मित्र आठवला..
त्यामुळॅ कविता ही 'त्या' ला समोर ठेवुन च वाचली .. छान आहे.
अहो,पण माझ्या माहितीत "लवणारी" आहे, आता काय करायचे?
छान.आधी वाचल्यासारखी वाटली
भन्नाट!! कसं काय सुचत हो!!
(No subject)