आई ....
लेखनविषय:
काव्यरस
तळ्याचे नीर दर्पण | विखुरले नभांकण |
वाळलेले नक्षीपर्ण | तरंगीत ||
ढळलेली सांजसंध्या | निजलेले सूर्यपक्षी |
स्वप्नफ़ुले जागलेली | सुगंधीत ||
धरणीची ग्लान झोप | तार्यांचे सूरेल गीत |
उसवले श्वासधागे | अंतरात ||
छतावर रातवैरी | तेवलेला ह्रदयदीप |
शब्दांध झाली आसवे | आठवात ||
-- शब्दमेघ
वाचने
6565
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
अप्रतिम.
आवडली कविता.
__/\__/\__/\__
प्रचंड आवडली _/\_
सुंदर.........व भावपूर्ण.
In reply to सुंदर.........व भावपूर्ण. by जयंत कुलकर्णी
आवड्ली
अशीच एक आठवण : बाहेर काळाकूट्ट अंधार, आत घोंगडीवर मिणमिणत्या चिमणीसमोर आईच्या कुशीत, मिचमिच्या डोळ्यांनी पहाणार्या, रातकिड्यांचा कर्कश्य आवाजात घाबरगुंडी उडालेल्या लहानग्याच्या अंगावर आईचा हात पडल्यावर तो निवांतपणे झोपी जाणारच........
In reply to अशीच एक आठवण : बाहेर by जयंत कुलकर्णी
कविताही आवडली.
In reply to अशीच एक आठवण : बाहेर by जयंत कुलकर्णी
आठवणीतल्या प्रत्येक गोष्टीला लावलेली विशेषणे सुरेख.. त्यामुळे फिल येतो आहे.
बाकी वरील माझी कविता आई नसणार्या मुलाची कहाणी सांगते आहे.
बाकी तुमच्या आठवणीस माझे काही आधीचेच अनुरुप शब्द देतो आहे
नयनांची दोन पिल्ले
आसूसले घरटे
मायेच्या छप्पराला
काळजाची झुंबरे
पापण्यांच्या तोरणाला
अबोल आसवांची घुंगरे
हरवलेल्या ह्रदयतरंगावर
सूर ओळखीचे हळवे
उत्तम...
अप्रतिम.
आवडली कविता.
असेच म्हणते.
काही कवितांना नाव/ शीर्षक दिल्याने ती अधिकच अर्थगर्भ होते, अशी कविता!!!
मिपापर कविताओंके अच्छे दिन आ गये है!
सर्वांचे मनपुर्वक आभार
शब्दांध झाली आसवें - फारच सुंदर!
सुरेख शब्द रचना आवडली कविता
आई...
अप्रतिम लिहिलीयेस रे गणेशा
सुरेख, अतिशय आवडली
पैजारबुवा,
आवडली कविता
शिवाय लय्बद्ध रचना आवडली कविता
आवडली कविता.
अप्रतिम. आवडली कविता.