मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मनगटावर मोगर्‍याचे हार आले

चिमिचांगा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आजकाल मिसळपावावर वधूंच्या वाढत्या अपेक्षा आणि त्यामुळे उपवर तरूणांची होणारी कुचंबणा, हा विषय चांगलाच गाजतो आहे. एवढा की या विषयावरच्या एका धाग्याने प्रतिक्रियांचा इतिहास रचला. खालील काव्यसुमन हे देखिल याच विषयाला वाहिलेले आहे. काही नतद्रष्ट वाचक या कवितेवर या धाग्याचा प्रभाव जाणवतो आहे, असे म्हणतील, त्यांना इग्नॉर मारावे, ही विनंती. मनगटावर मोगर्‍याचे हार आले आज सोळा स्थळांचे नकार आले वेदनांचे मोकळे कोठार झाले पोरगेला तरूण आता मी न उरलो बर्थडे माझे तीसावर चार झाले दोसतांची राहिली ना ग्यांग आता पटापट साले 'दोनाचे चार' झाले संपल्या कलिका नि उरले देठ आता पाहता-पाहता मार्केट 'गार' झाले वाचले ते, जाळूनि सार्‍या आकांक्षा पदरी पडला माल घेऊन 'पार' झाले ! भावना शमण्यास आता 'ती'च गल्ली मनगटावर मोगर्‍याचे हार आले... *

वाचने 13617 वाचनखूण प्रतिक्रिया 49

योगी९०० 02/02/2015 - 13:15
झक्कास...!! खरे तर झक्कास हे या कवितेला...त्यात वर्णन केलेल्या परिस्थितीला नाही.

vikramaditya 02/02/2015 - 13:35
फक्त कवितेच्या शीर्षकातच पंच लाईन दिल्याने 'कॅट ईज ऑलरेडी आउट ऑफ बॅग ' असे वाटते. बाकी - छानच जमले आहे.

कपिलमुनी 02/02/2015 - 15:33
आवडला ! ( सहसा या काव्यगल्लीत येत नाय पण आज मोगर्याचा सुगंधाने आलो ;) )

बहुगुणी 02/02/2015 - 21:46
दाद दिल्याशिवाय राहवलं नाही :-) (अगतिकता हास्य-काव्यात मांडतांना एका मोठ्या सामाजिक समस्येला हात घातलाय हेही नमूद करायला हवं....)

चौकटराजा 12/02/2015 - 05:52
तसं पहायचं झालं तर मराठी कवितेने अनेक वळणे घेत घेत आपला प्रवास चालू ठेवलेला आपल्याला दिसतो.विडंबन कविता, विटंबन कविता, विरोधी कविता, विद्रोही कविता, विखारी कविता, विचारी कविता, चिकासी कविता, विलासी कविता, विलापी कविता अशी अनेक रूपे तिने धारण केलेली आहेत. २०१५ साली विमनस्की कविता हे तिचे नवे रूप रसिकांसमोर आले.जी मूळ रशियन कविता ती चिमीचांगा या चिनी कविने मराठीत आणली. मराठीचा गजलेचा बाज घेउन ती उतरली. पुरूषाला देखील व्यथा असू शकते हे या कविने दाखवून दिले आहे. काही 'अडलेले' बरेच सुप्त कवि येथे सारस्वतात भर घालतील अशी आम्हास खात्री आहे.

चतुरंग 12/10/2015 - 20:50
गजलेत बांधलाय गजरा!! ;) काळजावर आज सोळा वार झाले वेदनांचे मोकळे कोठार झाले पोरगेला मी न आता मुळिच दिसतो प्रकटदिन माझे तिसावर चार झाले दोसतांची राहिली ना ग्यांग आता ढेरपोटे बाप ते लाचार झाले! संपल्या कलिका नि उरले काय आता? 'धोतरा', 'झेंडूच' येथे फार झाले! वाचले ते, जाळूनि सार्‍या अकांक्षा तेरड्याला 'माल' समजुन 'पार' झाले! भावना शमण्यास आता आडगल्ली मोगर्‍याचे मनगटावर हार झाले...

In reply to by चतुरंग

क्या बात है!! मुळ कविता आणि ही गझल.. दोन्ही लाजवाब!! बाकी चतुरंग.. तुम्ही भलतेच मल्टिटेलेंटेड दिसता हो! बुद्धिबळ काय.. मल्लखांब काय.. गझल काय!

हेमंत लाटकर 13/10/2015 - 09:58
जळजळीत सत्य अंवातर: मुलीच्यां अपेक्षा वाढल्यामुळे मुलांचे लग्न अवघड झाले तसेच मुलींचे सुद्धा वय वाढत आहेत.