मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी दिनानिमित्त लघुकथा स्पर्धा

संपादक मंडळ · · जनातलं, मनातलं
दि. २७ फेब्रुवारी मराठी दिन. मायमराठीच्या उत्सवाचा सोहळा यथोचित साजरा करण्यासाठी मिसळपावने दोन उपक्रम आयोजले आहेत. एक म्हणजे मिपावरील नामवंत लेखकांच्या सशक्त लेखणीतून ‘मराठी भाषेतील समृद्धीस्थळे’ सांगणारे बहारदार लेख. ..आणि दुसरा म्हणजे, लघुकथा-स्पर्धा. मराठी दिनानिमित्त, मिसळपाववरील हौशी लेखक आणि सदस्य यांच्यासाठी लघुकथा स्पर्धा जाहीर करत आहोत. या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे राहतील. १. मिसळपाव सदस्यांनी आपल्या कथा, शीर्षक व ‘मराठी-दिन लघुकथा स्पर्धा’ या उप-शीर्षकाने आजपासून दि. २५ फेब्रुवारीपर्यंत मिसळपाववरील ‘जनातले-मनातले’ या दालनात स्वत:च प्रकाशित कराव्यात. २. कथा सुमारे ५०० ते २००० शब्द या शब्दमर्यादेत असावी. ३. स्पर्धकांनी फक्त स्वत:च्याच कथा द्याव्यात, इतर कुणाच्या कथा परवानगी असली तरीही देऊ नयेत. ४. स्पर्धेचा निकाल तज्ञ परीक्षक ठरवतील, जो दि. २७-२-१५ रोजी जाहीर केला जाईल. ५. स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय अशी तीन पारितोषिके दिली जातील. ही पारितोषिके पुस्तके या रुपात असतील. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा !! :)

वाचन 12225 प्रतिक्रिया 37