काळजावर मोगर्याचे वार झाले
लेखनविषय:
काव्यरस
आज डोळा आसवांचे भार झाले
वेदनांचे मोकळे कोठार झाले
दुश्मनांची राहिली ना जरब काही
ओळखीचे चोर येथे फार झाले
देवभोळा साव आता मी न उरलो
दैव माझे यारहो गद्दार झाले
भ्रष्ट का अंधारही होतो अताशा..?
चंद्र तारे कां निशेचे, 'जार' झाले?
आळ घ्यावा ज्यावरी, ना शस्त्र उरले
काळजावर मोगर्याचे वार झाले
वाचले जे झुंजले जगती 'विशाला'
पाठ दावुन धावले ते ठार झाले !
***********************************
(वृत्त:मंजुघोषा)
वाचने
5034
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
अप्रतिम रचना!
जबरदस्त! अप्रतिम!
धन्यवाद :)
क्या बात!
बढिया!!
जसं जशि एकेक ओळ वाचत गेलो, शब्द बंद बंद होत गेले.
__/\__
मन:पूर्वक आभार मंडळी !
पण "दैव माझे यारहो गद्दार झाले" ह्या एवजी "दुर्दैव माझे यारहि गद्दार झाले" हे जास्त शोभुन दिसेल का? सॉरी कवितेतील काहिच कळत नाहि तरीही हिम्मत करतोय....
In reply to खुपच छान by दिपक.कुवेत
दीपकभौ,अहो दुर्दैव 'आपले'असतेच कधी? जेव्हा दैव (नशीब)साथ देत नाही तेव्हाच त्याला दुर्दैव म्हटले जाते. पण इथे (भल्या असो वाईट असो) माझ्या नशीबाने सुद्धा माझी साथ सोडलीय, गद्दारी केलीय माझ्याशी हीच शायराची खंत आहे. धन्यवाद !
भ्रष्ट का अंधारही होतो आताशा!
वाह!!! वाह!!! कुर्निसात स्वीकार करा आझम!! _/\_
In reply to भ्रष्ट का अंधारही होतो आताशा! by कैलासवासी सोन्याबापु
कसचं कसचं बापु *wink*
गझल. आवडली.
ओळखीचे चोर येथे फार झालेहे भारी
धन्यवाद मंडळी :)
दैव माझे यारहो गद्दार झाले
हे खास विकुलीन ष्टाइल !!
व्वा ! क्या बात है ! सुन्दर ! !
छान
आभार्स मंडळी :)
आळ घ्यावा ज्यावरी, ना शस्त्र उरले
काळजावर मोगर्याचे वार झाले
क्या बात है विशल्या! जबरदस्त!!
अप्रतिम रचना!