हाँटींग : मी रात टाकली....
मला क्षणभर वाटले की ते स्वर, ते सुर, ते संगीत , ते शब्द , स्मिताच्या चेहर्यावरचे ते उन्मुक्त, स्वैर भाव नकळत एखाद्या तीराप्रमाणे माझ्यावर झेपावताहेत, माझ्याही नकळत मी त्यांच्या आहारी जातोय. त्यांची शिकार बनतोय. त्याच क्षणी जाणवले 'आपण वंदनाताईंच्या हाँटींगचा अर्थ मुर्खासारखा 'हाँटेड' असा लावला होता चुकून. ते शब्द, ते सुर खरोखर हाँटींग होते. प्रचंड गर्दीतही बरोबर तुमचा वेध घेण्याची ताकद त्या सुरात होती. यापुर्वीही खुप वेळा ऐकलेय हे गाणे मी. पण काल वंदनाताईंनी त्या गाण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी दिली. भानावर आलो तेव्हा अमृताचा परफॉर्मन्स संपला होता. हो, मी त्याला परफॉर्मन्सच म्हणेन कारण ते अमृताचे स्वर कानावर पडत असताना माझ्या डोळ्यासमोर मात्र जैत रे जैतमधली 'स्मिता' होती आणि स्मिताच्या त्या रापलेल्या (चित्रपटातील) चेहर्यावरच्या अवखळ निरागसतेला अमृताचे स्वर कुठेच योग्य वाटत नव्हते. मला वाटले आता नेहमीप्रमाणे कौतुक करुन दोन्ही गुप्ते अमृताला 'नी' नाहीतर 'वरचा सा' असे काहीतरी गुण देणार. पण वंदनाताईंनी धक्काच दिला. मला खटकलेल्या गोष्टीच, म्हणजे नको त्या ठिकाणी शब्दांवर दिलेला जोर, शब्दांचे चुकीचे उच्चार, काही ठिकाणी घसरलेला सुर याबद्दल सांगत वंदनाताईंनी अमृताला शुभेच्छा दिल्या.
मी लगेचच वाहिनी बदलुन टाकली आणि पुन्हा रिमोटशी खेळायला लागलो. पण आता त्या खेळण्यात अजिबात मजा येत नव्हती कारण डोळ्यासमोरच्या विस्तृत कॅनव्हासवर चिंधी आणि कानावर हळुवारपणे येत मनावर कब्जा करणारे ना.धो. महानोरांचे शब्द पिच्छा सोडायला तयारच नव्हते.
कसं होतं ना, बर्याच वेळा आपली अवस्था 'देता किती घेशील दो कराने' अशी होवून जाते. म्हणजे बघा ना, मी म्हणतो मी लताबाईंच्या आवाजाचा भक्त आहे, तेवढ्यात मला जाणवतं की अरे याला बाळासाहेबांचं संगीत आहे जी आपल्यासाठी नेहमीच एक पर्वणी वाटत आलेली आहे, त्या संगीतात रमतोय न रमतोय तोवर लक्षात येतं की अरे हे आपल्या आवडत्या कविचे शब्द आहेत. आपण नकळत त्या शब्दात गुरफटायला लागतो आणि तेवढ्यात डोळ्यासमोर उभा राहतो तो जिवंत, नैसर्गिक अभिनयाचा मुर्तीमंत आविष्कार साक्षात स्मिता पाटील, जरा कुठे स्मिताच्या डोळ्यात हरवून जायला बघावं तर मागे स्क्रीनवरची लिंगोबाची हिरवीगार झाडी, निसर्गाचं ते मनोहारी, नयनरम्य दृष्य खुणावू लागते. अरे माझी झोळी एवढी मोठी नाहीये रे परमेश्वरा. तू देता है तो छप्पर फाडके देता है ये तो सुना था, पण सगळ्या जाणिवांना भेदूनही असं काही हवंहवंसं देवून जातोस हे पहिल्यांदाच अनुभवतोय. मग अलगद मन हळू हळु मागे जायला लागतं. 'जैत रे जैत' बद्दल संबंधित दिग्गज कलावंतांकडून ऐकलेल्या, वाचलेल्या अनेक गोष्टी डोळ्यासमोर फेर धरायला लागतात.
या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळचा अनुभव सांगताना श्री. रवींद्र साठे यांनी सांगितलं होतं ...
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या चालींचं वैशिष्टय़ म्हणजे ती चाल कितीही अवघड वाटली, तरी गाण्याच्या गाभ्याशी किंवा गाण्याच्या भावाशी कधीच हटकून नसते. पण त्यांनी केलेलं प्रत्येक गाणं हटकेच आहे. मी जैत रे जैत या चित्रपटासाठी त्यांच्याकडे पहिल्यांदा गायलो. मी आणि चंद्रकांत काळे आम्ही घाशीराम कोतवाल या नाटकात गात असू आणि जब्बार पटेल यांनी आमचं नाव पंडितजींना सुचवलं. मी रात टाकली या गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं त्यावेळी माझं वय २७ र्वष आणि अनुभवही कमीच. पण ते गाणं झाल्यानंतर खुद्द लतादीदींनी सांगितलं की, खूप दिवसांनी एवढा सुरेल कोरस ऐकला. जैत रे जैत या एका चित्रपटातील गाणी ऐकली, तरी पंडित हृदयनाथांच्या श्रेष्ठत्वाबद्दल कल्पना येते.
गंमत बघा हे गाणं अजरामर झालं त्यात लताबाईंचा वाटा सिंहाचा होता. पण त्यांना मात्र कौतुक गाण्यातल्या कोरसचं. ही सगळी मोठी माणसं इतकी साधी, विनम्र कशी काय राहू शकतात बुवा?
चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. जब्बार पटेल यांनी या चित्रपटाच्या निर्मीती प्रक्रियेबद्दल सांगताना सांगितलं होतं...
काही दिवसांनी बाळासाहेबांचा पुन्हा फोन आला, ‘तुम्ही गो. नी. दांडेकरांची ‘जैत रे जैत’ ही कादंबरी वाचली आहे काय? नसल्यास जरूर वाचा. त्या कथानकात संगीताला उत्तम वाव मिळेल असं मला वाटतं. हवं तर आपण अप्पासाहेब दांडेकरांशी बोलू या.’
मी कादंबरी वाचली. चित्रपटाच्या दृष्टीनं मला ती आवडली. पण मला ही कादंबरी जशीच्या तशी पडद्यावर आणायची नव्हती. मी मुळात नाटकातला माणूस असल्यामुळे त्याचा फॉर्म बदलावा असं मला वाटलं. त्या आधी केलेल्या घाशीराम, तीन पैशाचा तमाशा या नाटकांमुळे या चित्रपटाला पाश्चात्य देशातील संगीतिकेचा फॉर्म देता येईल काय, यावर मी विचार केला. ‘जैत रे जैत’ ची कथा आदिवासी ठाकर समाजात घडते. पाश्चात्य संगीतिकांमध्ये ज्याप्रमाणे सूत्रधार असतो त्या धर्तीवर या चित्रपटात ठाकर समाजातल्याच दोघांना सूत्रधार म्हणून ठेवावं असा विचार झाला. दीदी आणि उषाताई यांनादेखील ही कल्पना आवडली. त्यांनी काम सुरू करायला सांगितलं.
संगीतिकेचं रूप चित्रपटाला द्यायचं असेल तर किमान वीसएक गाणी तरी चित्रपटात घ्यावी लागणार होती. गीतलेखनासाठी ना. धों. महानोर यांना सांगायचं ठरलं. त्या नंतर महानोर आणि बाळासाहेबांसोबत बैठका सुरू झाल्या. ‘प्रभुकुंज’मधल्या छोटय़ाशा खोलीत बाळासाहेब हार्मोनिअम घेऊन बसायचे. महानोर झराझरा गाणी लिहून द्यायचे. बाळासाहेब गाण्याच्या ओळीवर विचार करत डोळे मिटून बसलेयत.. मधूनच त्यांची बोटं हार्मोनिअमवर फिरतायत आणि एकेक चाल ते गुणगुणतायत.. अधूनमधून दीदी, उषाताई याही लक्षपूर्वक ऐकतायत.. चहाचे कप, खाण्याचे पदार्थ यांच्या साथीनं तासनतास कसे निघून जातायत हे कळत नाही. मधूनच बाळासाहेबांनी दुसऱ्या एखाद्या अल्बमसाठी केलेल्या चाली ऐकविल्या की मला हेवा वाटायचा आणि ती चाल आपल्याला वापरता येईल का, असं मी विचारायचो. पण बाळासाहेबांचं उत्तर असे, ‘नाही नाही, तुम्हाला या चालींवर मी तुम्हाला डल्ला मारू देणार नाही.’ तरीदेखील एक चाल मी अक्षरश: ‘ढापली’च.
दीदींसाठी केलेल्या ‘मी रात टाकली’ या गाण्यात एक कोरसचा तुकडा आहे, ‘हिरव्या पानात, हिरव्या पानात..’ ही चाल बाळासाहेबांनी दुसऱ्या एका अल्बमसाठी राखून ठेवली होती, पण ती या गाण्यात वापरावी असा हट्टच मी धरला. अखेर ते राजी झाले.
हे गाणं जर नीट ऐकलं असेल तर त्या कोरसची जादु तुम्हालाही नक्कीच जाणवली असेल. हे गाणं ऐकता ऐकता आपण नकळत त्या सुरात, स्मिताच्या त्या गावरान रुपात स्वतःला हरवत जातो आणि मग त्यातल्या एका एका शब्दाची ताकद आपल्याला कळायला लागते. इथे तर पं. हृदयनाथजींच्या हाताशी महानोरांसारखा शब्दप्रभूच होता. काही म्हणा, पण काही काही योग असे जुळूनच यावे लागतात आणि ते जेव्हा जुळून येतात तेव्हा इतिहास घडतो. 'जैत रे जैत' च्या गाण्यांनी असाच इतिहास घडवला. गोनिदांनी जेव्हा ही कादंबरी लिहीली तेव्हा त्यांना वाटले तरी असेल का? की ही कादंबरी पुढची कित्येक दशके चित्रपटाच्या माध्यमातुन रसिकांना विलक्षण आनंद आणि तृप्ततेची जाणिव देत राहणार आहे. असे म्हणतात की या चित्रपटासाठी महानोरांनी एकुण १९ गाणी लिहीली होती. मला खात्री नाही पण यापैकी प्रत्यक्ष चित्रपटात बहुदा १२ च गाणी वापरली गेली. निदान माझ्या माहितीत तरी तेवढीच आहेत. ही बारा गाणी तुम्हाला खालील दुव्यावरून उतरवून घेता येतील.
जैत रे जैत मधील गाणी
मुळात हा चित्रपट म्हणजे एक छान प्रेमकथा आहे. त्याबरोबरच ती एक सुडकथाही आहे, त्याबरोबरच ती एक सामान्य माणसाच्या जिद्दीचीही कथा आहे. राणीमाशीला नमस्कार केल्यानंतरही ती नाग्याचा डोळा फोडते म्हणून राणीमाशीला उध्वस्त करायच्या जिद्दीने पेटलेला नाग्या, मला पुण्येवंत व्हायचय या इच्छेन पछाडलेला नाग्या, लग्न करीन तर स्वतःला आवडलेल्या पुरुषाशीच म्हणून जिद्द करणार्या, त्यासाठी ठरलेल्या नवर्याला सोडून येणार्या, राणीमाशीने डोळा फोडल्यावरही कुरुप झालेल्या नाग्यासाठी आपले सर्वस्व शेवटी प्राणही पणाला लावणार्या चिंधीची कथा !
असो, थोडा भरकटलोच मी. आपण बोलत होतो... चिंधीबद्दल, खरेतर मी रात टाकली.." या अजरामर गाण्याबद्दल....!
शब्द अर्थातच ना.धों.महानोरांचे, संगीत पं. हृदयनाथ, स्वर साक्षात कोकिळेचे पण या गाण्यात आपल्याला वेड लावतो तो रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे यांचा कोरस !
मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली
लताबाई बेधुंद करत गात असतात. आपल्या डोळ्यासमोर असते चिंधी. मुक्त आणि मनस्वी स्त्रीचा एक मुर्तीमंत आविष्कार. मला आवडेल त्या पुरुषांचीच होणार अशी ठामपणे सांगनारी चिंधी. आपल्या नवर्याला सोडून आपल्या प्रियकराच्या शोधात निघालीय. आपला भुतकाळ तीने मागेच कुठेतरी सोडून दिलाय. जो कधी आपला वाटलाच नाही, त्या मोडक्या संसाराबद्दलची आसक्ती, लाज कधीच सोडून दिलीय. जुनाट झालेली कात टाकून देवून नागीण जशी नव्या रसरशीतपणाने पुढचे आयुष्य जगायला सिद्ध होते तशी तिने आपली जुनी जिनगानी त्यागून टाकलीय. तिला जगाची फिकर नाही, तथाकथित रुढी परंपराची चाड नाही. या क्षणी ती फक्त एक प्रिया आहे, आपल्या प्रियकराकडे मिलनाची मागणी करणारी एक प्रेमवेडी प्रेयसी.
इथे आपण लताबाईंच्या सुरात गुंतत जात असताना अचानक कानावर कोरसचे सुर घुमायला लागतात. स्पेलबाऊंड म्हणजे नेमके काय असते त्याचा जिवंत अनुभव देणारी ती जाणिव असते. जैत रे जैत हा संपुर्ण चित्रपट पटेलांनी सुत्रधाराच्या नजरेतुन आपल्यासमोर मांडलाय. हे सुत्रधारच आपल्यालाच नाग्या आणि चिंधीची कथा गाण्यांमधुन सांगत जातात. एखाद्या संगीतीकेसारखी ही कथा आपल्यापुढे उलगडत जाते.
हिरव्या पानांत, हिरव्या पानांत
चावंळ चावंळ चालती...
भर ज्वानीतली नार
अंग मोडीत चालती....
खुपदा कसं होतं ना... काही गोष्टी अगदी अलवारपणे आपल्याला येवून भिडतात. त्या आपल्याला येवुन भिडेपर्यंत आपल्याला त्यांची जाणिवही होत नाही. हिरव्या गवतात नाही का, कसली तरी सळसळ कायम जाणवत असते, कुठलीतरी चाहूल कानावर येत असते, पण दिसत मात्र काहीच नाही. एखादी नागिण आपल्या शरीराला नागमोडी झोके देत सळसळ करत गवतातून निघुन जाते, आपल्याला दिसत नाही पण तिचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवत राहते. इथे महानोरांनी चिंधीच्या चालण्यात तीच अदा, तीच नजाकत तर जाणवली नसेल. खरेतर गाण्याचे बोल पाहता हा प्रसंग खुप मादक करता येवु शकला असता. स्मितासारखी देखणी, रुपगर्विता त्यात अभिनयसम्राज्ञी जब्बारजींच्या दिमतीला हजर होती. पण जब्बारजींनी तो मोह आवरलाय. इथे स्मिता 'चिंधी'च वाटते. तिच्या चालण्या-बोलण्यातून चिंधीची गावरान तरीही अवखळ अदाच समोर येत राहते. त्यामुळे चिंधी कुठेही मादक वाटली तरी अश्लील वाटत नाही. हे जब्बार पटेलांच्या दिग्दर्शनाचे आणि स्मिताच्या अभिनयाचे यशच म्हणावे लागेल.
ह्या पंखांवरती , मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाई , चांदन्यात न्हाती
सगळे पाश मागे सोडून चिंधी निघालीय आपल्या प्रियकराला भेटायला. जणू चांदण्याचे पंख लावून त्यावर नीळेशार आभाळ पांघरून. आता त्या संसाराच्या चार भिंतींची बंधने नाहीयेत, उंबरठ्याचा अडसर नाहीये. एखाद्या मुक्त मोरणी (लांडोरी) किंबहुना आनंदाने बेधुंद होवून नाचणार्या मोरासारखी ती आपल्या प्रियाशी मिलनाच्या आनंदाच्या शीतल चांदण्यात न्हातेय. विरहाचे उन्ह कधीच ओसरलेय आता फक्त त्याच्या मिठीत लाभणारी गोड, आश्वासक शीतलता.
अंगात माझिया भिनलाय ढोलिया
मी भिंगर भिवरी, त्याची गो माल्हन झाली
मी बाजिंदी , मनमानी , बाई फुलांत न्हाली ....
तिच्या तना-मनात, गात्रा-गात्रात तिचा साजण भिनलाय. इथे नाग्या हा ठाकरवाडीचा ढोलिया आहे. म्हणजे देवाचा प्रतिनिधी. चिंधी पुर्णपणे नाग्यामय झालीय. स्वतःचे असे काही अस्तित्वच उरलेले नाहीये. गंमत बघा स्वतःच्या नवर्याला, स्वतःच्या संसाराला सोडून येण्याची प्रचंड हिंमत असलेली ही भिंगर भिवरी प्रत्यक्षात मात्र आपल्या प्रियकरासाठी सर्वस्व सोडायला निघालीय. चिंधीचं हेही एक वैशिष्ठ्य आहे. प्रत्यक्षात ती अतिशय स्वतंत्र मनोवृत्तीची, बंडखोर स्वभावाची स्त्री आहे. आपल्या विचारांसाठी, आवडी निवडीसाठी सगळ्या जगाशी झुंजण्याची ताकद तिच्यात आहे. पण हि सगळी ताकद, हे सामर्थ्य तिला तिच्या नाग्यावरच्या प्रेमाने दिलेले आहे. त्याच्या प्रेमासाठीच ती एवढी हट्टी, मनमानी करणारी झाली आणि आता त्याच्याच प्रेमामुळे ती स्वतःला विसरून त्याच्यात सामावून जाऊ पाहतेय.
ना. धों. तुम्ही खरोखरच ग्रेट आहात. मुळात चिंधीचे हे जगावेगळे पात्र उभे करणारे गोनिदा महान. त्या चिंधीला तिचा खराखुरा चेहरा देण्यासाठी धडपडणारे जब्बार पटेल महान, तिला तिचं अस्तित्व मिळवून देणारी स्मिता महान.....
" जैत रे जैत" च्या माध्यमातून ही संगीतमय मेजवानी आपल्याला देणारे मंगेशकर कुटूंबीय महान ! तुम्ही लेख वाचा, कसा वाटला ते सांगा, मी जातोय पुन्हा एकदा 'शिकार' व्हायला, या 'हाँटींग' गीताची !
हा अनुभव हवाच असेल तर ....
तूनळीवर इथे पाहा !
https://www.youtube.com/watch?v=ZsvfFniNrUY&
विशाल...In reply to जबरदस्त,,,, by मुक्त विहारि
In reply to मुक्तक मस्तच आहे हो. by हाडक्या
In reply to काडी टाकूनही (खरेतर खरे by हाडक्या
In reply to तुमचा आक्षेप नक्की कशाबद्दल by विशाल कुलकर्णी
हे गाणं जर नीट ऐकलं असेल तर त्या कोरसची जादु तुम्हालाही नक्कीच जाणवली असेल. हे गाणं ऐकता ऐकता आपण नकळत त्या सुरात, स्मिताच्या त्या गावरान रुपात स्वतःला हरवत जातो आणि मग त्यातल्या एका एका शब्दाची ताकद आपल्याला कळायला लागते. इथे तर पं. हृदयनाथजींच्या हाताशी महानोरांसारखा शब्दप्रभूच होता. काही म्हणा, पण काही काही योग असे जुळूनच यावे लागतातमाझा प्रतिसाद सगळ्या गोग्गोड अशा प्रतिसादकांना आणि इथे वाचून गप्पपणे पुढे जाणार्या दांभिक मिपाकरांना होता जे अशाच प्रकारच्या संक्षीच्या लेखाची लांडगेतोड करायचे आणि त्यांनी उत्तरे द्यायला सुरुवात केली की मग पिसे काढायचे. संक्षी साधे होते अशातला भाग नाही (त्यांच्यासाठी कोणतीही सहानुभुती नाही) पण लोकांचा दुजाभाव जाणवून येतोय तो मी स्पष्ट मांडला इतकंच. हेच नव्या लोकांच्या बाबतीतही घडतं. कोणी लिहिलंय हे पाहून प्रतिसाद देणार्यांची चीड येते आणि इथे इतरांच्या मौनाचा अर्थ एकप्रकारे मी म्हणालो ते बरोबर होते असाच होतो. (परत सांगतो, व्यक्तिशः तुमच्याबद्दल आणि तुमच्या लिखाणाबद्दल काहीही आक्षेप नाही. तुमच्याकडून काहीही अपेक्षित नाही.) फक्त दांभिकपणाची चीड येते आणि ती व्यक्त करणारे (सगळेच मिपाकर) इथे तेच करताना पाहून गप्प बसणे मला पटले नाही. बाकी वाटल्यास संमं (नेहमीप्रमाणे) "अयोग्य" प्रतिसाद उडवू शकतेच. :)
In reply to तुमच्याबद्दल नाहीये हो.. by हाडक्या
In reply to काडी टाकूनही (खरेतर खरे by हाडक्या
In reply to हाडक्या यांच्याशी सहमत आहे. by जेपी
In reply to जेपी,दुसरीकडे लिहिलेले इथे by विशाल कुलकर्णी
In reply to असा काय नियम नाय. by जेपी
In reply to येवु द्या ना. ज्यांनी वाचले by विशाल कुलकर्णी
In reply to हाडक्या यांच्याशी सहमत आहे. by जेपी
In reply to पाल्हाळीक. by प्रभाकर पेठकर
In reply to ते गाण्याचं रसग्रहण नाहीये by विशाल कुलकर्णी
In reply to सोडून द्या. by प्रभाकर पेठकर
In reply to ज्याला तुम्ही परखड मत म्हणताय by विशाल कुलकर्णी
'शब्दबंबाळ' शब्दाच्या माझ्या व्याख्या, तुमच्या व्याख्या, ह्यांच्या व्याख्या, त्यांच्या व्याख्या अशा वेगवगळ्या नसतात.
तुमच्या प्रतिसादावरून तरी तसेच दिसतेय.In reply to ज्याला तुम्ही परखड मत म्हणताय by विशाल कुलकर्णी
In reply to ज्याला तुम्ही परखड मत म्हणताय by विशाल कुलकर्णी
In reply to मला, एक सांगा विशाल कुलकर्णी, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to चालायचेच बापु ! आणि पुन्हा by विशाल कुलकर्णी
चालायचेच बापु ! आणि पुन्हा त्याला विरोध करावा तर तुम्हाला फ़क्त वा वा वालेच प्रतिसाद हवेत हां आरोप आहेच."चालायचेच " असा मानभावीपणा करून एकप्रकारे "तुम्हाला फ़क्त वा वा वालेच प्रतिसाद हवेत" हा मुद्दाच सिद्ध करताय. तरी पण, मला जरा जास्त अलंकारीक निबंधासारखा वाटला एवढीही टिका जर चालणार नसेल तर असोच. @सोन्याबापू,
तुम्ही अक्षता वाटने बंद करा बुवा! कमेंट करायला अक्षता वाटू वाटू लोकांस बोलवता तुम्ही असे काहीसे फीलिंग आले मला!!एकतर धागा माझा नाही आणि ना धागाकर्ता माझा कुणी मित्र/ शत्रु आहे की मी अक्षता वाटाव्यात.. ( आणि तसे जर तुम्हाला वाटतच असेल तर) तुम्हाला नको असतील तर तुम्ही पुढे होऊ शकताच की. हे पब्लिक व्यासपीठ आहे, इथे काय आमंत्रण पत्रिका छापत नाहीत "या" म्हणून. आणि हो, फक्त "चान चान" म्हणावे अशी कोणाची इच्छा असल्यास तसा ढिस्केलमर टाकतील ते, तुम्ही उगी चिंता नका करु राव.
इकडे येऊन एक असे मेंबर ज्याना आपण ओळखत नाही, लोक त्यांची कशी लांडगेतोड़ करत ह्यावर भाष्य करणे, हे कसे संयुक्तिक झाले??जर इथे काही घटना झाली असेल आणि त्यावर अगदी धागे काढून चर्चा झाली असेल तर त्या अनुशंगाने भाष्य करणे अजिबात असंयुक्तिक ठरत नाही. जर लेखावर प्रतिक्रिया देऊन नंतर लोकांच्या दांभिकपणाबद्दल मत-प्रदर्शन केले असेल तर तुम्हाला खटकण्यासारखे काय आहे त्यात ?
फक्त दांभिकपणाची चीड येते आणि ती व्यक्त करणारे (सगळेच मिपाकर) इथे तेच करताना पाहून गप्प बसणे मला पटले नाही. बाकी वाटल्यास संमं (नेहमीप्रमाणे) "अयोग्य" प्रतिसाद उडवू शकतेचअसे सढळपणे लिहिले आहेच की. अजून काय संमंला पण अक्षता द्यायच्या काय, तुमच्या भाषेत ?
१. वाईटातुन चांगले शोधणे (अर्थात इथे मुद्दलच नितांत सुंदर आहे) २. उठसुठ टिका करणे! ह्याहून घातक एक तीसरी वृत्ती असते!!!, "आव आणुन पिंका टाकत बसणे" ! ह्या परी काय बोलावे!!!फार काही टिका करतोय असा उद्देश नाही हे लेखकास स्पष्ट लिहिलेय (काय पटलं नाही ते पण लिहिलेय.) पण हे घातक वगैरे लेबले लावायचं काय कारण ? तुम्हीच इथे आव अणून पिंका टाकताय असेही म्हणू शकतो की राव. आणि कोणत्याही मताला असली "घातक" वगैरे विशेषणे लावून नक्की काय सिद्ध करताय? लोकांनी "चान चान" शिवाय काही बोलूच नये ? मग त्या मोजींच्या किंवा त्यांच्यासारख्या लेखकांच्या धाग्यावर टिका करणार्यांना बोला की मग. त्यांनी काय लिहिलेय ते पण अगदी "त्यांच्या जीवन परिप्रेक्ष्याचा व्यामिश्र आरसा असेल" तुमचीच बुद्धी ते समजायला कमी पडत असेल असे सांगा ना त्यांच्यावर टिका करणार्यांना. तसाही मुद्दा तो नाही. लोकांच्या दांभिकतेबद्दल टिका केली तर तुम्ही "घातक वृत्ती" वगैरे म्हणण्याचे काही प्रयोजन नाही. तुम्हाला माहित नसतील संक्षी, मोजी आणि इतर तर अभ्यास वाढवा. नसेल वाढवायचा तर जे नेहमी करता ते करा, इतरांना टिका केली म्हणून घातक वगैरे लेबले लावत फिरू नका.
In reply to तू लिही विशाल. by प्रचेतस
In reply to खूप छान! by पैसा
In reply to अजिबात नाय. by प्रचेतस
In reply to काय की! by पैसा
In reply to आपल्याला अत्यंत आवडणार्या by अनुप ढेरे
In reply to खूप छान! by पैसा
जेव्हा मोठा भगत( निळू फुले) लहानग्या नाग्याला समुद्रकिनार्यावरुन लिंगोबाचा सुळका दाखवत आहेत. तेव्हढी एक स्थळाची गल्लत त्यांनी केली. बाकी चित्रपट पूर्णपणे निर्दोष.समुरकिनार्याची गोष्ट कधीच नोटिस केली नव्हती हो . :) शाळेत असताना पुस्तक वाचले तेव्हा तसे इतर पुस्तकांसारखेच वाटले होते. यावर हा चित्रपट आहे हे जेव्हा कळाले तेव्हा प्रथम आश्चर्य वाटले होते. पण चित्रपट देखील सुंदर झालाय. बाकी असले चित्रपट कधीतरीच जमून येतात हे पण तेवढंच खरं. :)
जबरदस्त,,,,