लग्नाचे बंध होती पुरुषाचे भोग आता
काव्यरस
आमच्या मित्राने एक बाजू मोठ्या कळकळीने मांडली.
त्याच्या भावनांशी बर्याच अंशी सहमत होताना नाण्याची दुसरी बाजूही समोर यावी असे वाटले.
पुरुषांची बाजू मांडण्याचा केलेला हा केविलवाणा खाटाटोप म्हणाना....
प्रत्येक नजर वाटे
गिळते मी तूज आता
लग्नाचे बंध होती
पुरुषाचे भोग आता ||धृ||
हक्क कितीक आले
आरक्षणेही आली
बळे वेगळे पणाची
टूम ही निघाली
गलक्यात मुक्ततेच्या
कोंडतो श्वास येथे
एकटेपणात होतो
भलताच भास येथे
शोधता स्नेह नयनी
दिसतेच चूक आता ||१||
सामोरी लांडग्याच्या
गत होई कोकराची
पाणी पिण्या मिळेना
दहशत लाटण्याची
एकही सुरेख चेहरा
ना हृदयास दे अधार
त्या वरी टोमण्यांचा
दिनरात भडिमार
सगळा समाज वाटे
झालाय शूक आता ||२||
प्रत्येक नजर वाटे
गिळते मी तूज आता
लग्नाचे बंध होती
पुरुषाचे भोग आता
अरतत्रप
वाचने
6406
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
जबर्याच.
=)) =)) मेलोच
In reply to =)) मेलोच by स्पा
ह्ही ह्ही ह्ही =))
पां डुब्बा मेला! =)) / मग मी जगलोच! =))
एक्सलंट ! :) :)
काय मांडलीयत बाजू !
आवडलीय जाम ! हाहाहा खत्री !
ही ही ही!
=))
*lol* *LOL* :-)) :))
काही नाही. सर्व पुरुषांनी आता नील स्ट्राउस चे "रुल्स ऑफ द गेम" आणि रॉस जेफ्रीचे इथे नाव न सांगता येणारे पुस्तक (व्यनि करावा) वाचुन अंमलबजावणी करायची वेळ आली आहे.
लै भारी!
उ.न.क. बंद झाली काय???
समस्त पुरूषांचे मनोगत मांडलय !!
लयच भारी बुवा!!१
जबरी =))
जबर्याच.