सामंत
लेखनविषय:
'गांधी येडा होता रे'
सामंत नेहमी म्हणतो
आणि मग
फोडला पायजे...XXत दम...ईस्रायल...
असं कायकाय बोलत राहतो
दोन पेग चढवलेले असतील तर सामंत अध्यात्म, सेक्स, मायन संस्कृती, काश्मीर प्रश्न यावर पण बोलतो
'नेहरू एक्झॅक्टली कुठे चुकला' हे सांगतो मग तो.
सामंतला ब-याच गोष्टींबद्दल माहिती असते
....वरवरची
आणि माहिती नसलेल्या गोष्टींबाबत सामंत
'अमेरीकेचा गेम आहे सगळा' असं म्हणतो
अमेरीका नक्की काय करते ते त्यालाही माहिती नसतं
पण त्याने त्याला काही फरक पडत नसतो
खरंतर,
कुणालाच काही फरक पडत नसतो
कारण 'अमेरीका गेम करते' म्हणल्यावर सगळे माना डोलावतात.
सामंत बोलतो...
माहिती असो वा नसो
...सामंत बोलतो
आणि
बेधडक आपली मतं ठोकून मोकळा होतो
सामंत नेहमी घाईत असतो
त्यामुळे त्याला विचार वगैरे करायला वेळ मिळत नसावा
सिग्नलला पण तो हिरवा दिवा लागायची वाट बघत नाही
शेवटचे दहा सेकंद बाकी असतानाच गाडी दामटतो
पोलिसांनी पकडलं तर शंभराची नोट देऊन सुटतो
आणि मग पोलिस कसे पैसे खातात हे ऎकवतो
पण सामंतला एकूणच सिस्टीमच्या विरोधात वागायला बोलायला आवडतं
आणि लोकांनाही आवडत असावं...
सिस्टीमच्या विरोधात कोणी बोललेलं
सामंत सगळीकडे असतो
आॅफिस मधे, लग्नकार्यात, सोसायटीच्या मिटींगमधे, हाॅटेलात आजूबाजूला सगळीकडे
कधी कधी तर
मला सामंत माझ्यात असल्याचा पण भास होतो
कारण मी ऎकलंय मला बोलताना...'गांधी येडा होता रे'
वाचने
6210
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
भारी!
कडकच
पण सामंतला एकूणच सिस्टीमच्या विरोधात वागायला बोलायला आवडतं आणि लोकांनाही आवडत असावं... सिस्टीमच्या विरोधात कोणी बोललेलं*BRAVO* *good*
छान कविता. आवडलीच. लखू रिसबूडची आठवण झाली.
In reply to छान कविता. आवडलीच. लखू by आदूबाळ
लखू रिसबूडची आठवण झाली. >> +++++१११११
एकदम परफेक्ट.फर्स्टक्लास.
भारीये... :)
छान
कडक
जबरदस्त ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }अतिशय छान कल्पना आहे.
जबरी ...
एकदम शॉल्लीट्ट..
जबरदस्त लिहिलंय!!
(आ)सामंत व्यापणारी कवीता..
कविता मस्त आहे.
वसंत बापटांच्या "सावंत" या कवितेची आठवण झाली!
मस्त
गांधी येडा होता रे असे म्हणनाऱ्यांची या देशात काही कमी नाही. तुम्ही आम्ही सारे सारखेच.
कविता छान. सामंत य व्यक्तीरेखेद्वारे तुम्ही कॉमन माणुस दाखवलाय असे वाटत असतानाच तसाच शेवट तुम्ही केला हे पाहुन आनंद वाटला.
फक्त गांधी येडा होता रे हे सोडले तर असेच भाव माझ्या ही मनात नेहमी असतात
फार दिवसांनी तुमची कविता वाचायला मिळाली.. खणखणीत..
जबरदस्त कविता.आवडलीच.
कवितेचा आशय आवडला.
मस्त हो.. अगदी चपखल..
मस्तच रे चाणक्या.
मजा आली वाचताना...भेटा एकदा एफ्.सी. वनला चहाला :)
In reply to मस्त कविता by राजेंद्र मेहेंदळे
अहो आमची उचलबांगडी झाली फेज १ ला. कधी आलात ईकडे तर फोन करा.
कविता आवडली.
सामंत अंतर्मुख होतो त्याबद्दलही लिहायचं होतत हो! कधी कधी अगदी कळवळतो देखील...
:-)
सामंत! लय भारी!
जिंकलत!!!!
भारी!