मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निंगे सासरी ...

ऊध्दव गावंडे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
निंगे सासरी नवरी मनी फाटलं अभाय नोता निंगता निंगत कसा घरातुनं पाय १ भिरं भिरं लानं भाऊ फिरे तिचया पाठी मांगं घळी घळी पुसे तिले आजं कुठी जातं सांगं २ केला साजं शिनगारं जशी लक्षमी नटली जाता माय बापा जोळं घऴी डोयाची फुटली ३ टाके दमनीतं पायं डोया पाये घराकळे फुलं पानं तोरनाचे आता सोकाउनं गेले ४ उभी आंगनात मायं हाती डाबलं कुकाचं टाके खुरावरं पानी डोयातलया आसवाचं ५

वाचने 10073 वाचनखूण प्रतिक्रिया 46

In reply to by यसवायजी

ही वर्हाडी भाषा आहे , विदर्भात वर्हाड़ प्रांतात (अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ) ह्या पाच जिल्ह्यात बोलली जाते! विठ्ठल वाघ सरांचे "काया मातीत मातीत तिफ़न चालते" ह्याच भाषेतले! , गाडगे बाबांचू ओरिजिनल ग्रामोद्धाराची अख्याने ह्याच भाषेतली, रोजच्या वापरात सर्वाधिक संस्कृत शब्द असणारी भारतातल्या अनेक बोली पैकी एक, माझीही मायबोली!! :)

In reply to by अजया

होय आमच्याकडे वर्हाडात दमनी म्हणतात , पश्चिम महाराष्ट्रात बहुदा छकडा म्हणतात त्याला , बांबु च्या तट्ट्या ने बंद केलेली "पैसेंजर वर्शन बैलगाड़ी" ३ प्रकार असतात १. मालवाहू असते ती "बंडी" किंवा "बैलबंडी" २. प्रवासी वाहतुकीसाठी असते ती किंवा हलके सामान (सरपण, ओला चारा, थोड़ा बाजार माल इत्यादी) न्यायसाठी वापरतात ती "दमणी" ३. शंकरपट उर्फ़ बैलांच्या शर्यतीसाठी वापरात येते ती "रिंगी" , ही आकाराने फारच लहान असते, शंकरपटाचा सीजन नसता पेरणी च्या वेळी ही एखाद ख़त/बियाण्याचे पोते , फाळ, डवरे(कुळव) इत्यादी न्यायला पण वापरली जाते रिंगी

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

चिगो Tue, 01/27/2015 - 23:44
रेंगी/रिंगी म्हणजे आमच्याकडे (नागपूर) अर्धगोलाकार छताची बैलगाडी. प्रवासी वाहतुकीसाठी, खासकरुन बायाकांकरीता वापरली जायची. जुन्या मराठी चित्रपटात दिसते ही..

सौन्दर्य Tue, 01/27/2015 - 20:29
खूप छान कविता, डोळ्यात उगाचच (?) पाणी. इतक्या कमी शब्दात सासरी निघालेल्या मुलीचे, तिच्या आईवडिलांचे, धाकट्या भावाचे भावविश्व फार सुंदर चीतारलेत. ही भाषा कानाला फार गोड वाटते. 'फुलं पानं तोरनाचे आता सोकाउनं गेले' ह्यातलं सोकाउन म्हणजे सुकून का ? 'आईच्या हातातली कुंकवाची करंडी आणि डोळ्यातील पाणी' लाजवाब. असेच लिहित रहा आणि आम्हाला आनंद देत रहा.

ऊध्दव गावंडे Tue, 01/27/2015 - 21:08
धन्यवाद ! मित्रानो... माझ्या प्रथम पदार्पणा ला आपण सगळ्यांनी जो प्रतिसाद दिला त्या बद्दल आभारी आहे . आणि सोन्या बापु... तुमी तं राजे हो मायं वझं च हलकं केलं. बरं केलं! धन्यवाद !

In reply to by ऊध्दव गावंडे

मंग गळ्या उद्धव राव! ना कराव का! तशेच त सारे म्हणते तुमच्या इकळे "सहकार" नसते! मंग म्हणले चाला बाप्पा असाच सहकार काराव सुरु! नाई सायाची साखरीची फैक्ट्री त कवितेचाच अर्थ समजावावा न बापा लोकाईलर!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीरंग_जोशी Tue, 01/27/2015 - 22:24
बाप्पा बाप्पा, कित्ती वर्षांनी वाचाले भेटली आपली बोलीभाषा. भल्लाच खूष झालो ना मी. आयुष्याची पहिली २० वर्षे ही बोलीभाषा ऐकूनही आज मी सराइतपणे बोलू शकत नाही याचे वाईट वाटते. गावाकडे सलग ८-१० दिवस राहिल्यास नक्की बोलू शकीन. मागे लोकसत्तेत वाचलेला एक प्रसंग. स्थळ: न्यु यॉर्क प्रसंग: नोकरीची मुलाखत मुलाखत घेणारा अधिकारी - Where are you from? उमेदवार युवकः India. sir. अधिकारी: अरे भाई, इंडिया में कहा से? युवकः महाराष्ट्र, सर. अधिकारी: अरे महाराष्ट्रात कुठून? युवकः नागपूर, सर. अधिकारी: बाप्पा.... बाप्पा... बम दूर आला नं बे तू... युवकः हव ना सर.

In reply to by श्रीरंग_जोशी

चिगो Tue, 01/27/2015 - 23:47
लाखत घेणारा अधिकारी - Where are you from? उमेदवार युवकः India. sir. अधिकारी: अरे भाई, इंडिया में कहा से? युवकः महाराष्ट्र, सर. अधिकारी: अरे महाराष्ट्रात कुठून? युवकः नागपूर, सर. अधिकारी: अबे, खर्रा काढ ना बे मंग भडकन.. ;-)

In reply to by यसवायजी

आदूबाळ Wed, 01/28/2015 - 18:31
अधिकारी: या, राजे! एवढ्या लांबवरून आमच्याकडेच आलात नेमके! (गाव सांगायला पायजे काय?) ;) चिगो - खर्रा म्हणजे सुकी सुपारी ना? की माव्यासारखा त्यात तंबाखूचा अंशही असतो?

In reply to by आदूबाळ

खर्रा म्हणजे ज्याला पश्चिम महाराष्ट्रात मावा म्हणतात तो! खुप जास्त वैविध्य आहे विदर्भात अन नागपुरात ह्या प्रकाराचा , सुपारी कच्ची का शेकी (भाजकी), किवाम अथवा गुंजेचा पाला हवे का नको, पाण्याचा बिनपाण्याचा, नागपुरी खर्रा विशेष प्रसिद्ध, खर्रा अन घोटा वेगळे असतात, लाकडी खडबडीत पट्टी वर पातळ पॉलिथीन मधे मिक्स करुन रगडून बनवलेला असतो तो घोटा, अन त्या पॉलिथीन ची पुरचुंडी तळहातावर घासून बनवतात तो घोटा!!! मायला!! आठवणी जाग्या झाल्या!! :D

इन्दुसुता Wed, 01/28/2015 - 09:35
इतक्या कमी शब्दात सासरी निघालेल्या मुलीचे, तिच्या आईवडिलांचे, धाकट्या भावाचे भावविश्व फार सुंदर चीतारलेत.
अगदी हेच. कविता अतिशय आवडली.

In reply to by शब्दबम्बाळ

ऊध्दव गावंडे Wed, 01/28/2015 - 23:00
होय ! आहेत पण मला कदाचित् लिहिताना शक्य झाले नाहीत.उदा. "घळ्ळी "डोयाची फुटली, घळ्ळी म्हणजे मातीचे मोठे मडके.

In reply to by ऊध्दव गावंडे

श्रीरंग_जोशी Wed, 01/28/2015 - 23:30
लहानपणी शाळेतले अनेक मित्र मला सिर्रंग म्हणून हाक मारायचे. :-) आज अनेक वर्षांनंतर असे कुणी म्हंटले असेल. मनःपूर्वक धन्यवाद.