आय पील भाग -२
The problem with I -pill is the way it is presented to population through ad blitz.
It is an implement with its own complications few known today and few not known for now. The biggest of them is its extensive use as contraceptive than remedy to contraceptive failure once in a while. It is used by married/ unmarred couples like an aspirin tablet for headache.
माझा मिपा वरचा वावर सूक्ष्मपणे न्याहाळणार्या माझ्या एका डॉक्टर सहकार्याचे हे मत. .
....... ह्या औषधाचा उपयोग खालीलप्रमाणे.
१. स्त्री बिज थांबविणे
२.स्त्री बिज असेल तर त्याचा शुक्राणूशी मिलन थांबविणे.
३.मिलन झाल्यास त्याचे गर्भाशयाच्या भिंतीवर रोपण थांबविणे.
ह्या गोळीचा उपयोग ७२ तासानंतर नसतोच.ही गर्भपात गोळी नव्हे.गर्भधारणा झाल्यावर ह्या गोळीचा काही उपयोग नाही.
कंडोम कसा वापरावा हे बरोबर माहित असणार्या जोडप्याना ह्या गोळीची गरज लागत नाही. कंडोम ची क्वालीटी बरोबर असेल आणि तो नीट वापरायचे शास्त्र माहीत असेल तर तो फाटेल कसा?
सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे वैवाहिक जीवन उपभोगताना त्यातले रुटिनने येंणारी घाई. घाई ने होणारा घात. ऐनवेळी पाकीटाची शोधाशोध हे सर्वात मोठे कारण असावे. लढाईला जाताना शत्रू समोर आल्यावर ढाल शोधण्यासारखे झाले.
लग्न न झालेल्याची कथा तर वेगळी. सगळाच चोरटा कारभार. घाई तर पाचवीला पुजलेली. त्यामुळे होणार्या अपघाताची संख्या जास्त.
नवरात्रीत एका दिवसात अनेक वेळा पील घेतलेल्या विरांगना पण असतात.
तरुणाई विक्रमाच्या मागे असते. प्रत्येक वेळी तुच माझा पहिला, तुच माझी पहिली ह्याची ग्वाही दिली जाते. आणि प्रसाद वाटला जातो एच आय व्ही सारख्या भयानक रोगांचा. काही वेळा असे रोग लग्नानंतर डोके वर काढतात होणारी मुले पण अडकतात ह्या जालात.
अर्थात ही गोळी जाहिरातित दाखवतात तशी १००% यशस्वी नसते. ही गोळी घेतल्यामुळे ऍक्टोपीक(नळीमधली गर्भधारणा)होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाजारपेठेत जी उत्पादने मान्यता प्राप्त करतात त्या उत्पादनात तत्कालीन सामाजीक मानसीक मतप्रवाह प्रतीबिंबीत होतो.१)सहज उपल्ब्धता,२) तात्काळ उपयोग ,३) तात्काळ निचरा, या निकषात बसणारी उत्पादनं सध्या सहज खपतात.
आयपील या औषधाबद्दल जेव्हा मी वाचलं तेव्हा तीनही निकष या उत्पादनाला लावून बघीतले.
संतती नियमन या कॅटेगरीत स्वस्तात स्वस्त माला-डी, निरोध , तांबी ही साधी सोपी साधनं उपलब्ध असताना लोकं आय पील सारखी फायर एक्झीट राज मार्गासारखी का वापरतात हा मोठा प्रश्न मला पडला होता.
मालाडी घेणं म्हणजे रोज गोळी घेणं .सातत्याची जबाबदारी ज्यांना नको असते त्यांना ही कटकट
वाटते.सातत्य ही कटकट अशासाठी की की सध्या अनेक कारणांमुळे लैंगीक सबंधच सातत्यानी येत नाहीत/होत नाहीत.
(महीन्यात एकवीस तोफांची सलामी देण्याचे दिवस संपले.)
जर पंधरा दिवसानी एकदा किंवा महीन्यातून एकदा एकत्र येणे होत असेल तर तीस दिवस गोळी का घ्यायची
२ मानसीक तणाव किंवा इतरही काही कारणामुळे उद्दीप्पनाचे त्रास असतात.ऑफीसमध्ये स्वप्नरंजन आणि घरी आल्यावर ऑफीसच्या ताणाने रसभंजन होते. अशा वेळी रॅपर फोडणे, कंडोम तपासणे आणि वापरणे यात जेव्हढा वेळ जातो त्या वेळात शैथील्य येते त्यामुळे कंडोममध्ये हवेचा बुडबुडा राहतो आणि कंडोम फाटतो. ही पुरुषांची समस्या आहे.
३ संतती नियमनाचे इतर नैसर्गीक प्रकार तर बोलायलाच नकोत.त्यात गॅरंटी नसल्यामुळे मानसीक ताणात वाढ होते.
आणि नेमक्या ह्याच कारणांमुळे इमर्जन्सी पिलचा उपयोग रेग्युलर पील सारखा केला जातो.
easy availability, immediate usage, easy disposal या तीन सूत्रत्रयीत आयपील सहज बसतं.
या गोळीचे दुष्परीणाम स्त्रियांना भोगायला लागतात.पुरुष ह्यात अलीप्त राहतात कारण गायनॅक इश्युज मध्ये त्यांना रस नसतो.मासीक धर्माचे लांबणीवर जाणे हा त्रास हार्मोनल ओव्हरडोज मुळे होतो.मनात गर्भधारणेच्या भितीने ताण. इथून पुढे गर्भधारणेची परीक्षा. डॉक्टरकडे जाणे. सोनोग्राफी...वगैरे.साहजीकच चिडचिड,ताणतणाव .एकूण कौटुंबीक स्वास्थ्य बिघडते.
आय-पील चा उपयोग अपवादात्मक परिस्थीतीतच करावा.अपवादाचा नियम होऊ नये.
लक्षात घ्या आपण निसर्गनिर्मीत हार्मोनल समतोल आय-पीलच्या अतीवापराने बिघडवत असतो.
वाचने
10997
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
नेहेमीप्रमाणे
In reply to नेहेमीप्रमाणे by ३_१४ विक्षिप्त अदिती
एकदम मस्त
रिसर्च
अभिनंदन विप्र!
विप्रसाहे
विप्र ---अतिशय महत्वपुर्ण माहिती
माहितीबद्
बलबीर पाशा को एड्स होगा क्या?
गर्भनिरोधनाचे उपाय हे शक्यतोवर पुरुषांनी करावेत!
आय्-पील
चांगला विषय
चांगला
आय पील चे
In reply to आय पील चे by नीधप
हा पण याचा
प्रभूजी
In reply to प्रभूजी by साती
बाप रे...
प्रभू सर,
In reply to प्रभू सर, by रामदास
मंजुळा