मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पोरगीपटाव शास्त्रानंतर...

जेम्स बॉन्ड ००७ · · काथ्याकूट
पोरगीपटाव शास्त्र शिकुन पोरगी पटवली कि पटावपोरगीटिकाव शास्त्राचा अभ्यास सुरु होतो. कितीही कंटाळा आला तरी ओपन मार्केट काँपिटीशन असल्याने या शास्त्राचा अभ्यास करावाच लागतो. पटलेली पोरगी टिकवण्यासाठी आपण तसेही प्रयत्न करतोच; पण जेव्हा पोरगी A किंवा B कॅटेगरीतली असेल तेव्हा पोरगी पटलेली असुनही आउटसाईड काँपिटीशनला तोंड द्यावे लागते. आपण जरी तिला कितीही खुश ठेवत असलो, तिच्यावर विश्वास असला तरीही जेव्हा आपल्या समोरच कोणीतरी तिच्याशी फ्लर्ट करत असेल तर आपल्या अंगाचा तिळ्पापड होतोच.. तर अशा वेळी काय करावे? असे अनुभव सदस्यांना नक्कीच आले असतील. या वेळी तुम्ही काय करता? आणि अशा परिस्थीतीत मुलींना आपण काय करणे अपेक्षित असते आणि त्या या परिस्थीतीकडे कशा प्रकारे बघतात?

वाचन 21152 वाचनखूण प्रतिक्रिया 76

मदनबाण गुरुवार, 01/22/2015 - 16:04
चक्क जेम्स ने हा प्रश्न विचारावा ? हे म्हणजे भाजी विक्रेत्याने टॅमॅटो चे भाव किती ठेवु असे विचारण्या सारखे झाले ! छ्या... आयडी बदला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }

In reply to by मदनबाण

जेम्स बॉन्ड ००७ गुरुवार, 01/22/2015 - 17:31
काही मुली असतात खुप खास :) जरा जास्त मेहनत घ्यावी लागते. आपल्यासारख्या थोर माणसांकडुन सल्ल्याची (फक्त सल्ल्याचीच) अपेक्षा आहे. *smile*

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 01/22/2015 - 16:16
फ्लर्ट एंजॉय करावं. बिचार्‍याचा चेहेरा जेव्हा फ्लर्ट करुन हातात काही पडत नाही तेव्हा आपल्याला आत्मिक समाधान मिळतं. =))...फोटो काढल्यास अतिउत्तम. शिवाय तो आपलाचं मित्र असला तर आपल्या पापपुण्याच्या हिशेबबुकामधे ही एंट्री करुन ठेवावी. कधी त्याचं सुत जुळलचं तर व्याजासकट परतफेड करावी. =))

In reply to by टवाळ कार्टा

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 01/22/2015 - 16:28
मग तिला कॅज्युअल डेट मागायची है.कै.नै.कै.!!! =)) त्याचा चेहेरा परत फोटु काढण्यालायक झाला नाही तर विचार =)) बीन देअर डन दॅट...हे अनुभवाचे बोल आहेत.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण गुरुवार, 01/22/2015 - 16:31
त्याचा चेहेरा परत फोटु काढण्यालायक झाला नाही तर विचार *LOL* बाकी वाघळु ने जेम्स ची "दांडीच" उडवली रे बाला ! *LOL* जल्ला !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण गुरुवार, 01/22/2015 - 16:24
शिवाय तो आपलाचं मित्र असला तर आपल्या पापपुण्याच्या हिशेबबुकामधे ही एंट्री करुन ठेवावी. हॅहॅहॅ... व्हॉट्अ‍ॅपवर आलेला एक वाह्याद मेसेज... सौम्य करुन इथे द्यावासा वाटतो :- मंग्या :- प्रिती आणि माझ्यातली मैत्री आता संपली मित्रा ! गण्या :- { सांत्वना मोड ऑन करुन } खुप चांगले झाले. ती *** होती.. अख्या कॉलेजनी...*** आम्ही पण ...*** तू दु:ख आवर मित्रा... जे होते ते चांगल्यासाठीच होते ! मंग्या :- आम्ही लग्न केले आहे भो*, तुझ्या ****

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }

In reply to by टवाळ कार्टा

मदनबाण गुरुवार, 01/22/2015 - 21:09
दिपकराव तुमचा नंबर मला व्यनि करा... आमच्या अ‍ॅडमिनला सांगुन अ‍ॅडवतो तुम्हाला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }

In reply to by खटपट्या

मदनबाण Fri, 01/23/2015 - 10:41
ओह्ह... स्वारी साहेब... आज बघतोच आम्ही. माफी असावी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सूड Fri, 01/23/2015 - 14:55
तुम्हाला कॉंप्लिमेंटरी मेंबरशिप हवीये का?
नको हो चिमणराव!! बोललात हेच फार झालं. (रुमालाने डोळे पुसत असल्याची स्मायली कल्पावी.)

विशाखा पाटील गुरुवार, 01/22/2015 - 16:53
Not Again! काहीही कुटत बसू नये, असं प्रामाणिकपणे वाटतं. मिपावरचं लेखन सदस्य असेलेले आणि नसेलेले लोकही वाचत असतात, याचं भान ठेवायला हवं. इतर संस्थळाशीही तुलना होते. पटलं तर घ्या...

In reply to by जेम्स बॉन्ड ००७

सस्नेह गुरुवार, 01/22/2015 - 17:17
कुणीही काहीही लिहिलं तरी लोक्स वाचत असले तरी कोण काय लिहितो, यावर लोक्स लिहिणाऱ्याची लायकी ठरवतात. तेव्हा जपून....

In reply to by सस्नेह

जेम्स बॉन्ड ००७ गुरुवार, 01/22/2015 - 17:26
माफ करा, मजेत लिहुन गेलो ती प्रतिक्रिया. पण मी मांडलेला प्रश्न genuine आहे असं नाही का वाटत? आणि तेच तेच विषय च॑घळण्याचं म्हणाल तर मी तरी या विषयावरचा धागा मिपावर बघितलेला नाही. असल्यास लिंक द्यावी. मी टवाळ्खोरी करायची म्हणुन हा धागा नाही काढला.

In reply to by सस्नेह

बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 17:59
परीक्षेची पडलीय कुणाला इथे? कोण मोठे लागून गेले हे परीक्षक? फारच विनोदी कल्पना आहे बॉ.

In reply to by विशाखा पाटील

बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 17:52
मिपावरचं लेखन सदस्य असेलेले आणि नसेलेले लोकही वाचत असतात, याचं भान ठेवायला हवं. इतर संस्थळाशीही तुलना होते.
'जीजूं'बरोबरची तुलना उगाचच आठवून गेली. ऑनलैन लिखाणावर कूलनेसची रेटिंग्स ठरवणार्‍यांची दया येते.

प्रसाद गोडबोले गुरुवार, 01/22/2015 - 19:17
मुद्दा १: धागा गंडला आहे कारण लेखकाने स्वतःचे काहीच विचार मांडलेले नाहीयेत . मुद्दा २: ह्याविषयावर खरे सरांनी मागील धाग्यातच एका प्रतिसादात सडे तोड उत्तर देवुन ह्या विषयाची वासलात लावली आहे . मुद्दा ३: तरीही , पोरगीपटाव शास्त्राचे नियम मध्ये बरेचसे खुदको चमकाव शास्त्र आल्याने आपल्याला आवडलेल्या पोरींना अ‍ॅप्रोच कसे करावे किंवा जिला आपण आवडतो अशा मुलीला कसे ओळखायचे ह्या वर स्वतंत्र आणि अत्यंत अत्यंत अभ्यासपुर्वक लेख पोरगीपटावशास्त्र - उत्तरार्ध आणि मुळातच प्रेम , लग्न , संसार ह्या सार्‍या खरेच आवष्यक गोष्टी आहेत का ह्यांची चिकित्सा करणारा " प्रील्युड टु पोरगीपटावशास्त्र" असा अजुन एक गहन गंभीर लेख आम्ही लिहायला घेतला होता , पण आमच्या एका मिपामित्राने ह्यावर फालतु वेळ वाया घालवण्यापेक्षा वाचायला घेतलेले महाभारत संपव असा सल्ला दिल्याने हे लेख पोस्टपोनले आहेत ! मुद्दा ४: तदुपरी विशाखा / स्नेहांकिता ताईचे प्रतिसाद पटण्या सारखे नाहीत . पुरुषांच्या त्यातही खासकरुन लग्नाळु पुरुषांच्या स्वतंत्र समस्या असतात आणि त्यावर पुरुषांना चर्चा करुन उत्तरे शोधावीशी वाटतात किमान समदु:खी सापडला कोणी तर १-२ पेग सुखाने रिचवुन वस्तुस्थितीचा विसर पाडता येतो . ह्यासाठी स्वतंत्र पुरुष विभागाची नितांत आवश्यकता आहे . हे समजुन कधी घेणार आपण ? मुद्दा ५: असो.

In reply to by प्रसाद गोडबोले

सस्नेह गुरुवार, 01/22/2015 - 19:27
धाग्यासाठी किंवा धागाकर्त्यासाठी नाहीत. विचारी सदस्यांसाठी आहेत. आपल्यालाही विचार केल्यावर उपप्रतिसाद पटतील. नाही पटले तरी हरकत नाही. सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे.

In reply to by सस्नेह

प्रसाद गोडबोले गुरुवार, 01/22/2015 - 19:39
सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे. >>> नक्कीच फक्त
कुणीही काहीही लिहिलं तरी लोक्स वाचत असले तरी कोण काय लिहितो, यावर लोक्स लिहिणाऱ्याची लायकी ठरवतात. तेव्हा जपून....
मी आधीही म्हणालो आहे कि सोशल नेटवर्क्स वर लोक आपल्याला आपण कसे दिसावे असे वाटत असते तसा मुखवटा घालुन फिरतात , ती व्यक्ति प्रत्यक्षात तशी असेलच असे नाही . तेव्हा एकाद्याच्या लेखनावरुन त्या व्यक्तिमत्वाबद्दल अंदाज बांधणे अत्यंत चुकीची पध्द्त आहे असे नमुद करुन मी माझे चार शब्द संपवतो !!

In reply to by सस्नेह

प्रसाद गोडबोले गुरुवार, 01/22/2015 - 20:03
आपल्याला इतरांच्या मताचे किंवा मते बदलण्याचे अगत्य आहे असे वाटते.
:D :D आमचे मिपाकर मित्र आम्हाला छुपा सनातनी म्हणुन ओळखतात आणि आम्हाला त्याचे फार अगत्य वाटते हे जाता जाता नमुद करीत आहे :D

In reply to by बॅटमॅन

प्रसाद गोडबोले गुरुवार, 01/22/2015 - 20:09
ओके ओके सल्ला लक्षात घेण्यात आला आहे , डोक्यात फॉर्मॅट होताच आता जरा घरी जावुन लिहायचा प्रयत्न करतो =)

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 19:33
त्या मिपामित्राचा सल्ला तूर्तास फाट्यावर मारा असा आमचा कळकळीचा सल्ला आहे. महाभारत घडून गेलेले आहे. उद्या एखादे नवे हस्तलिखित उजेडात आले तरच काय ते फेरफार होतील, तोवर गीता ७०० श्लोकवालीच आहे, युद्ध १८च दिवसांचे आहे आणि पांडवच जेते आहेत. त्यामुळे द्वापरयुगातल्या महाभारतापेक्षा कलियुगातील महाभारताकडे लक्ष द्यावे असा कळकळीचा विनंतीवजा सल्ला देत आहे. ज्ञानेश्वरमाऊलींनीच म्हटले आहे- "राजहंसाचे चालणे" इ.इ. त्यामुळे ते महान योद्धे आणि त्यांची युद्धे महान आहेतच, पण आपापल्या जीवनातील युद्धेही आपल्याकरिता तितकीच महान आहेत. ;) तस्मादुत्तिष्ठ प्रसाद, लेखाय कृतनिश्चयः!

In reply to by बॅटमॅन

पैसा गुरुवार, 01/22/2015 - 19:35
नायतर मालिका अर्धी टाकून पळणार्‍यांच्या यादीत बॅटमॅन नाव आलेले पाहून त्या खर्‍या बॅटमॅनला यमयातना होतील!

In reply to by प्रसाद गोडबोले

जेम्स बॉन्ड ००७ गुरुवार, 01/22/2015 - 20:12
मुद्दा १: मी विचार नसेन कदाचित पण समस्या मांडली आहे ज्यावर चर्चा होउ शकते त्यामुळे 'काथ्याकूट' चा उद्देश पुर्ण होतोय, सो, तुमचा मुद्दा १ गंडला आहे. मुद्दा २:
मुलगी पटवली कि दोन महिन्यात लग्न करायचे किंवा पुढे अडीच वर्ष आत करता येणार नाही अशा अटी घालायच्या. हजार हिश्शाने दोन महिन्यात बार उडतो. एकदा मंगळसूत्र गळ्यात अडकवले कि मग धास्ती नाही
याला तुम्ही सडेतोड उत्तर म्हणत असाल तर एकदा रिचर्डभाउ गेर यांचा Unfaithful बघावा असे मी सुचवेन. मुद्दा ३: त्या मिपामित्रावर "बसवला टेंपोत" महामंत्राचा प्रयोग करुन लेख लवकर येउद्यात. मुद्दा ४: जोरदार सहमती *dance4* मुद्दा ५: असो.

In reply to by जेम्स बॉन्ड ००७

प्रसाद गोडबोले गुरुवार, 01/22/2015 - 21:47
असे रागेजु नका हो बॉन्डराव ! आम्ही आपलं चेष्टेत लिहिलं ! स्वारी ...एकडाव माफी लगेच गोळी मारु नका ! लेख लिहायला घेतो आता =)

In reply to by प्रसाद गोडबोले

रागवु कसे आम्ही गिरीजाकाकुंवर.. पण ते गोळीचं ध्यानात ठेवा लेख लिहिला नाहीत तर तो उपाय आहेच आमच्याकडे.. *biggrin*

In reply to by जेम्स बॉन्ड ००७

सुबोध खरे गुरुवार, 01/22/2015 - 23:14
बोंड साहेब हा प्रतिसाद आमच्या बालबुद्धीला सुचेल असा लिहिला होता. तो एकमेव पर्याय नाही हे आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो. पण तो एक नक्की उपाय आहे हे सत्य आहे कोल्ह्याच्या शंभर युक्त्यांपेक्षा मांजराची एक युक्ती बरी. बाकी इतर काय काय उपाय आहेत ते तरी लिहा कि

In reply to by सुबोध खरे

बोंड *ROFL* *ROFL* *ROFL* *ROFL* साहेब काय नि बालबुद्धी काय? का उगाच आम्हाला इमोशनल करुन र्‍हायले राव? बाकी
पण तो एक नक्की उपाय आहे हे सत्य आहे
यावर अजुन सहमत नाही. आणि इतर उपाय इतर जाणकार देतीलच, त्यावर आम्ही देउ थोडेसे काँट्रीब्युशन..

In reply to by प्रसाद गोडबोले

टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 20:15
पुरुषांच्या त्यातही खासकरुन लग्नाळु पुरुषांच्या स्वतंत्र समस्या असतात आणि त्यावर पुरुषांना चर्चा करुन उत्तरे शोधावीशी वाटतात किमान समदु:खी सापडला कोणी तर १-२ पेग सुखाने रिचवुन वस्तुस्थितीचा विसर पाडता येतो
रात्रकट्ट्याला आहात का? ;)

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद गोडबोले गुरुवार, 01/22/2015 - 23:32
टक्या एकदा तुच ये एकडे ! इथे चिंचवडात लय मोठ्ठा कंपु आहे आपला ! त्यात अगदी २० २२ वर्षांच्या निरागस पोरांपासुन ६०-६५ चे चावट म्हातारे ही आहेत तेव्हा इथेच जोरदार कट्टा करुयात एकदा =)) तोवर मी एल पी कोठे मिळते ते शोधुन ठेवतो !!

In reply to by टवाळ कार्टा

प्रचेतस Fri, 01/23/2015 - 15:47
ते भडजी बहुधा त्याच दिवशी टाकळी ढोकेश्वरची लेणी पाहायला का कुठे असे कायसे गेले होते म्हणे.

खमक्या गुरुवार, 01/22/2015 - 20:55
अशावेळी अंगाचा तीळपापड होत असेल तर भाजून अथवा तळून खाणे. व तिच्याशी फ्लर्ट करणार्यास कच्चा खाण्यात यावे.