मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा हे नविन सदस्याकरीता अडचणीचे तर ठरत नाहीये ना??

Sanjay Kokare · · काथ्याकूट
कालच मी मिपा चा सदस्य झालो. सदस्य झाल्या नंतर मी माझे लेख, कविता वैगेरे मिपा फळावर टाकल्या. मला वाटल येथील सर्वच जण अभ्यासु असतील व त्यांच्या कडुन मला चांगले मार्गदशन लाभेल. व मला माझ्या द्न्यानात अजुन भर टाकता येईल . म्हणुन मला माहीती नसलेल्या विषयावर माहीती मिळवण्यासाठी मी एक चर्चेसाठी एक विषय ही टाकला. मला त्या विषयाबद्दल मला जास्त माहीती नसल्यामुळे ती पोस्ट मी अत्यंत लहान टाकली होती. त्यामुळे संपादकानी ती पोस्ट अत्यंत लहान असल्याचे कारण सांगुन ती डिलीट केली.. मग मी नविन असल्यामुळे पोस्टींग करताना चुकुन स्पेच देण्याचे विसरलो व ती वर्हाडी भाषेतील कवीतेला विदर्भ वेगळा देउनच द्यावा या भाषेत प्रतिक्रिया देण्यात आल्या. मराठी माणसाबाबत टाकलेल्या लेखावर पण मराठी माणसाबाबत मराठी माणसालाच काही घेणे देणे आहे की नाही अश्या प्रकारचे प्रश्न निर्मान होणार्या प्रतिक्रिया दिल्या गेल्या.. माझा लेखाखाली माझ नाव मी नित्य नियमाप्रमाने टाकले जेणेकरुन वाचणार्याला मला त्या लेखाबाबत संपर्क साधता यावा. परंतु याबाबत ही अनेक प्रश्न उठवले गेले.. परंतु हे सर्व होउनही मिपावर सर्व अत्यंत मदत करणारे लोक आहेत अस मला जाणवल.... काही चुकल्यास क्षमस्व

वाचने 30853 वाचनखूण प्रतिक्रिया 160

In reply to by स्पा

विजुभाऊ Sat, 01/17/2015 - 12:57
याच्यावर एक रामबाण+ रहीमबाण उपाय आहे इथे एक माईसाहेब आहेत. त्यां / ते स्वतः काहीच लिहीत नाहीत. बहुधा वयोमानामुळे बोटे अडखळत असावीत. मात्र त्या कोणालाही म्हणजे वाजपाई अडवाणी याना देखील " तो अटल , अरे लालकृष्ण असे एकेरी संबोधतात. त्यांच्या प्रतिसादावर प्रतिसाद दिलेत तर नाना सुद्धा खूष होऊन तुम्हाला षास्बाकी देतील आणि त्या नंतर बघा तुम्हाला वेळ्गाच अनुभव येईल.

In reply to by विजुभाऊ

गवि Sat, 01/17/2015 - 13:48
म्हंजे:
छान उपाय सुचवलास रे विजू.. नवीन उमेदवारांना प्रोत्साहन दिलंच पाहिजे असं हे म्हणतात. काय ते तुमच्या कारपोरेट भाषेत म्हणतात ना मोटिव्हेशन की काय. तेच.
असंच का विजुभौ ?

चांगल्या गोष्टींचाही अतिरेक केल्यास दुष्परिणाम होतो असं म्हणतात ! तुमचे लेखन वाचकांना जरा श्वास घेण्यास मोकळीक मिळेस अश्या दमाने (कमीत कमी दोनचार दिवसांच्या अंतराने) टाकल्यास प्रतिसादांत सुधार होऊ शकेल. अहो, श्वास रोखला गेला की कोणीही हातपाय झाडतोच की :) बाकी थोडे दिवस वावरलात की मिपाकरांच्या खोचकपणातील खोडकरपणाची मजा ध्यानात येऊन इथे रुळून जाल !

गणेशा Fri, 01/16/2015 - 15:48
तुमचे घागे पाहिले नाहित मी.. कदाचीत बर्याच सदश्यांना कामामुळे जास्त वेळ येथे देता येत नसेल. त्यामुळे आल्यावर ज्या गोष्टी आवडतात ते तिकडे जास्त लक्ष देतात, माझे म्हणाल तर भटकंती नंतर कलादालन आणि राजकारण - चर्चा मला आवडतात मिपावर आल्यावर मी भटकंती सर्वात पहिली पाहतो. नविन असल्यावर थोडा वेळ जावुन द्यावा.. दागा टाकण्यापेक्षा आपण दूसर्‍याचे धागे वाचुन त्याला कसे रिप्लाय देतो हे जास्त महत्वाचे.. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाचन करा.. रिप्लाय द्या .. नंतर तुमचे विचार पाण येवुद्या . आल्या आल्या लगेच लेख (काही प्रॉब्लेम नाही) पण लगेच रिप्लाय ची अपेक्षा कश्यासाठी .. असे असेल तर माझ्या धाग्यावर १०-१२ रिप्लाय असतात म्हणुन मी लगेच मिपाच वाईट म्हणावे का ? धागा हा रिप्लाय साठी नसुन आपले विचार मांडण्यासाठी असावा.. तसेच रिप्लाय चे पण . असो.. हळु हळु सरावताल

In reply to by गणेशा

Sanjay Kokare Fri, 01/16/2015 - 15:52
मी मिपा ला वाईट म्हणत नाही आहे पण तुमच्या कंमेट्स ह्या नविन सदस्यांचा आत्मविश्वास कमी करण्यासारख्या नको यायला

In reply to by Sanjay Kokare

गणेशा Fri, 01/16/2015 - 16:24
दोन्ही कविता वाचल्या ! छान आहेत.. वर्हाडी भाषेतली आर्त आहे एकदम .. एक कळकळीचे सांगतो! तुमचे वय धाग्यांवरुन अंदाचे २०-२५ च्या आस पास वाटते म्हणुन बोलतो .. ऑनलाईन वाद- संवाद .. त्यावर येणारे प्रतिसाद -- विचार यांना इतके पर्सनली घेवु नका .. लाईफ वेगळे असते.. इतक्यात आत्मविश्वास जात असेन तर तुम्ही त्याची आस बाळगु नका.. आपले विचार मांडण्याचा प्लॅटफॉर्म म्हणुन वापर करा.. मिळालेच एक दोन सोबती तर त्यांच्याशी गप्पा मारा. हे असले आत्मविश्वास वाढवा वगैरे खरेच छान नाही वाटत.. मुळात आत्मविश्वास लगेच गेलाच नाही पाहिजे .. मान्य तुम्ही कष्ट करुन लिहिताय .. त्या लिहिण्यातला आनंद घ्या .. लिहिल्या नंतर तो आनंद इतरांना देण्याचा प्रयत्न करा .. ज्यांना जमेल ते घेतील नाही तर सोडुन द्या .. वयक्तीक लेव्हल ला जर तुम्ही गोष्ट घेणार असताल .. तर एकदिवस तुम्ही या सोशल मायाजाळात तडफडत अडकलेच म्हणुन समजा .. असो.. हा माझा शेवटचा रिप्लाय असेन येथे. तुमचे इतर धागे मी आधी बघितले नव्हते .. कारण दिले आहे. पुन्हा असे धागे यायला नको असे वाटते .. लिहित रहा .. आम्ही वाचत आहे...

धर्मराजमुटके Fri, 01/16/2015 - 15:52
मिपा हे नवीन सदस्याकरीता मुळीच अडचणीचे ठरत नाही तर जिलब्यापाडू सदस्यांकरता अडचणीचे ठरते. आता थोडा गंभीर प्रतिसाद. पटतोय तर व्हय म्हणा नाहीतर सोडून द्या. मिपा हे नेहमीच जुन्या/नव्या लेखकांचे स्वागत करते. पण येथे येणारा बहुसंख्य वर्ग हा कोरडवाहू शेतकरी आहे. तो वर्षातून एक किंवा दोनच पिके घेतो आणि तुम्ही पडले बागायती शेतकरी एकाच वेळी चार चार पिके घेणारे. सांगायचा मुद्दा हा की एक / दोन दिवसांत एखादाच धागा / चर्चाप्रस्ताव / लेख टाकावा. तसे केले की एकाच लेखावर लक्ष केंद्रित करणे सदस्यांना सोयीचे पडते आणि सोईप्रमाणे प्रतिक्रिया, सुचना करता येतात. मराठी माणसाचे / जागतिकीकरणाचे विषय किंवा कोणताही मोठा आवाका असणारा विषय मांडण्याअगोदर त्या विषयावरील मिपावरील लेखांवर एक नजर टाका. काही सदस्यांचे प्रतिसाद खरोखरच माहितीपुर्ण असतात तर काही प्रतिसाद फक्त टिंगलटवाळीचे / मजेमजेचे असतात. मुख्य म्हणजे विषय मांडताना तुमची त्या विषयाप्रती कळकळ दिसू द्या. नुसतेच टाळ्या मिळविणारी / पुस्तकी छापाची वाक्ये इथल्या लोकांना आवडत नाहीत. जेव्हा तुम्ही (किंवा हवतर मी म्हणा) बाजारात माल विकायला आणतो (उदा. आंबे) तर चार जण तो दाबून बघतील, दोन जण नाकाला लावून वास घेऊन बघतील. एखादाच विकत देखील घेईल. तेव्हा हताश न होता बाजारात उभे राहत चला. अर्थात लिखाण चालू ठेवा. तुमचा माल चांगला असेल तर नक्कीच विकला जाईल. आज बर्‍याच जणांचा सुर हेटाळणीचा वाटला तरी नंतर तुम्हाला इथूनच तुमच्या आयुष्यातले सुंदर क्षण / मित्र सापडतील याची खात्री बाळगा. तेव्हा कीप ईट अप. निराश होऊ नका आणि आम्हालाही निराश करु नका.

In reply to by Sanjay Kokare

गैरसमज नसावा. ही मर्यादा मिपाच्या कायद्याची नाही तर सर्वसाधारण सारासारविवेकाची आहे.

In reply to by Sanjay Kokare

अजया Fri, 01/16/2015 - 16:15
अहो,तुमच्यावर अनेक वस्तुंचा एकदम भडिमार केला किंवा एक एक थोड्या दिवसानी दिली तर काय फरक असेल विचार करा.पहिलाच लेख वाचुन लोकांना अंदाज घेऊ द्या.तुमचे लिखाण सकस असेल तर त्याला प्रतिसाद वाचनं मिळतीलच.हळूहळू एकेक धागा टाका.लहान मूल खेळण्याची टोपली एकदम उलटं करुन बसतं तसं सगळे साहित्य प्रकार एका दमात टाकून खेळू नका.अारामात.मिपा कुठे जात नाही.टाकत रहा एक एक प्रकार!

अरे बापरे तुम्ही तर एकदम षटकारच ठोकलात की.... तुंमच्या धाग्यांवर धिंगाणा घांलणारे नां हें पुंणेकर असावेत बरिक कांय संमजंले. ते असेच असतात नविन कोणी आलं की... :-))) जावुद्या तुम्हाला समजेल ह ळु ह ळू. तुम्ही तुमची ताठ ठेवा मान म्हणतोय मी. अजिबात घाबरु नका नाउमेद होवु नका. बाकी साहेबांनी किती दिवसांची रजा दिलेय तुम्हाला? नाही म्हणजे एका दिवसात एवढ्या जिल्ब्या पाडताव ते. बाजारातली साखर महागली की.

धर्मराजमुटके Fri, 01/16/2015 - 16:15
झालं ! जिथंतिथं पुण्याचीच लाल करा राव. मिपा पुणे पकडून होल वर्ल्ड मधे फेमस आहे म्हटलं. जरा क्रेडीट बाकीच्यांनाही द्या की !

कोकरे साहेब तुमच लिखाण वाचल आहे या पुर्वी . चांगल लिहिता . फ़क़्त वर्तमान पत्र वाचक आणि मिपा वाचक यांच्या प्रकृती मध्ये फरक आहे . तो तुम्हाला अनुभवाने कळेलच . फ़क़्त थोडा gap राहू द्या दोन लिखाणामध्ये . बाकी तुमच्यात क्षमता आहेच . Just keep floating .

In reply to by Sanjay Kokare

सतिश गावडे Fri, 01/16/2015 - 17:44
मला उत्क्रांती आणि अध्यात्म यावर चर्चा करायला आवडते. या विषयांवरही काही लिहा ना. आणि तुमचे लेखन वर्तमानपत्रात छापून येत असेल तर त्याची कात्रणे इकडे चिकटवा. आमचे शेतागंमु सर तसेच करतात.

In reply to by यसवायजी

सूड Fri, 01/16/2015 - 20:18
माझ्यासाठी एक बालगीत, ईसापनीतीतल्या गोष्टी टाईप गोष्ट, पंचतंत्र आणि मांजरीने बाईकच्या सीटवर नखे मारु नयेत म्हणून उपाय असलेला लेख, याहून मागणं लई न्हाई!! ;)

In reply to by सतिश गावडे

अभ्या.. Mon, 01/19/2015 - 13:03
च्यामारी कलादालनाकडे कुणी बगतच नै. तिथे काहीतरी टाका ना गडे. (म्या बी सुरुवात तिथंच केली व्हती. कोण बी फिरकले नाही :( पण कोण कंपूबाजी बी केली नै. रुळलो मग हळू हळू )

In reply to by कपिलमुनी

चिगो Fri, 01/23/2015 - 11:57
काहीतरी टाका ना गडे ?
हा हा हा.. ;-) ह्यावरुन "नवरा माझा नवसाचा" मधलं 'चला ना गडे, चला ना गडे' हे गाणं आठवलं. काव्यातला कोणता अलंकार आहे तो? "श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी न वरी" वाला? अनुप्रास का?

In reply to by सतिश गावडे

उनके अभ्यास पुर्ण लेखन की है हमको कदर... उनके अभ्यास पुर्ण लेखन की है हमको कदर... वाचनेका तो वाचो नै तो रस्ता सुधर... -कवीहृदयसम्राट तेच ते (स्पा चे ते नाही)-

In reply to by गवि

मृत्युन्जय Fri, 01/16/2015 - 17:23
गवि तुम्ही पण सुरुवातीच्या काळात परा आणि मी कसा त्रास दिला याबद्दल कचकचुन शिव्या घालणारा एक लेख लिहा बरे.

In reply to by मृत्युन्जय

धर्मराजमुटके Fri, 01/16/2015 - 17:30
गविंचे लिहिणे जरा सोज्वळच हो ! त्यांच्याच्याने कचकचून शिव्या घालणारे लिखाण व्ह्यायचे नाही. किंबहूना त्यांनी शिव्या दिल्या तरी त्या कानाला गोडच लागतील. तेव्हा ते काम तुम्हीच करा बरे ! :)

कपिलमुनी Fri, 01/16/2015 - 16:41
रॅगिंग चाल्लय ओ ! थोड्या दिवसात अलिकड्च्या बाजूला येउन तुम्ही पण नव्या कोकरांची वाट बघाल ! ( नव्या मिपाकरांसाठी FAQ काढावा काय ;) )

In reply to by इरसाल

तुषार काळभोर Fri, 01/16/2015 - 18:18
इथ काही कोकरं येताना शिंग पण घेवुन येतात कधी कधी.
ते कोकराचं कातडं "बळंच" पांघरलेले जुणे-जाणते बोकड असतात!!

वर गवि म्हणतात त्याच्याशी १००% सहमत. लै हलकट, टवाळ आणि डँबिस लोक्स आहेत हो इथे. मी नवीन असताना एका साडेचार अक्षरी, एका सव्वा अक्षरी, एका पंचाक्षरी वगैरे वगैरे लोकांनी मला पण पि़ळला होता ज्याम. पण नंतर जसा लिहित आणि वाचत गेलो तसं तसं मलाही ही लोकं कळत गेली आणि कदाचित त्यांनाही मी. एका लोकप्रिय मिपा सल्लागाराशी जब्राट वादही घातले होते. =)) पण हेचं लोकं तेवढेचं प्रेमळही आहेत. अतिशय उत्तम लेखक कवी आहेत. चार पावसाळे जास्त पाहिलेत त्यांनी बाहेर जगात आणि मिपावर. त्यांचा तेवढा अधिकार आहे. जरा गमतीनी घ्या. दोन-चार उलटी उत्तर मर्यादेत राहुन दिलीत तरी कोणी काहीही बोलणार नाही. एकदा सरावलात ना की मिपासारखं मोकळं वातावरण नाही. ३-४ महिन्यात सरावाल. तेव्हा जे नवीन येतील तेव्हा तुम्हीही त्याला असेचं रिंगणात घ्याल. लोकांना एक लेख पचायला वेळ लागतो. तस्मात लेखात अंतर ठेवा आणि इथे नक्की येतं चला. :)

विशाखा पाटील Fri, 01/16/2015 - 18:06
वर्तमानपत्रात एकाच दिवशी तुमचं एवढं साहित्य छापून येईल का? त्यात मिपावर किंवा कुठल्याही अशा संस्थळावर लिहिल्यावर सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया मिळतील, हे गृहीत धरायला हवे. त्यातून तुम्हाला तुमच्या लेखनातल्या मर्यादा कळतील. आणि सर्वात महत्वाचे, तुम्ही आधी विषयांचा नीट अभ्यास करा आणि मगच लिहा. केवळ कमी वेळात प्रसिद्धी मिळवण्याचे माध्यम म्हणून याकडे बघू नका. आधी भरपूर वाचा, मिपावरच्या इतर लेखांवरही प्रतिकिया द्या आणि मग लिहायला सुरूवात करा. हे केवळ तुम्ही नाउमेद होऊ नये, यासाठी सांगितलंय. पटलं तर स्वीकारा.

In reply to by विशाखा पाटील

Sanjay Kokare Fri, 01/16/2015 - 18:13
आपण लक्षात घ्या मी कोणताही विषय अभ्यास पुर्णच लिहीतो व कदाचित तो तुमच्या मताप्रमाणे तो चुकीचा असेलही...

In reply to by Sanjay Kokare

आदूबाळ Fri, 01/16/2015 - 18:25
मी कोणताही विषय अभ्यास पुर्णच लिहीतो व कदाचित तो तुमच्या मताप्रमाणे तो चुकीचा असेलही
असा सर्वज्ञतेचा दावा करू नका हो दादा. असे कितीतरी मिपाकर मला माहीत आहेत जे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अग्रणी आहेत, प्रचंड ज्ञानी आहेत, अनुभवसंपन्न आहेत, छंद म्हणून हाती घेतलेल्या उद्योगातही अतिकुशल आहेत. पण (काही सन्माननीय अपवाद वगळता) सर्वज्ञतेचा छातीठोक दावा ते मिपाकर करत नाहीत. "तुम्ही अभ्यासपूर्ण लिहिता" हे इतरांना म्हणूदे.

In reply to by Sanjay Kokare

सुबोध खरे Fri, 01/16/2015 - 18:32
कोकरे साहेब मिपाकर ज्ञानेश्वरांना सुद्धा " वयाच्या मानाने बरं लिहिलंय " म्हणणारे आहेत तेंव्हा तुम्ही आम्ही कुठे आहोत ते पहा आणि नाउमेद होऊ नका शेवटी पुलंनी म्हटले आहेच कि राज हंसाचे चालणे जगिया जाहले शहाणे म्हणोन काय कवणे चालोची नये काय ?

In reply to by सुबोध खरे

मिपाकर ज्ञानेश्वरांना सुद्धा " वयाच्या मानाने बरं लिहिलंय " म्हणणारे आहेत +D बघा, कोकरे साहेब, कळलं का मिपाकर मिपाकरांची कशी मापं काढतात ते ? :)

In reply to by सुबोध खरे

सतिश गावडे Fri, 01/16/2015 - 18:59
खरे काका, संदर्भ चुकला.
शेवटी पुलंनी म्हटले आहेच कि राज हंसाचे चालणे जगिया जाहले शहाणे म्हणोन काय कवणे चालोची नये काय ?
ही ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरीतील ओवी आहे. "राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना ||" अशी काहिशी ओवी आहे ती. ओवीचा अध्याय क्रमांक आणि ओवी क्रमांक माझ्या लक्षात नाही. प्रगो कदाचित सांगू शकतील.

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे Fri, 01/16/2015 - 19:19
दुसरे एक जण आहेत. परंतू त्यांची "दासबोध" ही स्पेशालिटी आहे. त्यांना ज्ञानेश्वरीतील संदर्भ माहिती नसावेत कदाचित. (असा माझा समज आहे. ;) )

In reply to by सतिश गावडे

सुबोध खरे Fri, 01/16/2015 - 19:31
गावडे साहेब आम्ही काही ज्ञानेश्वरी वाचली नाही पण पु ल वाचले आहेत आता त्यांनी ज्ञानेश्वरीतील दृष्टांत दिला असेल. आमच्या अज्ञानाबाबत एक डाव माफी करा.

In reply to by सुबोध खरे

सतिश गावडे Fri, 01/16/2015 - 19:49
आमच्या अज्ञानाबाबत एक डाव माफी करा.
माफ केलं. पण इथून पुढे प्रतिसाद देताना धागाकर्त्यासारखे कोणताही प्रतिसाद अभ्यास पुर्ण द्या *lol*

In reply to by सस्नेह

अनन्त अवधुत Tue, 01/20/2015 - 03:49
ह्या प्रतिसादाचा पण अभ्यास करा. आपल्याच धाग्याची जाहिरात कशी करावी :D रच्याकने http://www.misalpav.com/node/२६५१७ मस्त आहे हे नोंदवू इच्छितो :)

कंजूस Fri, 01/16/2015 - 18:14
आपल्याकडे रस्त्यात लक्ष देत नसतील तर आपण उगाचच घसरून पडायचं. तिकडे परदेशात फेसबुकवर लाईक मिळाले नाहीत की काही मुलींना फारच डिप्रेशन येतं आणि त्याच्यासाठी स्पेशालिस्ट ,साइकॉलजिस्टची ट्रीटमेंटही घ्यावी लागते. तुमच्या बाबतीत मिपाने झिडकारले असा काही न्यूनगंड येणार नाही याची खात्री आहे. हा 'जालीय आभास आहे'(श्रेय कल्पना एक मिपाकर )आता हे श्रेय कोणाला आहे ते मिपावरचे सर्व लेख अभ्यासून शोधा. हे शोधताना तुमच्या अंगावर साळिंदरचे काटे उगवतील आणि तुम्ही पक्के मिपाकर व्हाल.

तर्री Fri, 01/16/2015 - 18:18
संजयराव , मिपा एक होस्टेल आहे. सुरवातीला त्रास होतो पण फर्स्ट इयर नंतर जसे होस्टेल आवडू लागते तसेच मिपाचे होते. माझे अनुभव सांगतो - १.मिपावर भविष्य , जातीव्यवस्था , हिंदुत्व , देव , भूत , नाडी , गांधी , सावरकर , आंबेडकर , ब्रिगेड यावर भरपूर लेखन , चर्चा , टिंगल झाली आहे. ह्या विषयावर लिहिणे सुरवातीला टाळणे योग्य. २.लिहिताना किमान शुद्धलेखन अपेक्षित असते. त्याकडे लक्ष ध्यावे. ३. मार्मिक ,खवचट , तिखट प्रतिक्रिया देण्यास मात्र घाबरू नका. लेखकाला नाही तर वाचकांना नेहमीच अश्या प्रतिक्रिया नेहमी आवडतात. ४. मिपाचे काही परवलीचे शब्द आहेत , ते समजून घ्या . ५. थोड्याच दिवसात आपला कंपू तयार करा आणि पहा काय मजा येते येथे ! नाराज होवू नका म्हणजेच "निगरगट्ट"" व्हा !

In reply to by तर्री

सतिश गावडे Fri, 01/16/2015 - 19:21
५. थोड्याच दिवसात आपला कंपू तयार करा आणि पहा काय मजा येते येथे !
मलाही येथे खुप खुप मजा करायची आहे. आपला कंपू कसा तयार करायचा हे कृपया सांगाल का?

In reply to by श्रीगुरुजी

असंका Fri, 01/16/2015 - 18:55
अहो गुरुजी असं हिट वगैरेला काही अर्थ अस्तो का? मिपावर ज्या विषयावर प्रत्येकाकडे काहीतरी बोलण्यासारखं निघतं त्या विषयावरचे धागे अशा प्रतिसादांनी भरून जातात. नाहीतर बोका भाऊंचे धागे फ्लॉप झाले असा अर्थ निघायचा...

मिपावर लिहित राहा. नाऊमेद करणा-या प्रतिसादांना घाबरु नका. मिपावर तुम्ही चांगलं लिहाल असं वाटतं. एकदा मिपाची प्रवृत्ती समजली की मग तुम्ही नक्की रमाल. आपले दोन्ही तिन्ही धागे वाचले छान लिहिता. लिहित राहा. -दिलीप बिरुटे

विवेकपटाईत Fri, 01/16/2015 - 20:33
मला तर मराठी पण धड लिहिता येत नाही, चक्क हिंदी शब्द वापरतो, तरी ही मिपावकर सहन करतात. लोकांच्या आवडी निवडीची पर्वा न करता लिहित रहा.

In reply to by विवेकपटाईत

सतिश गावडे Fri, 01/16/2015 - 20:43
काका तुम्हाला हिंदी लिहिता येते म्हणजे मराठीही लिहिता येतच असणार. लिपी एकच आहे हो. देवनागरी.

In reply to by धर्मराजमुटके

सतिश गावडे Fri, 01/16/2015 - 20:58
अभिनंदन संजय साहेब.
काय पण योगायोग पहा. ते ही अभ्यासपुर्ण लिहायचे. हे ही अभ्यास पुर्ण लिहितात. ड्वाले पाणावले.

In reply to by सस्नेह

लंबूटांग Fri, 01/16/2015 - 21:43
गेले? कधी? आयेंगे मेरे संजय संजय आयेंगे. संजय ह्या नावाचाच हा महिमा आहे का? ते सामना मधे पण एक संजय असेच काही काही अभ्यासपूर्ण लिहीतात रोज. प्रत्येक वाक्यात सरासरी ३ विशेषणे वापरलीच पाहिजेत असा काहीसा नियम आहे म्हणे.

तिमा Fri, 01/16/2015 - 21:04
मिपावर येताना, नांवच एकदम 'कडक' घ्यायचं. आन, पायाने जमीन उकरतच यायचं. लोकांना तुमचा दबदबा वाटला पाहिजे. शिवाय महत्वाचं म्हणजे लेखन हे एकतर 'उच्च' नाहीतर 'हुच्चं' असलं पाहिजे. वर सांगितल्याप्रमाणे, दोन मुलांत योग्य अंतरही ठेवावे. लिहित रहा.

In reply to by तिमा

बॅटमॅन Fri, 01/16/2015 - 23:32
ठ्ठो =)) दोन मुलांत आणि दोन अवतारांतही योग्य अंतर ठेवावे, तसेच वर्तनही अंमळ वेगळे असावे. नायतर लग्गेच अवतारामागचा देव ओळखल्या जातो. मग तो थिंकर कितीही ग्रेट असो नायतर कसाही नेफळट असो नायतर कुणी माईसाहेब असो.

In reply to by बॅटमॅन

hitesh Sun, 01/18/2015 - 22:28
णाणा व मै मीच असे सर्व म्हणत होते. पण ते खोटे आहे.

जातवेद Fri, 01/16/2015 - 21:23
हा शांतेचं कार्ट चालू आहे मधला संवाद तुमच्यासाठी, श्यामः तुम्ही मला एक वचन द्या. मिस माया साने: कसलं वचन? श्यामः घाबरू नका मला मदत करायचं. मिस माया साने: हा, ते दिलं. श्यामः आता तुम्ही या घरात राहणार कि नाही, मग तुम्हाला तुमचे नाव बदलावं लागेल. मिस माया साने: काय हो, तुम्ही सगळेजण ईथे नाव बदलून राहता? श्यामः नाही, आम्ही सगळे एकमेकांना नावं ठेउन राहतो. :D

भाकरी Fri, 01/16/2015 - 21:26
तुम्हाला अजून आजची कविता, राजकारण सदरात लेख, झालच तर जनातल मनातल मधे काहितरी अस ब्रच काहि ल्हायचय. प्रतिक्रियाकदडे कुठे लक्ष देतात? चक्की चालु ठेवा.

In reply to by सतिश गावडे

अजया Fri, 01/16/2015 - 21:41
तांबीय सांप्रदायिक काव्यही लिहुन बघू शकता आपण.त्यासाठी मार्गदर्शनही इथेच मिळेल.मठाधिपतींशी ओळख काढल्यास त्यांचे शिष्य म्हणून इतर भक्तगण प्रतिसादाच्या प्रसादाने प्रसन्न करतील तुम्हाला.जय तांबे बाबा =))

चेतन677 Fri, 01/16/2015 - 21:29
तुमची कविता खुप आवडली...असंच लिहीत राहा..आणि काही मिपाकर जर तुमची चेष्टा करत असतील तर जास्त विचार नका करु..तसे सगळे मिपाकर मनाने एकदम चांगले आहेत..मदतीसाठी याच मिपाकरांचे हात लगेच पुढे सरसावतात..या सर्वांची मला सगळ्यात जास्त मदत झालीये..

कंजूस Fri, 01/16/2015 - 21:34
अभ्यासपूर्ण लिहिलं की इतरांना काही शंका, झब्बू, दंगा करायला राहतच नै ना. यापुढं अभ्यासनपूर्ण लिहित चला म्हणजे तुंबळ हाणामारी होईल प्रतिसादांची.

In reply to by हाडक्या

सतिश गावडे Fri, 01/16/2015 - 22:10
त्यांच्या इतर अभ्यास पुर्ण लेखांवर चर्चा करायची सोडून तुम्हाला त्यांनी कळवळ्याने लिहिलेल्या धाग्याची सेंचुरी करायची पडली आहे. असंवेदनशील कुठचे.

In reply to by सतिश गावडे

हाडक्या Fri, 01/16/2015 - 23:13
*lol* तुम्ही त्यांना पदार्पणातच "सखू"ची ओळख (आणि आमाला आठवण ;)ओळख करून दिलीत, तेव्हा कुठे गेली होती तुमची संवेदनशीलता.. ?

In reply to by हाडक्या

सतिश गावडे Sat, 01/17/2015 - 07:20
यसवायजीने सखुची आठवण करुन दिली त्यामुळे मन संक्लीद्य झाले. तसे काव्य मी त्याआधी प्रसवले नव्हते, आणि त्यानंतरही नाही...

शेखर काळे Sat, 01/17/2015 - 08:34
तुम्हाला आवडतं म्हणून लिहिता की लोकांनी तुमचे कौतुक करावे म्हणून ? तुम्हाला जो विषय आवडतो त्या विषयावर तुम्ही जर लिहिलं, मनापासून लिहिलं तर लोकांना आवडेलंच की .. - शेखर काळे

श्रीगुरुजी Sat, 01/17/2015 - 14:29
माईसाहेब मोड ऑनः अरे संजया, लगेच इतका निराश होऊ नकोस रे बाळा. इथले काही सदस्य ना खूप खोडकर आहेत बाई आणि नवीन माणसाची ते खूप टर उडवतात. पण हे म्हणतात की जीवनात थोडी तरी थट्टामस्करी पाहिजेच नाही तर जीवन अगदीच एकसुरी व कंटाळवाणं होईल. माईसाहेब मोड ऑफः

In reply to by टवाळ कार्टा

हाडक्या Sat, 01/17/2015 - 15:54
ये टका .. नीट वाच की .. हे पण आलेत हं. गुर्जींची आणि नानांची गहिरी दोस्ती होती(आहे) म्हणे. गुर्जी माईंना वैनी म्हणित जा हो.. *lol*

In reply to by हाडक्या

सतिश गावडे Sat, 01/17/2015 - 21:35
गुर्जी माईंना वैनी म्हणित जा हो..
एव्हढा जिव्हाळा नवमिपाकरांबद्दल दाखवलात तर त्यांच्यावर असे धागे काढायची वेळ येणार नाही.

In reply to by सतिश गावडे

हाडक्या Mon, 01/19/2015 - 16:09
सगा उर्फ धनाजीराव, आमी सोता नव-मिपाकर (आणि नव-कवी, नव-विडंबक इ.इ.) आहोत हो. त्यामुळे एक नवमिपाकर दुसर्‍या नवमिपाकराशी बंधुभावाच्या जिव्हाळ्याने जोडला गेलेला आहे ( जाऊ देत, ते तुमच्यासारख्या कंपुबाजास नाही कळावयाचे.. ;) ) . गुर्जी आणि नानांचा स्नेह आम्हास नेहमीच लोभवत आला आहे, त्यात काय एवढे.. :)

जेपी Sun, 01/18/2015 - 10:48
श्री.संजयजी कोकरे साहेब, प्रथमतः तुमचे अभिनंदन,ज्याप्रकारे तुम्ही हा लेख लिहुन एका अन्यायाला वाचा फोडली आहे त्यास तोड नाही. ज्या प्रमाणे महाभारातील संजय युद्धभुमीचे वर्णन करायचा, ज्या प्रमाणे सामना चे संजय विरोधकावर तुटुन पडतात, ज्या प्रमाणे आमचे हेवनवासी गुर्रदेव लोकांना भ्रमातुन बाहेर काढायचे, त्याच प्रमाणे तुम्ही नवीन मिपाकरांवर होणर्‍या अन्यायावर लेख लिहीला आहे. आज आल्यावर प्रथम तुमचे सर्व लेख वाचले.सर्व लेखांबद्दल ईथेच टोपी काढुन सलाम. असेच लेख लिहीत रहा.आमची संघटना तुमच्या पाठीशी आहे.गरज भासल्यास यावर एक आंदोलन हि करु, तसाही पयल्या आंदोलनाला बराच काळ लोटला आहे.सध्या कार्यकर्त व्यस्त आहेत वेळ मिळाला की आंदोलनाची दिशा ठरवु. लेखापेक्षा प्रतिसाद मोठा होऊ नये या साठी थांबतो. जाता जाता- हाफ शेंच्युरी निमीत्त श्री आदुबाळ यांनी तुमचा सत्कार केला आहे.त्या बद्दल त्यांचे आभार आणी आता शेंचुरी निमीत्त तुमचा आणी श्री.आदुदादु यांचा सत्कार (काय द्यावे बर!!) करण्यात येत आहे. . . कळावे आपला नम्र. जेपी, गाव- लातुर तालुका- महाराष्ट्र जिल्हा- भारत जय हिंद ,जय मिपा.

In reply to by जेपी

आनन्दिता Sun, 01/18/2015 - 10:56
+१ बरं झालं तुम्ही आवाज उठवलात संजयजी! आमच्यात तुमच्या इतकी हिंमत नव्हती मिपावर नवे आलो तेव्हा! आता मात्र तुम्ही पिच्छाच पुरवा या अच्रत मिपाकरांचा., खोड मोडा मेल्यांची!

In reply to by आनन्दिता

रेवती Sun, 01/18/2015 - 23:45
खोड मोडा मेल्यांची! हे वाचून हसल्या गेले आहे. संजयजींनी आभार मानलेत त्यावर आणखी हसू आले. तुमची चेष्टा करण्याचा हेतू निदान माझा तरी नाही. जेपी, शेंचुरीबद्दल उसाची मोळी दिली तरी चालेलसे दिसते.

तुम्ही मिपावर नवीन असला तरी आभासी जगतात नक्कीच चार पावसाळे पाहिलेले वाटतात. पदार्पणातच लक्ष वेधून घेऊन सनसनाटी निर्माण करण्यासाठी हा धागा काढला , येथे कोणताही आयडी जिलब्या पाडाव्या तसे धागे पाडताना दिसत नाही मात्र तुम्ही त्या पाडल्या. अनेक नवीन आयडी ही चूक करतात तुमचे नशीब थोर आहे तुम्ही सध्या मिपावर आला आहात सध्या मला येथे कंपू बाजी अजिबात दिसत नाही आहे त्यांचा बाजार केव्हाच उठला

पदार्पणाटंच शभंरी भरवणारे आणि जेष्ठ सदस्यांच्या "जुलमी" राजवटीविरुद्ध आवाज उठवुन नौमिपाकंरासं स्वातत्र्यांचे किंरण दाखवणांरे स्वातत्र्यंसेनानी, तसेच लेखप्रसवरत्न लेखकश्रेष्ठ नौमिपाकर श्रीं.श्रीं. सजंयजी ह्यांना विनम्रं प्रणांम. आपल्यां ह्या प्रयत्नासं याक्टीव पाठिंबा म्हणुन दिनाकं १४ फेब्रुवारी व १५ फेब्रुवारीरोजी कंशेंळें येथे मेंणंबंत्तीं मोर्चा काढण्यांचा ठराव आमच्या अस्तित्वात नसलेल्या कपुंने केलेला आहे. तरी आमच्या दुकानातुन एक एक बॉक्स मेणबत्त्या विकतं घेउन ह्या स्वायत्तातत्रं आदोंलनास सक्रीयं पांठिबां द्यावा ही नम्र विनंती. पेश्शल ऑफर एंक बॉक्स मेणबंत्तीवर १ कांडेपेंटी फ्री. आणि एक गिफ्ट कुपन ज्यात तुम्ही जिकुं शकतां जींवंनं ह्यांनां कंळंलें हों ह्या कुंथांसंग्रंहांचीं एंकं लिंमिंटेंडं काँपीं. त्वंरां कंरां. ऑफर सं.मं.ची वक्रदृष्टी वळेपर्यंत किंवा जेष्ठ सभासदांनी कंपुंसेंनां घेउन "ब्लित्झ क्रिग" करेपर्यंतचं लांगुं. (जेंष्ठंही नै आणि नौमिपाकरही नै अश्या कात्रीत अडकलेला आणि जीवनकथांमधला गुंढं अर्थावर पिंपळ्गाव ढेम्शे विंटर्नॅशनल उणिव-सिटी मधुन पींएचंडीं करणारा) कॅफ्टन खिक्क पारो!! =))

In reply to by सतिश गावडे

नाखु Tue, 01/20/2015 - 10:03
अर्थात काडेपेटीसह अनुदानात मिळाव्यात. किमान ३३% टक्केतरी.. (नव्-कवी,नव्-मिपाकर्,नव्-मिपासाक्षर्,नव्-मिपासाक्षर-भित्-प्रतिसादक्,कुंथीत कवीता साक्षर) संघ यांचे तर्फे जोर्दार मागणी. अन्यथा (मोजून ३३) मिनिटांचे उपोषण केले जाईल हा जाहीर इशारा.