मी आणि ते
MSCIT.फुल हादरलो , MSCIT??????? (नाही रे नाही नसतं रे असं ... अरे ए .. सांगा रे कोणीतरी याला , पहिलीतली मुले पण देतात हि परीक्षा) म्हटलं मास्टर्स कुठून केलं? तर म्हणाले इथूनच गजाजन काम्पुटर मधून घराखालीच आहे, सरकारी नोकरी आता अश्शी मिळेल.. दोन मिनिटे काही बोलायच्या मनस्थितीत नव्हतो नंतर चेहऱ्यावर कुठलेच भाव येत नव्हते... हातपाय लटपटत होते त्यांना तसेच वंदन केले आणि कशीबशी त्यांची बोळवण केली. सुदैवाने नंतर पत्रिका जुळली नाही, आणि मी वाचलो प्रसंग २ : काही दिवस शांततेत गेले आणि अजून एक वेगळे "ते" श्री. XXX असेच रविवार संध्याकाळचे घरी उगवले,नेमक्या एक काकू घरी येऊन बसल्या होत्या.मागचा अनुभव असल्याने मी सावरून बसलो आणि आधी बायो डेटा वर झडप मारून शिक्षण चेक केलं.हा ठीके आतापुढे हे गृहस्थ मिस्टर बिन चा मराठी अवतार म्हणता येईल असे, नुसती चळवळ, आई बाबा हस्तायेत माझ्याकडे बघून. मी शक्य तेवढा मख्ख चेहरा ठेऊन थंडपणे बोलत होतो, मग हे साहेब आई बाबांना अहो आई , अहो बाबा म्हणायला लागले, आईंग म्हटल डायरेक्ट आई आणि बाबा ? आपण कुठे कामाला होतात म्हटल्यावर एकदम ताडकन उभेच राहिले, आणि शर्टात हात घालून काहीतरी शोधायला लागले, म्हटल आता हे काय, ५ मिनिटांनी त्यांना त्यांचे ओळखपत्र सापडले, साहेब रेल्वेत होते.आता रिटायर. मग म्हणे मला AC टून प्रवास असतो, तेही मोफत आहात कुठे ? मी :हँ,हँ.. हो का ? मस्तच ते : मग,आणि मी कोणाला अजून एकाला सोबत घेऊन जाऊ शकतो. त्यांना पण मोफतच,बाबांना फिरवेन मी मस्त.काय बाबा याचं लग्न झालं कि आपण दोघे मोकळेच कि (मायला याच्या कुठे पोचला हा),बाबांनाच असं नाही हा तुम्हाला पण अख्खा भारत फिर्वेन मी. मी : (ए नको रे नको असं बोलू, कंट्रोल जातोय माझा,तोंडावर हसेन मग मी येड्यासारखा,बरे दिसेल का ते) आ ? ते: : म्हणजे कोणीही एक चालतो. पुरूषच पाहिजे असं काही नाही, उद्या समजा या काकूंना पण मी घेऊन जैन (तोवर काकू ताडकन ..ऑ नको नको.. काहीतरीच आपलं,असं काहीसे घशातून विचित्र आवाज काढत बरळत उठून चपला घालायला लागल्या, आई आत पळाली ती शेवटपर्यंत बाहेर आलीच नाही) म्हणजे माझी हि बहिण आहे असे सांगीन हो मी, तात्पर्य काय कि आता ट्रेन ची चिंता नाही मी : ण हसल्याने आतडी पीळवटली गेली होती, काकू पसार झालेल्या होत्या, मी आणि बाबा दोघे आता खिंड लढवत होतो. ते: मी काय म्हणतो जावाय बापू (संपलोच), आता नेमके आपण किती जवळ राहतो, रात्री कधीही जेवायला आलात तरी तुम्ही दोघे ५ मिनिटात घरी, सगळे आपण एकत्रच म्हणजे ( मेलो मेलो ) मी : काका, अहो एवढा पुढचा विचार नको हो, आधी पत्रिका तर जुळून दे. ते: ती जुळली आहेच मी आधीच दाखवली आहे, आता कशाला वेळ घालवायचा, पटापट पुढच्या गोष्टी बोलायला लागू या, आणि मुलगी तुला आवडेलच प्रश्नच नाही, मी सांगतो ना. काय बाबा ? (वारलो) हे ऐकून उरले सुरले त्राण गेले, पुढचे काहिच ऐकू आले अहि बहुधा नातवंडांची नावे काय ठेवायची यावर चर्चा सुरु होती, मी शुद्धीत आलो तेंव्हा ते गेलेले होते. घर शांत होतं प्रसंग ३ : या तडाख्यातून सावरायला वेळ लागला, आता घरी मी नसताना कोणालाही बोलवायचं असेल तर बोलवा हे डील मी फायनल केलं एका शुक्रवारी मी ऑफिस मध्ये असताना मातोश्रींनी फोन केला, अरे ऐक ना, एक श्री XXXX म्हणून आहेत त्यांनी फोन केलेला, ते तुला भेटायचं म्हणत आहेत आज,सोबत पत्रिका नी फोटो घेऊन येतील, तर त्यांना भेटून घे ओके? तुझा नंबर दिलाय मी त्यांना. मी काही बोलायच्या आत अर्थात फोन ठेवला गेला. चायला विकेंड चा एकतर मी कसंही ऑफिस ला जातो , थ्री फोर्थ आणि वर टी शर्ट, आजच यायचं होतं काय.आणि मागचे अनुभव बघता मला कल्पनेनेच घाम फुटायला लागला, आता तर मी एकटा होतो, होम ग्रौन्ड पण नव्हतं. कामातले लक्ष उडाले, साधारण १२ ला त्यांचा फोन आला. मी पत्ता सांगितला, ऑफिस च्या बाजूला CCD मध्ये भेटायचे ठरले.बोलण्यावरून तरी तो माणूस बरंच शांत वाटला, जरा धीर आला. २ ची वेळ ठरलेली, ३ वाजले तरी पत्ता नाही, म्हटल चला बराय वाचलो हे महाशय काही येत नाहीत आता, तेवढ्यात फोन वाजलाच, ते आलेले होते, मीपण निघालो CCD त. २ कॉफी ऑर्डर केल्या आणि बसलो, परत सेम नमस्कार चमत्कार, स्वतःची ओळख वेग्रे. माणूस एकदम शांत होता प्रश्नच नाही.मी मुलीबद्दल विचारले, तर त्याने पिशवीतून एक जाडजूड फाईल काढली ( मी घाबरलो म्हटल हिची सर्तीफिकेत्स आणली कि काय ह्याने पहिलीपासूनची) ते : मी xxxx,सर्प मित्र आहे मी : अरे वा ते : होय १९६५ पासून वयाच्या १५ व्या वर्षीपासून मी साप पकडतो, ( फाईल उघडून - त्यात वर्तमान पत्रांची कात्रणे चिकटवलेली होती) हे १९७० पासून पेपरात माझी नावे यायला लागली. (मायला हा लग्नाचा अल्बम दाखवतो तसा मला एक एक पान दाखवत होता , नको रे ए नको न प्लीज्ज ) साधारण अर्ध्या तासानंतर अर्ध पुस्तक संपलं ते: अशी पटापट पाने नका उलटू , तुम्हाला समजणार नाही मग, एक एक बातमी नीट वाचा, आता वेळ काढून आलाच आहात म्हणून सांगतोय , नाहीतर हल्लीच्या तरुण मुलांना जर्रा म्हणून वेळ नसतो, हा बघा मी हिमाचल मध्ये पण एक साप पकडलेला, तिकडच्या पेप्रातली बातमी. नंतर हॉटेल वाल्याने मला कुरियर केला पेपर,अशी दयाळू माणसे असतात मी : मुलगी काय करते ? ते : हा तर त्यानंतर मी नोकरी सोडून दिली आणि पूर्णपणे यात उतरलो ( अरे ए .. मे क्या बोल रहा हु, तू क्या बोल रहा हे , मी तेरी मुलगी के बारे मे पुच रहा हु णा)नोकरी महत्वाची कि साप पकडणे ? सांगा पाहू ? अजून साधारण पंधरा मिनिटांनी मी : पत्रिका आणि फोटो मागितलेला आईने आणलाय का ? ते: हल्ली सर्प मित्र उरलेत कुठे पण , माझं पण वय झालाय आता, मी अजून एक पण काम करतो , समाजसेवा म्हणता येईल, अंधांसाठी मी ब्रेल लिपीत पुस्तके लिहितो, हि बघा (पोतडीतून त्यांनी अजून काही जाडजूड पुस्तके काढली, अता मला काय घंटा कळणारे त्यातले साहेब माझा हात हातात घेऊन त्या पुस्तकावर ठेऊन मला सांगत होते हे बघा हि ब्रेल लीपी (काय सांगताय काय? हाव च्वित) इकडे ऑफिस मधून फोन वर फोन पोरगा गायब झाला कुठे पुढील बराच वेळ मग अंध, ब्रेल लिपी आणि समाजसेवा यावर गेला मी: पत्रिका देताय णा ते : देतो हो त्या आधी मी एक गम्मत आणलीये , तुमच्या साठी नवीन असेल, मला उशीर का झाला याचे कारण मी : ??? (अजून एक काळी पिशवी टेबलावर आली) ते : तुम्हाला भेटायचं म्हणून निघालो आणि कॉल आला, चेंबूर BARC भागात मध्ये धामण दिसलीये, मग आधी तिकडे गेलो, (
तोवर ती काळी पिशवी वळवळायला लागली, आणि मला अंदाज आला त्यात ती पकडलेली धामण होती) मग पकडली आणि आणली इथे आता इथून येऊर ला जाणार आणि सोडणार, हात लावा ना (नको हो नको , हातभर फाटलीये माझी) अहो लावा हो हात मी सांगतो कशी धरायची ते, माझी बोबडी वळलेली होती, माझा हात पकडायचा ते साहेब निरर्थक प्रयत्न करत होते, ती पिशवी वळवळत होती आणि त्यात धामण होती. मी: काका अहो नको लोक बघतायेत आपण निघुयात आता, नंतर केंव्हातरी मी येईन साप पकडायला,(तेवढ्यात त्यांच्या गडबडीत ती पिशवी खाली पडली आणि अर्धी धामण पब्लिकला पण दिसली, आधीच एकतर हुच्च्च लोकस पुढे काय झाले असेल , कल्पना करा लिहित बसत नाही) आता मला त्या CCD मध्ये घेत नाहीत :( त्या मुली बद्दल काहीही समजले नाही, पत्रिका नंतर त्यांनी मेल केली, ती अर्थातच जुळली नाही आता पुढचा धक्का कधी बसणारे या विचारात दिवस काढतोय, बापू म्हणतात बेटा ये तो ट्रेलर हे ,पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त!!!!! -धक्क्याला लागलेला (स्पा )
डायरेक्ट आई आणि बाबा ? आपण कुठे कामाला होतात म्हटल्यावर एकदम ताडकन उभेच राहिले, आणि शर्टात हात घालून काहीतरी शोधायला लागले, म्हटल आता हे काय, ५ मिनिटांनी त्यांना त्यांचे ओळखपत्र सापडले, साहेब रेल्वेत होते.आता रिटायर. मग म्हणे मला AC टून प्रवास असतो, तेही मोफत आहात कुठे ? मी :हँ,हँ.. हो का ? मस्तच ते : मग,आणि मी कोणाला अजून एकाला सोबत घेऊन जाऊ शकतो. त्यांना पण मोफतच,बाबांना फिरवेन मी मस्त.काय बाबा याचं लग्न झालं कि आपण दोघे मोकळेच कि (मायला याच्या कुठे पोचला हा),बाबांनाच असं नाही हा तुम्हाला पण अख्खा भारत फिर्वेन मी. मी : (ए नको रे नको असं बोलू, कंट्रोल जातोय माझा,तोंडावर हसेन मग मी येड्यासारखा,बरे दिसेल का ते) आ ? ते: : म्हणजे कोणीही एक चालतो. पुरूषच पाहिजे असं काही नाही, उद्या समजा या काकूंना पण मी घेऊन जैन (तोवर काकू ताडकन ..ऑ नको नको.. काहीतरीच आपलं,असं काहीसे घशातून विचित्र आवाज काढत बरळत उठून चपला घालायला लागल्या, आई आत पळाली ती शेवटपर्यंत बाहेर आलीच नाही)हसुन ठसका लागुन मेलोय!!! पोचवा रे कोणीतरी. =))
In reply to हा हा हा हा.... भयंकर लिहले by Mrunalini
In reply to कं लिवलंय !कं लिवलंय !! by अजया
In reply to @ स्पा - टीपीकल मराठी by प्रसाद१९७१
तिसर्या प्रसंग तर खोटा वाटला. कोणी साप पिशवीत घालुन मुलाच्या घरी येइल असे वाटत नाही.नीट वाचलंत तर बर होईल, इथे कोणाचीच चेष्टा केलेली नाहीये मी :)
In reply to @ स्पा - टीपीकल मराठी by प्रसाद१९७१
मुलीच्या शिक्षणावरुन केलेली चेष्टायाचा विचार पालकांनी करायला हवा आम्हीही काही मोठे शकलेलो नाही, पण निदान जे आहे ते सत्य सांगतो असो या वादात मला पडायचे नाहीये :)
In reply to मुलीच्या शिक्षणावरुन केलेली by स्पा
In reply to स्पार्ली चेष्टो by कपिलमुनी
In reply to @ स्पा - टीपीकल मराठी by प्रसाद१९७१
In reply to पां डुब्बाssssssssss!!!! by अत्रुप्त आत्मा
मास्टर्स कुठून केलं? तर म्हणाले इथूनच गजाजन काम्पुटर मधून घराखालीच आहे,अक्षरश: ठ्ठो ठ्ठो हसलो ...आजूबाजूचे चमत्कारिक नजरेने बघताहेत :D
In reply to ह्म्म by विटेकर
In reply to ह्म्म by विटेकर
In reply to ह्म्म by विटेकर
हे लोक चक्रम या सदरात मोडत असावेत किंवा अपवाद असावेत कि ज्याने वरील नियम सिद्ध होतो.आणि हे चक्रम लोक बरोबर आपल्यालाच शोधत कसे आले हा ही पण फार विचार करायची गोष्ट आहे. :-)
In reply to हे लोक चक्रम या सदरात मोडत by प्रसाद१९७१
In reply to अरेच्या हा मुलगा लग्नाचा आहे by ज्ञानोबाचे पैजार
In reply to ऑ??? by स्पंदना
In reply to तुमचे काय जातय चेष्टा करायला by ज्ञानोबाचे पैजार
In reply to तुमचे काय जातय चेष्टा करायला by ज्ञानोबाचे पैजार
In reply to तुमचे काय जातय चेष्टा करायला by ज्ञानोबाचे पैजार
In reply to पैजार बुवा स्पा ने अगर जनम by स्पंदना
In reply to पैजार बुवा स्पा ने अगर जनम by स्पंदना
पैजार बुवा स्पा ने अगर जनम लिया है,तो सिर्फ इसलीये के वो मेरा जावई बन सके।धन्य __/\__
In reply to पैजार बुवा स्पा ने अगर जनम by स्पंदना
In reply to पैजार बुवा स्पा ने अगर जनम by स्पंदना
In reply to स्पावड्या को छोड दो.... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to पळा ................... by स्पा
In reply to स्पावडी!!!!! by पियुशा
In reply to क्काय्य!!!!??? तुलाही मुली by बिपिन कार्यकर्ते
In reply to ठ्ठो =)) by बॅटमॅन
In reply to क्काय्य!!!!??? तुलाही मुली by बिपिन कार्यकर्ते
In reply to अगागागगगगगग!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to क्काय्य!!!!??? तुलाही मुली by बिपिन कार्यकर्ते
In reply to क्काय्य!!!!??? तुलाही मुली by बिपिन कार्यकर्ते
In reply to क्काय्य!!!!??? तुलाही मुली by बिपिन कार्यकर्ते
In reply to क्काय्य!!!!??? तुलाही मुली by बिपिन कार्यकर्ते
In reply to च्यायला माझा बाजार .......... by पियुशा
In reply to प्रथमार्ध पुन्हा एकदा मनातच by बॅटमॅन
प्रथमार्ध पुन्हा एकदा मनातच ट्रान्स्लिटरवून पाहिला आणि फुटलोमि पण =)) वारल्याच गेलो एकदम
In reply to प्रथमार्ध पुन्हा एकदा मनातच by स्पा
In reply to खी खी खी तरी बरं अर्थ ठीकच by बॅटमॅन
In reply to अब्बे ....ए़ ......कार्ट्यानो by पियुशा
In reply to फारच सोज्वळ ब्बॉ तुम्ही by टवाळ कार्टा
In reply to आला का टवाळ खोर ? ये ये तुझिच by पियुशा
In reply to स.म. माझी प्रतिक्रिया उड्वुन by पियुशा
In reply to प्रथमार्ध पुन्हा एकदा मनातच by स्पा
In reply to प्रथमार्ध पुन्हा एकदा मनातच by बॅटमॅन
In reply to प्रथमार्ध पुन्हा एकदा मनातच by बॅटमॅन
In reply to प्रथमार्ध पुन्हा एकदा मनातच by बॅटमॅन
प्रथमार्ध पुन्हा एकदा मनातच ट्रान्स्लिटरवून पाहिला आणि फुटलोहो ना राव!! लै मंजे लैच हसतोय!!
In reply to क्काय्य!!!!??? तुलाही मुली by बिपिन कार्यकर्ते
In reply to क्काय्य!!!!??? तुलाही मुली by बिपिन कार्यकर्ते
हात लावा ना (नको हो नको , हातभर फाटलीये माझी) अहो लावा हो हात मी सांगतो कशी धरायची ते,.....हा हा हा आजून हसतो आहे .............
In reply to मी सुटलो रे..... by नन्दादीप
तुझ्या निमित्ताने जुने लोक परत आलेले बघून ड्वॉले पाणावले......ह्येच बोल्तो ;)
In reply to तुझ्या निमित्ताने जुने लोक by स्पा
In reply to लेख आवडला . एकदम खुसखुशीत . by पिंपातला उंदीर
मित्र निव्वळ मुली मिळत नाहीत म्हणून नाईलाजाने ब्रम्हचारी आहेत .तुम्हाला अविवाहित म्हणायचा आहे का ;)
In reply to अविवाहित by कपिलमुनी
>>तुम्हाला अविवाहित म्हणायचा आहे का=))))
In reply to >>तुम्हाला अविवाहित म्हणायचा by सूड
In reply to अविवाहित by कपिलमुनी
In reply to अविवाहित by कपिलमुनी
In reply to अविवाहित by कपिलमुनी
In reply to प्रसंग १ आणि २ कहर आहेत. by आदूबाळ
असे आडाखे बांधून आगोदरच फिल्डिंग लावून बसतात - हा अनुभव सर्वात भारी असतो.भारी म्हणजे अत्यंत भारी असतो आणि फिल्डिंग कोसळल्यावर होणारा त्रागा अत्यंत करमणूक करणारा!! ;)
In reply to प्रसंग १ आणि २ कहर आहेत. by आदूबाळ
In reply to प्रसंग १ आणि २ कहर आहेत. by आदूबाळ
ओळखीच्या काकवा/मावश्या "हा कधी (ना कधी) तरी उपवर होईल, आणि हे स्थळ आपल्या चुलतभावजयीच्या पुतणीसाठी योग्य असेल" असे आडाखे बांधून आगोदरच फिल्डिंग लावून बसतात - हा अनुभव सर्वात भारी असतोकुठल्या जमान्यात आहात आदूबाळ. मुलाचे लग्न होण्यासाठी फक्त मुलगी असावी एव्हडीच अपेक्षा असावी अशी वेळ आली आहे.
In reply to ओळखीच्या काकवा/मावश्या "हा by प्रसाद१९७१
डायरेक्ट आई आणि बाबा ? आपण