मी आणि ते
MSCIT.फुल हादरलो , MSCIT??????? (नाही रे नाही नसतं रे असं ... अरे ए .. सांगा रे कोणीतरी याला , पहिलीतली मुले पण देतात हि परीक्षा) म्हटलं मास्टर्स कुठून केलं? तर म्हणाले इथूनच गजाजन काम्पुटर मधून घराखालीच आहे, सरकारी नोकरी आता अश्शी मिळेल.. दोन मिनिटे काही बोलायच्या मनस्थितीत नव्हतो नंतर चेहऱ्यावर कुठलेच भाव येत नव्हते... हातपाय लटपटत होते त्यांना तसेच वंदन केले आणि कशीबशी त्यांची बोळवण केली. सुदैवाने नंतर पत्रिका जुळली नाही, आणि मी वाचलो प्रसंग २ : काही दिवस शांततेत गेले आणि अजून एक वेगळे "ते" श्री. XXX असेच रविवार संध्याकाळचे घरी उगवले,नेमक्या एक काकू घरी येऊन बसल्या होत्या.मागचा अनुभव असल्याने मी सावरून बसलो आणि आधी बायो डेटा वर झडप मारून शिक्षण चेक केलं.हा ठीके आतापुढे हे गृहस्थ मिस्टर बिन चा मराठी अवतार म्हणता येईल असे, नुसती चळवळ, आई बाबा हस्तायेत माझ्याकडे बघून. मी शक्य तेवढा मख्ख चेहरा ठेऊन थंडपणे बोलत होतो, मग हे साहेब आई बाबांना अहो आई , अहो बाबा म्हणायला लागले, आईंग म्हटल डायरेक्ट आई आणि बाबा ? आपण कुठे कामाला होतात म्हटल्यावर एकदम ताडकन उभेच राहिले, आणि शर्टात हात घालून काहीतरी शोधायला लागले, म्हटल आता हे काय, ५ मिनिटांनी त्यांना त्यांचे ओळखपत्र सापडले, साहेब रेल्वेत होते.आता रिटायर. मग म्हणे मला AC टून प्रवास असतो, तेही मोफत आहात कुठे ? मी :हँ,हँ.. हो का ? मस्तच ते : मग,आणि मी कोणाला अजून एकाला सोबत घेऊन जाऊ शकतो. त्यांना पण मोफतच,बाबांना फिरवेन मी मस्त.काय बाबा याचं लग्न झालं कि आपण दोघे मोकळेच कि (मायला याच्या कुठे पोचला हा),बाबांनाच असं नाही हा तुम्हाला पण अख्खा भारत फिर्वेन मी. मी : (ए नको रे नको असं बोलू, कंट्रोल जातोय माझा,तोंडावर हसेन मग मी येड्यासारखा,बरे दिसेल का ते) आ ? ते: : म्हणजे कोणीही एक चालतो. पुरूषच पाहिजे असं काही नाही, उद्या समजा या काकूंना पण मी घेऊन जैन (तोवर काकू ताडकन ..ऑ नको नको.. काहीतरीच आपलं,असं काहीसे घशातून विचित्र आवाज काढत बरळत उठून चपला घालायला लागल्या, आई आत पळाली ती शेवटपर्यंत बाहेर आलीच नाही) म्हणजे माझी हि बहिण आहे असे सांगीन हो मी, तात्पर्य काय कि आता ट्रेन ची चिंता नाही मी : ण हसल्याने आतडी पीळवटली गेली होती, काकू पसार झालेल्या होत्या, मी आणि बाबा दोघे आता खिंड लढवत होतो. ते: मी काय म्हणतो जावाय बापू (संपलोच), आता नेमके आपण किती जवळ राहतो, रात्री कधीही जेवायला आलात तरी तुम्ही दोघे ५ मिनिटात घरी, सगळे आपण एकत्रच म्हणजे ( मेलो मेलो ) मी : काका, अहो एवढा पुढचा विचार नको हो, आधी पत्रिका तर जुळून दे. ते: ती जुळली आहेच मी आधीच दाखवली आहे, आता कशाला वेळ घालवायचा, पटापट पुढच्या गोष्टी बोलायला लागू या, आणि मुलगी तुला आवडेलच प्रश्नच नाही, मी सांगतो ना. काय बाबा ? (वारलो) हे ऐकून उरले सुरले त्राण गेले, पुढचे काहिच ऐकू आले अहि बहुधा नातवंडांची नावे काय ठेवायची यावर चर्चा सुरु होती, मी शुद्धीत आलो तेंव्हा ते गेलेले होते. घर शांत होतं प्रसंग ३ : या तडाख्यातून सावरायला वेळ लागला, आता घरी मी नसताना कोणालाही बोलवायचं असेल तर बोलवा हे डील मी फायनल केलं एका शुक्रवारी मी ऑफिस मध्ये असताना मातोश्रींनी फोन केला, अरे ऐक ना, एक श्री XXXX म्हणून आहेत त्यांनी फोन केलेला, ते तुला भेटायचं म्हणत आहेत आज,सोबत पत्रिका नी फोटो घेऊन येतील, तर त्यांना भेटून घे ओके? तुझा नंबर दिलाय मी त्यांना. मी काही बोलायच्या आत अर्थात फोन ठेवला गेला. चायला विकेंड चा एकतर मी कसंही ऑफिस ला जातो , थ्री फोर्थ आणि वर टी शर्ट, आजच यायचं होतं काय.आणि मागचे अनुभव बघता मला कल्पनेनेच घाम फुटायला लागला, आता तर मी एकटा होतो, होम ग्रौन्ड पण नव्हतं. कामातले लक्ष उडाले, साधारण १२ ला त्यांचा फोन आला. मी पत्ता सांगितला, ऑफिस च्या बाजूला CCD मध्ये भेटायचे ठरले.बोलण्यावरून तरी तो माणूस बरंच शांत वाटला, जरा धीर आला. २ ची वेळ ठरलेली, ३ वाजले तरी पत्ता नाही, म्हटल चला बराय वाचलो हे महाशय काही येत नाहीत आता, तेवढ्यात फोन वाजलाच, ते आलेले होते, मीपण निघालो CCD त. २ कॉफी ऑर्डर केल्या आणि बसलो, परत सेम नमस्कार चमत्कार, स्वतःची ओळख वेग्रे. माणूस एकदम शांत होता प्रश्नच नाही.मी मुलीबद्दल विचारले, तर त्याने पिशवीतून एक जाडजूड फाईल काढली ( मी घाबरलो म्हटल हिची सर्तीफिकेत्स आणली कि काय ह्याने पहिलीपासूनची) ते : मी xxxx,सर्प मित्र आहे मी : अरे वा ते : होय १९६५ पासून वयाच्या १५ व्या वर्षीपासून मी साप पकडतो, ( फाईल उघडून - त्यात वर्तमान पत्रांची कात्रणे चिकटवलेली होती) हे १९७० पासून पेपरात माझी नावे यायला लागली. (मायला हा लग्नाचा अल्बम दाखवतो तसा मला एक एक पान दाखवत होता , नको रे ए नको न प्लीज्ज ) साधारण अर्ध्या तासानंतर अर्ध पुस्तक संपलं ते: अशी पटापट पाने नका उलटू , तुम्हाला समजणार नाही मग, एक एक बातमी नीट वाचा, आता वेळ काढून आलाच आहात म्हणून सांगतोय , नाहीतर हल्लीच्या तरुण मुलांना जर्रा म्हणून वेळ नसतो, हा बघा मी हिमाचल मध्ये पण एक साप पकडलेला, तिकडच्या पेप्रातली बातमी. नंतर हॉटेल वाल्याने मला कुरियर केला पेपर,अशी दयाळू माणसे असतात मी : मुलगी काय करते ? ते : हा तर त्यानंतर मी नोकरी सोडून दिली आणि पूर्णपणे यात उतरलो ( अरे ए .. मे क्या बोल रहा हु, तू क्या बोल रहा हे , मी तेरी मुलगी के बारे मे पुच रहा हु णा)नोकरी महत्वाची कि साप पकडणे ? सांगा पाहू ? अजून साधारण पंधरा मिनिटांनी मी : पत्रिका आणि फोटो मागितलेला आईने आणलाय का ? ते: हल्ली सर्प मित्र उरलेत कुठे पण , माझं पण वय झालाय आता, मी अजून एक पण काम करतो , समाजसेवा म्हणता येईल, अंधांसाठी मी ब्रेल लिपीत पुस्तके लिहितो, हि बघा (पोतडीतून त्यांनी अजून काही जाडजूड पुस्तके काढली, अता मला काय घंटा कळणारे त्यातले साहेब माझा हात हातात घेऊन त्या पुस्तकावर ठेऊन मला सांगत होते हे बघा हि ब्रेल लीपी (काय सांगताय काय? हाव च्वित) इकडे ऑफिस मधून फोन वर फोन पोरगा गायब झाला कुठे पुढील बराच वेळ मग अंध, ब्रेल लिपी आणि समाजसेवा यावर गेला मी: पत्रिका देताय णा ते : देतो हो त्या आधी मी एक गम्मत आणलीये , तुमच्या साठी नवीन असेल, मला उशीर का झाला याचे कारण मी : ??? (अजून एक काळी पिशवी टेबलावर आली) ते : तुम्हाला भेटायचं म्हणून निघालो आणि कॉल आला, चेंबूर BARC भागात मध्ये धामण दिसलीये, मग आधी तिकडे गेलो, (
तोवर ती काळी पिशवी वळवळायला लागली, आणि मला अंदाज आला त्यात ती पकडलेली धामण होती) मग पकडली आणि आणली इथे आता इथून येऊर ला जाणार आणि सोडणार, हात लावा ना (नको हो नको , हातभर फाटलीये माझी) अहो लावा हो हात मी सांगतो कशी धरायची ते, माझी बोबडी वळलेली होती, माझा हात पकडायचा ते साहेब निरर्थक प्रयत्न करत होते, ती पिशवी वळवळत होती आणि त्यात धामण होती. मी: काका अहो नको लोक बघतायेत आपण निघुयात आता, नंतर केंव्हातरी मी येईन साप पकडायला,(तेवढ्यात त्यांच्या गडबडीत ती पिशवी खाली पडली आणि अर्धी धामण पब्लिकला पण दिसली, आधीच एकतर हुच्च्च लोकस पुढे काय झाले असेल , कल्पना करा लिहित बसत नाही) आता मला त्या CCD मध्ये घेत नाहीत :( त्या मुली बद्दल काहीही समजले नाही, पत्रिका नंतर त्यांनी मेल केली, ती अर्थातच जुळली नाही आता पुढचा धक्का कधी बसणारे या विचारात दिवस काढतोय, बापू म्हणतात बेटा ये तो ट्रेलर हे ,पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त!!!!! -धक्क्याला लागलेला (स्पा )
प्रतिक्रिया
In reply to नाही हो. माझ्या जवळच्या by आदूबाळ
In reply to नुस्ते नगाला नग असून चालत by टवाळ कार्टा
In reply to अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र by वेल्लाभट
In reply to विनोदी लेखन म्हणून छान आहे. by कंजूस
हेटाळणी नकोसहमत.
In reply to विनोदी लेखन म्हणून छान आहे. by कंजूस
In reply to च्यायला वधूपित्यांचा तो by बॅटमॅन
In reply to चालायचचं by स्पा
In reply to च्यायला वधूपित्यांचा तो by बॅटमॅन
In reply to विनोदी लेखन म्हणून छान आहे. by कंजूस
वधुपिते प्रामाणिकपणे आपल्याकडच्या चांगल्या गोष्टी सांगत असतातफक्त चांगल्या'च' सांगत असतात. त्या ऐकून एखादा गळाला लागला की नंतर नाण्याची दुसरी बाजू आपोआप समजते, पण तोवर उशीर झालेला असतो. आठवला म्हणून एक किस्सा सांगतो. मुलगी साध्या घरातली साध्या घरातली म्हणून नात्यात एक लग्न झालं. सहा सात महीने झाले असतील, रात्री सगळेजण जेवायला बसले असताना नव्या सूनबाई दाताखाली काहीतरी आलं म्हणून पानावरुन उठल्या. समोरच्या दातांपैकी एक दात तुटून हातात आला होता. नंतर कळलं की मुलीला तो आर्टिफिशिअल बसवला होता. दुसर्यादिवशी सकाळी सकाळी मुलीला घेऊन मुलगा तिच्या मुंबईच्या डेंटिस्टकडे गेला. न राहवून मुलाची आई म्हणाली की हे का नव्हतं सांगितलं आधी, भांडण वाढू नये म्हणून 'तुला मुलगी असती आणि तिचं असं झालं असतं तर काय केलं असतंस' असं आईला विचारुन वेळ मारुन नेली. अर्थात मुलांच्या बाबतीतही लपवाछपवीचे किस्से घडत असतील. पण वरच्या प्रतिसादात वधूपित्यांचा कळवळा आलेला दिसला म्हणून हा लेखनप्रपंच!!
In reply to वधुपिते प्रामाणिकपणे by सूड
In reply to १ दात नसणे हे नाही सांगितले by टवाळ कार्टा
In reply to १ दात नसणे हे नाही सांगितले by टवाळ कार्टा
In reply to बिघडण्या न बिघडण्यापेक्षा by डॉ सुहास म्हात्रे
जर इतकी 'न बिघडणारी आणि नंतर सहज पकडली जाऊ शकते अशी' गोष्ट लपवली तर मग 'अधिक गंभीर' गोष्टींबद्दल संशय निर्माण होतो.अगदी!!
In reply to १ दात नसणे हे नाही सांगितले by टवाळ कार्टा
In reply to +१ by हाडक्या
In reply to स्पार्क आणि लग्नाचे पाणी by एस
In reply to वर म्हणल्या प्रमाने विनोद by गौरी लेले
In reply to ओके by स्पा
आला आला पांडु आला,सं'क्रांतीला आंबट बोलिला!
In reply to ओके by स्पा
- स्पा कोल्हे=))
In reply to ओके by स्पा
In reply to वा स्पा by सुबोध खरे
In reply to वा स्पा by सुबोध खरे
असे अनुभव मलाही आले होते २२ वर्षापूर्वी."मी बोटीवर होतो तेव्हा ...." हे लिहायचे राहुन गेले की काय सर ? =)
In reply to असे अनुभव मलाही आले होते २२ by प्रसाद गोडबोले
In reply to वा स्पा by सुबोध खरे
सामाजिक प्रश्न हा विनोदी माध्यमाने दाखविला तर तो वैयक्तिकपणे घेऊ नये असे मला वाटतेकाही लोकांना हे समजेल तो सुदिन
In reply to भारी लिहिलय स्पावड्या by प्रसाद गोडबोले
In reply to तुमच्या सासरची मंडळी मिपावर by निनाद मुक्काम …
तुमच्या सासरची मंडळी मिपावर नसावीतहो . हे ही खरच आहे म्हणा . मिपावर सासरची नाहीत अन बायकोही नाही (बायको मागे लागलीये की मला मिपावर अकाउंट काढुन दे म्हणुन ... मी म्हणालोय की तुला माझा डु आय्डी समजुन तुझे अकाउंट अप्प्रोव होणार नाही *biggrin* )
In reply to भारी लिहिलय स्पावड्या by प्रसाद गोडबोले
घरातील काही व्यक्तींनी 'तु काही "घोळ" तर करुन बसला नाहीयेस ना रे ?' असे स्पष्ट विचारले होते मलाअगागा =)) =))
In reply to जबरा! by पिवळा डांबिस
In reply to ठांकू पी डां काका by स्पा
In reply to ह ह पु आ by निनाद मुक्काम …
In reply to निनाद शेट by सुबोध खरे
In reply to ह ह पु आ by निनाद मुक्काम …
५८ वर्षीय सतीश आपटेला २० वर्षीय लिजा मिळू शकते तर मग होतकरू तरुणांनो तुम्ही पण असेच प्रयत्न करुन पहायला काय हरकत आहे? :DIn reply to मदनबाण ह्यांनी मागे कधीतरी by शिद
In reply to ५८ पर्यंत कोण थांबणार by टवाळ कार्टा
In reply to ५८ पर्यंत थांबायला कोण by शिद
In reply to व्हय बेक्कार जळजळ झालेली by स्पा
In reply to व्हय बेक्कार जळजळ झालेली by स्पा
In reply to काय तरी!! by सूड
In reply to च्यायला काहीपण by बॅटमॅन
महाभारत शिष्टीम असल्याशिवाय जळणें थांबायचें नाहीं, कांय समजलेंतच्यायला! भारीच लॉजिक... :))
In reply to च्यायला काहीपण by बॅटमॅन
In reply to च्यायला काहीपण by बॅटमॅन
>>महाभारत शिष्टीम असल्याशिवाय जळणें थांबायचें नाहीं, कांय समजलेंतआता शिंचें आणखीं तींन शोधणें आलें !! ;)
In reply to मदनबाण ह्यांनी मागे कधीतरी by शिद
In reply to मदनबाण ह्यांनी मागे कधीतरी by शिद
In reply to हि बातमी वाचलीत का? by पियू परी
In reply to भारी बे by अभ्या..
डॉक्टर, विंजिनेरांनी अन स्पेशली आयटीवाल्यांनी लै घाण करुन ठिवलाय ह्यो बाजार. पॅकेजशिवाय पोरी बोलतच नैत. Sad बघ एखांदी पैश्यापेक्षा कलेची कदर असणारी अन टाक बार ऊडवून.जिंकलस गड्या, बास...
In reply to डॉक्टर, विंजिनेरांनी अन by स्पा
In reply to @जिंकलस गड्या, बास...>> ++ by अत्रुप्त आत्मा
In reply to विझत चाललेल्या धाग्याला हवा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to भारी बे by अभ्या..
In reply to "डॉक्टर, विंजिनेरांनी अन by सुबोध खरे
नुस्ते नगाला नग असून चालत