मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सांज

आनंदमयी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
saanj सांज बावरी, सांजेला कळते ना काही शांत बाह्यतः, आतुन ही घोंगावत राही सांज बोचरी, काळोखाची पूर्वकल्पना वर केशरिया, अंतरात दडल्यात वेदना सांज विरहिणी अडखळलेली मावळतीशी नेत्र पश्चिमी, मन पूर्वेच्या क्षितिजापाशी सांज हरीच्या बाहूंमधली राधा भोळी मोहनरंगी रंगुन बनते रात्र सावळी... अदिती जोशी

वाचने 2030 वाचनखूण प्रतिक्रिया 7

अतिशय सुंदर रचना. तुमच्या रचना नेहमीच सुखावुन जातात. अवांतरः सांज म्हटल की मला सर्वप्रथम सुधिर मोघ्यांची 'सांज ये गोकुळी' च आठवते, आता हे ही आठवत राहील. दिर्घकाळ मनात रुंजी घालत राहील ही रचना
सांज विरहिणी अडखळलेली मावळतीशी नेत्र पश्चिमी,मन पूर्वेच्या क्षितिजापाशी
व्वाह... क्या बात!! __/\__

चाणक्य गुरुवार, 01/15/2015 - 06:05
वरती मिका म्हणाल्याप्रमाणे तुमच्या रचना नेहमीच सुंदर असतात

गणेशा Sat, 01/24/2015 - 15:26
सांज विरहिणी अडखळलेली मावळतीशी नेत्र पश्चिमी,मन पूर्वेच्या क्षितिजापाशी सांज हरीच्या बाहूंमधली राधा भोळी मोहनरंगी रंगुन बनते रात्र सावळी... --------------------- अतिशय आशय पुर्ण कविता .. कविता वाचुन खुप छान वाटले. वाखुसाआ