' यज्ञ आहे हा जिवाला जाळण्याचा...'
लेखनविषय:
यज्ञ आहे हा जिवाला जाळण्याचा
प्रेम नाही छंद नुसता भाळण्याचा
छान हा दु:खासही आला फुलोरा
ये, वसा घे वेदनेला माळण्याचा
आणशी हे रोज तू कोठुन बहाणे
केवढा हा सोस तुजला टाळण्याचा
मी करू चिंता कशाला काजळाची
सोडला संकल्प मी डागाळण्याचा
श्वास घे माझे तुझ्या श्वासात भरुनी
ये, ऋतू आला फुले गंधाळण्याचा
डॉ.सुनील अहिरराव
वाचने
2200
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
छान!
गझल आवडली
आवडली.
रचना आवडली !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रूठ ना जाना तुम से कहू तो... { 1942 A Love Story }@अत्रुप्त आत्मा ,चुकलामाकला,मितान,मदनबाण,
खूप खूप आभार, मित्रहो!
कविता आवडली.
आवडली. रचना बंदिस्त आहे
मतला सुंदर आहे एकदम
यज्ञ आहे हा जिवाला जाळण्याचा
प्रेम नाही छंद नुसता भाळण्याचा
छान!