मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अर्घ्य

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
झळ उन्हाची येते लेवून गतकाळातील 'आठवकळा' ते दिवस नेटके होते अन रात्री उलगडलेल्या... मी तुला, तू मजला ... हलकेच पुन्हा आठवतो विस्मृतीच्या क्षणांसाठी कण कण साठवतो .... हळुवार पुन्हा मी हसतो त्या हसण्यावर ती रुसते बट केसांची नकळत, त्या गालावर रस्ता चुकते तो थेंब चिंब ओलेता ... हलकेच चुकार ओघळतो मी शुष्क कोरडासा, तो मला भिजवूनी जातो प्राजक्त कधी परसातला खांद्यावर ठेवतो डोके दरवळताना जाई-जूई, हळुच घेती व्याकुळ झोके तो स्पर्श चंदनी स्पंदनांचा हृदयाशी गुजगोष्टी करतो विसरताना मी तूला, आठवांचे 'अर्घ्य' देतो . विशाल

वाचने 3536 वाचनखूण प्रतिक्रिया 11

मुक्त विहारि 07/01/2015 - 14:20
"तो स्पर्श चंदनी स्पंदनांचा हृदयाशी गुजगोष्टी करतो विसरताना मी तूला, आठवांचे 'अर्घ्य' देतो ." एक नंबर

विवेकपटाईत 07/01/2015 - 20:06
तो थेंब चिंब ओलेता ... हलकेच चुकार ओघळतो मी शुष्क कोरडासा, तो मला भिजवूनी जातो मस्त कविता, गतकाळाची आठवण ..

चाणक्य 24/01/2015 - 17:20
हळुवार कविता. आवडली

एस 26/01/2015 - 14:17
मिपावरील ही पहिली कविता आहे जिची वाचनखूण मी साठवली आहे. बर्‍याच उशिराने पाहिली. सुंदर!

In reply to by एस

विशाल कुलकर्णी 27/01/2015 - 10:23
_/\_