मी हरीच्या पायरीवर पीर आहे रेखिला
लेखनविषय:
काव्यरस
गाढवाला सांगतो, गीता... असा मी बावळा
दांभिकांची कैद ज्ञाना, ज्ञानवंता कोहळा
धर्म नामे सर्प डसतो, मानवी वेडेपणा
भूक घेते प्राण येथे, पिंड मागे कावळा
भाव नाही जाणलेला वरलिया रंगा भुले
वर्ण वाटे गोरटा मनरंग काळा सावळा
करपलेल्या भाकरीचे पदर घेतो वाटुनी
घास उदरी पोचला तो, होय मोठा सोहळा
मी हरीच्या पायरीवर पीर आहे रेखिला
भ्रष्ट म्हणती लोक आम्हा, कोण येथे सोवळा?
घाबरावे या जगां इतका नसे कमजोर तू
सांग त्यांना ठासुनी, समजू नका मी कोवळा !
वृत्त : कालगंगा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा
(इतरत्र पूर्वप्रकाशित)
विशाल
वाचने
4048
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
खुप छान गझल
In reply to छान by psajid
+++१११ एकदम स्वाल्लिड ! *HAPPY*
___/\___!!!
इतक्या सुंदर गेय कविता वाचायला मिळताहेत त्याबद्दल धन्यवाद विशाल!!
In reply to ___/\___!!! by स्पंदना
बहुत खूब!
प्रत्येक द्विपदी अत्यंत आशयसंपन्न, आणि एकूणच सुरेख वृत्तबद्ध रचना! वाहवा!!
धन्यवाद :)
खूपच छान!
मनःपूर्वक आभार _/\_
मस्त रे दादुस
In reply to मस्त रे दादुस by प्रीत-मोहर
:)
अप्रतिम _/\_घ्या.
'उद्धवा अजब तुझे सरकार' आठवले
याच्यावर "मी बारच्या टेबलावर (जुना) संत आहे रेखिला" असे विडंबन लिहिण्याचा कॉपिराईट घेऊन ठेवत आहे...तस्मात कोणीही "मी बारच्या टेबलावर (जुना) संत आहे रेखिला" अथवा त्याच्या अनुशंगाने डोक्यात येणारे विचार Wink यावर विडंबन करू/पाडू :D नये अशी विषेश विनंती
तसेच आजकाल विडंबनामुळेसुध्धा काही मिपाकरांच्या "भावना दुखावल्या जात आहेत" त्यामुळे ज्यांना ज्यांना "मी बारच्या टेबलावर (जुना) संत आहे रेखिला" वाचायची असेल त्यांनी मला व्यनी करुन कळवावे...विडंबन तयार होताच व्यनीतूनच पाठवले जाईल
अवांतर - वरील विनंतीस "पी" संप्रदायातील सदस्य अपवाद असतील ;)
छान