मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंग माझे

भीडस्त · · जे न देखे रवी...
वर्जिनल(टवाळ कार्टा) आनिक वर्जिनली वर्जिनल(सार्थबोध) कवी आश्या दोघाचिय्बी स्वारी मागूनसनी एक नमुना सादर क्येलेला हये....... घेता जरा 'धुवायला', घंगाळातले पाणी इथे साबु लावण्या अंगाला काय सांगू जाते माझे ।।१।। अट्टल पारोसे लाजतील,ओतता (शाम्पू) माझ्या डोईवरी अंगावरल्या समस्त रंध्रांत,घासणे जाऊ दे टोक तुझे ।।२।। या ऊरा-पोटावरील दिसती, जरी सार्या वळ्या ती तनु गबदुल असता,पाठीवरती मळ साचे ।।३।। पाठी ग धूऊ जाता तुला,पडतो लोटा भुईवरी पुन्हा करेल यत्न तोवरी,मळ राहिल (तैसाच) काय होते।।४।।

वाचने 3860 वाचनखूण प्रतिक्रिया 15

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस Sat, 12/27/2014 - 13:07
आम्ही त्यातल्या भक्त संप्रदायातले. गुर्जी सांप्रदायिक कविता टाकणार आम्ही त्या भक्तिभावाने वाचणार.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस Sat, 12/27/2014 - 13:30
हो. पडद्यामागेच. जाहीरपणे करण्याइतकी आमची कुवतही नाही. पण मला तुमच्या कविता खूप खूप अवडतात. तुम्ही करा ना एखादी कविता प्लीज.

In reply to by प्रचेतस

नाखु Sat, 12/27/2014 - 14:09
"शिष्य व्हावा ऐसा गुंडा जो बांधी (का घाली)गुरूलाच गंडा !! *db* शीघ्र कवीतांचा झेंडा फडकवी धाग्या धाग्यात ! प्रेमळ विनंती त्याच कवीतेच गद्यात वा पद्यात !!

नि३सोलपुरकर Fri, 12/26/2014 - 18:50
वाह वाह , संप्रदाय* चांगलाच बहरतोय ,आणी राजे "आय डी " बदलाच आता. (*कुठला म्हणुन विचारु नये ... उत्तर दिले जाणार नाही)

अजया Fri, 12/26/2014 - 19:28
हे लौटिक काव्य म्हणता येईल.सांप्रदायिक म्हणायला परसदाराचे विभ्रम दिसत नाहीत. रच्याकने- युटु हात धुविंग इन वाहतं पाणी!!नावाला शोभली नाही हो कविता.

In reply to by अजया

भीडस्त Fri, 12/26/2014 - 19:45
परसदारीय विभ्रमांची गाथा गवसणीतच राहिलेली बरी. आणि हात धुता ठेवणे हे तर आपले प्राक्तनच आहे... म्या तुम्हास काय सांगावे! उर्मी दाबता येत नाही..निके काय नि फोलपट काय!!