खटाटोप
लेखनविषय:
सरत चालली संध्याकाळ,
कामातून निघत नाही वेळ...
कसा काढावा येथून पळ,
घरी वाट बघे छोटा बाळ...
ही सांज भारी खट्याळ,
पुढे सरकत नाही घड्याळ...
पोटासाठी चालली सर्व धावपळ,
झाला चैनीच्या वस्तूंचा सुकाळ...
आप्तजनांशी नाही मेळ,
कसा हा सर्व खेळ...
गणित चुकले जीवनाचे..
नाही कसला ताळमेळ,
अंधारातून चालतो आहे..
कधी होईल सकाळ..!!
वाचने
2963
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
लीलाधराची आठवण झाली.
In reply to लीलाधराची आठवण झाली. by प्रचेतस
+++१११ =))
In reply to लीलाधराची आठवण झाली. by प्रचेतस
धन्यवाद.
In reply to लीलाधराची आठवण झाली. by प्रचेतस
धन्यवाद.
मस्त लिहलय !!!
In reply to छान by शेखर बी.
प्रतिसाद आणि सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद.
मला कायम रगडा
त्याला मात्र भेळ
त्याला तेवढा आंबा
मला मात्र केळ?? :(
-षेश.
In reply to मला कायम रगडा by यसवायजी
झक्कास..
मस्त आवडली. कार्यालयातून परतताना, ट्रफिक मध्ये बस अडकलेली, घरी उशीर होणार, त्या वेळी स्त्रियांची आपल्या छोट्या पिल्लांना भेटण्याची तळमळ त्यांच्या डोळ्यांत दिसते.
In reply to मस्त आवडली. कार्यालयातून by विवेकपटाईत
Thank you.. Vivek
सत्य परिस्थिती वर्णन केली आहे.
"हिरकणी" च आठवली मला.
In reply to छान कविता. by आयुर्हित
आयुर्हित... मनापासून धन्यवाद.
छान ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The United States of Debtळ ला ळ मस्त लावलाय =))
खटाटोप
खटाटोप
लीलाधराची आठवण झाली.