अचानक जमून आलेला पाताळेश्वर कट्टा
एक कालसर्प आहे खोल आपल्या पोटात दडून' आणि तो बाहेर कसा काढायचा, आणि काढल्यावर घडून येणारे सुपरिणाम, यावर मी स्वानुभाव-कथन केल्यावर मंडळींपैकी काहींनी ते करून बघण्याचा निश्चय केला
In reply to लगे रहो... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to +१! एकदम फिल्मी स्टाईलने अॅक्शन फोटो काढले आहेत! by बहुगुणी
In reply to पाताळेश्वर लेखाचा दुवा. by प्रचेतस
In reply to पोटातला कालसर्प by चित्रगुप्त
In reply to बरोबर १० वाजता पाताळेश्वर by प्रचेतस
वल्ली दा,( इण्दियाना जोन्स) यसवायजी ( आईनस्टाईन), चित्रगुप्त साहेब,( रेम्ब्रां) चित्रगुप्त यांचे बालमैतर , इस्पिक एक्का ( युवान च्वांग) . वचने किं दरिद्रता या स्टाईलवर एकाच फोटोत.
मग जरा बेत बदलून वल्ली यांचेबरोबर चर्चा करून पुल देशपांडे उद्यान किंवा इतर कोणते तरी जवळचे ,सोयीचे स्थळ
यातून वल्ली यांचे दगडप्रेम दाटून आले व पाताळेश्वर नक्की झाले. हे शंकराचे मंदिर बर्यापकी मोठे आहे. आजूबाजूला वस्ती.एकाबाजूला जंगली महाराज यांचे देऊळ. पाताळेश्वर हे पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असल्याने झाडी, हिरवळ
हे सारे तिथे होतेच. मंदिरासमोरचा चौकोनी परिसर एका पाषाणातून खोदलेला आहे. पत्तडकल, तंजाउर ई ठिकाणी भव्य नंदीमंडप आहेत पण ते प्लानमधे चौरस वा आयताकार आहेत. येथील मंडप मात्र वर्तुळाकार आहे.
चित्रगुप्त जी वजन कमी करण्याची थेअरी बहुदा शेलार मामा व सतीश गावडे शेट याना समजावताना
मी पावणेदहाच्या सुमारास माझ्या दुचाकीवरून पोहोचलो. तेवढ्यात कट्ट्याची खात्री करून घेणारा इस्पिक एक्का यांचा भ्रमणध्वनी आला. 'मी पोहोचले आहे. तुम्ही या' असे सांगून मी पाताळेश्वराच्या आवारात शिरलो. एका कोपर्यात दोन व्यक्ती पायरीवर गप्पा मारीत बसलेले दिसल्या. मला पाहताच त्यातील गोरटेले गृहस्थ स्टाईल मधे आपल्या चित्पावनी घार्या डोळ्यासह , चित्रकार स्पेशल कोरलेल्या दाढीसह पुढे झाले. ओळख आधीच पटलेली होती. हस्तांदोलन झाल्यावर हिरवळीवर मांडी घालून गप्पा करूयात असे ठरले.
सुड्राव , वल्ली दा व यसवायची यांचा हास्यविनोद
चित्रगुप्त यानी आपल्या बालमित्राची माझ्याशी ओळख करून दिली. मग प्रथमच मी फॉनेटेनब्लो हे पॅरिसजवळचे शाही ठिकाण पाहयला मिळाल्याबाद्द्ल चित्रगुप्त यांचा उघड उघड हेवा व्यक्त केला. तेवढ्यात वल्ली साहेब व इस्पिक एक्का साहेब येऊन मिळाले. मग जरा ग्रूप फटू झाले. परत खाली बसून गप्पा सुरू झाल्या एकेक करून शेलार मामा, सुड्राव, सतिश गावडे शेट, यसवाय जी, ( यानी सुयोग वे यसवायजे कसे झाले हे विस्कटून सांगितले.) लांबूनच गोरा फ्रेंच माणूस येताना दिसला. त्याचे मायबोलीतील नाव प्रशांत . मग फ्रेंच मधील उच्चार व त्यांचे लिखाण हे कसे अजब आहेत वगैरे खल झाला. एवढ्यात ( चुकून ) वल्ली यानी आपण एकेकाळी फार वजन कमी केले होते असा "गौप्यस्फोट" केला. झाले. चित्रगुप्त यांनी माझा फॉर्म्यला नंतर सांगतो पण तुम्ही त्यावेळी कसे काय बुवा वजन कमी केले अशी वल्ली यांच्याकडे पृच्छा केली.मग खाण्यावर कंट्रोल व भरपूर व्यायाम असे खरे उत्तर वल्ली यानी दिले. त्यावर आत पुन्हा का वजन वाढले म्हटल्यावर चौरा यानीच खादाड मित्र व विकांत हे त्याचे उत्तर आहे असे मधेच सांगितले.
वल्ली, गावडे सेठ, शेलार मामा, चित्रगुप्त ,इए पुण्याचिए नगरी वाले, व बदलापूरकर सुड राव सगळे " थिअरी" प्रॅक्टीस मधे आणताना' हसमुख राय की हसमुख चाय' मूड मधे .
पाताळेश्वर म्हणजे व्यापारी ( श्रमण) लोकांचे क्वार्टर्स प्लस देवस्थान अशी काहीशी माहिती वल्ली यानी दिली. शिलालेखावर आपलीच मर्दुमकी हा विषय कसा राहील याची काळजी राजे लोक कशी घेत असत याची ही उदाहरणे वल्ली यानी दिली. मग प्रशांत मेरू नावाच्या गावी फ्रान्समधे जाणार आहेत अशी बातमी आली. मग मेरू पर्वत, अग्नेय आशिया, तेथील दरवाजांच्या प्रोफाईल्स वगैरे विषय पकडून चर्चेत रंग भरला इस्पिक एक्का यानी. आता पाळी होती चित्रगुप्त यांच्या थेअरीची. आपले वजन कसे कमी केले. त्यात विविध फलारसांचे , पाल्याच्या रसाचे सेवन करून वजन कमी करता येतेच पण पोटात साठलेला मळ काही काळाने काळ्या सर्पासारखा बाहेर पडून मनातील नैराश्य देखील दूर होते असा अनुभवाअंती दावा त्यानी केला. माणसाने कलाकृतीची बुद्द्धीने परिभाषा न मांडता तिच्या तील कलात्मकतेचा आस्वाद घ्यावा मग मोनालिसा हिचे चित्र मूळ चित्र आहे की नाही याची चिकित्सा मागे पडते. असे चित्रगुप्त यानी वल्ली यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
सव्वा अकराचे सुमारास पाताळेश्वराला मिपाकरांचे दर्शन व्हावे असा ठराव करून हिरवळीवरचा ठहराव आटपण्यात आला. सगळे खोदलेल्या चौकोनी अवकाशात घुसले.मधोमध गोलाकार नंदी मंडप, बाजूला चारी बाजूस कातळ खाली कातळ व हवेत काहीशी ठंडक .अशा वातावरणात ग्रूपने गप्पा. काहीनी मंदिरात प्रवेश करून देवाचे रीतसर दर्शन ही घेतले. मग शेवटच्या गाप्पांचा फड रंगला. काही सिनेमे, रंगेल पॅरिस अशी वात्रट पण प्रबोधक चर्चा ही रंगली. चित्रकार चित्रगुप्त याना
अचानक कंपोझिशन करण्याची कल्पना सुचली. काळ्या बेसाल्टच्या पार्श्वभूवर मानवी आकारांची रचना करण्याचा एक जलद प्रयत्न करण्यात आला. इस्पिक एक्का यानी सर्वानी शीर्षासन करून आता कंपोझिशन करा असा " वैद्यकीय" सल्ला देणारी मल्लीनाथी केली. एकूण फार मजा आली यावर सर्वांचे एकमत झाले. चित्रगुप्त यांच्या थिअरीस अनुसरून जवळच ज्यूस पिंंण्याचे ठरले. संत्रा मोसंबी यांच्या रसाची एक राउंड व फोडीसकट कलिंगड रसाची एक राउंड होऊन कट्टा समाप्तीची
घोषणा झाली. या रस प्राशन कार्यक्रमाचे प्रायोजक म्हणून चित्रगुप्त व इस्पिक एक्का यानी काम पाहिले या बद्द्ल मिपाकर कट्टा मंडळ त्याचे आभारी राहील.
In reply to हे घ्या .. by चौकटराजा
In reply to ह्या: by पैसा
In reply to ह्या: by पैसा
In reply to व्रुत्तांत आणि फोटो मेन by खटपट्या

In reply to चित्रप्तगुप्त काका. by विजुभाऊ
In reply to एक काका डॉलबी सराउंड साउंडात by यसवायजी
In reply to एक काका डॉलबी सराउंड साउंडात by यसवायजी
In reply to मी ऐकलंच नाही!! by सूड
In reply to किती तो साल"सूड"पणाचा आव by सतिश गावडे
In reply to हा हा !! ठीकाय, सगळं तपशीलवार by सूड
In reply to हा हा !! ठीकाय, सगळं तपशीलवार by सूड
In reply to हां ते बाकी खरं हां.. by यसवायजी
In reply to @काका एका 'भल्या' संपादकाच्या by अत्रुप्त आत्मा
In reply to भल्या की भल्या मोठ्या? by सतिश गावडे
In reply to @इस्पिक एक्का ( युवान च्वांग) by अत्रुप्त आत्मा
वल्ली दा,( इण्दियाना जोन्स) यसवायजी ( आईनस्टाईन), चित्रगुप्त साहेब,( रेम्ब्रां) चित्रगुप्त यांचे बालमैतर , इस्पिक एक्का ( युवान च्वांग) .
हाईंन्न? स्टाईंन्न? आणी सयवायजी??
माझ्यात आणी जो कोण तो 'आईनस्टाईन' आहे त्याच्यात एकच साम्य.
मी त्याला ओळखत नाही आणी तो मला. :))In reply to वल्ली दा,( इण्दियाना जोन्स) by यसवायजी
In reply to वल्ली दा,( इण्दियाना जोन्स) by यसवायजी

In reply to वल्ली दा,( इण्दियाना जोन्स) by यसवायजी
In reply to 'कायतरी' by चित्रगुप्त
एक काका एका वर्दळ असलेल्या प्राचिन शिवमंदीरासमोर बोलून बोलून असं काय बोलणार.आणि कुणासमोर... हे पण बघा की. तरीपण बोलले काय, हे कोडेच आहे अजून.
In reply to एका मिपाकराने by चित्रगुप्त
In reply to एका मिपाकराने by चित्रगुप्त
In reply to आम्हालाही कृती सांगा. by प्यारे१
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The United States of Debt
फोटोत तर सगळे दिसतायंत मग फोटो कुणी काढला?