मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नजर

सुर्या गार्डी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
नजरेला नजर बांधून डोळ्यांनीच नुसतं पाहणं तुझं, न बोलूनही सांगतं सारं काही।। जाता जाता मिश्किल हसून ओठांवर नजर खिळवणं तुझं, प्रीतीचं रोमांच फुलवतात किती।। चालता चालता थबकून मागे वळून पाहणं तुझं, चोरून चोरून पाहण अन् गालातल्या गालात हसणं तुझं ह्रद्याच्या तारा छेडतात किती।। दूरवर जावूनही नजरेनं शोधत राहणं तुझं अन् रोज रात्री स्वप्नात येवून प्रेम गीतं शिकवणं तुझं गीताला सुरांची देतात प्रीती।। तरीही तरीही सांगून टाक् ह्रद्यातलं सारं कारण तू ही अधांतरी राहून मलाही अधांतरी ठेवणार किती?

वाचने 1435 वाचनखूण प्रतिक्रिया 2