मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अभिनंदन

चुकलामाकला · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
"कोण तू ? " या तुझ्या टोकदार प्रश्नानं तुझ्या माझ्या क्षणाचं मी मोठ्या कष्टाने बान्धलेलं गाठोडं टचकन फाटून गेलं, आणि मला कफल्लक बनवण्यात तू पुन्हा एकदा यशस्वी झालीस .. अभिनंदन!!!

वाचने 6212 वाचनखूण प्रतिक्रिया 33

स्पंदना 01/12/2014 - 10:47
सुरेख कविता आहे. उगा खफ म्हणुन टर उडवु नये. दुसरेही लिहु शकतात याची जाण ठेवावी. टका विडंबन वेगळ टाका.
अपर्णाशी सहमत.चांगली कविता आहे आणि प्रथमच स्वरचित काव्य दिलेलं दिसतंय मिपावर.लगेच टवाळक्या सुरु करण्याची गरज नाही.

कविता१९७८ 01/12/2014 - 17:23
खुपच छान आणि अर्थपुर्ण कविता.

प्रसाद गोडबोले 01/12/2014 - 17:53
खरंच असं काही झालंय का ? तसं असेल तर तुमच्या भावना मी समजु शकतो ;) खरे नसेल तरीही कविता उत्तम !! बाकी आम्हाला कोणीही विचारले "कोण तु " तर आमचे ठरलेले उत्तर असते the name's bond ... james bond james bond :D

In reply to by प्रसाद गोडबोले

चुकलामाकला 01/12/2014 - 20:05
काय हे भाऊ, माझी साधीशी कविता तुमचा अर्थाचा गोंधळ;)

In reply to by तिमा

आता बोलुन टाकतो हर एक बात पे कहते हो के तु क्या है ? तुम्ही बताओ के ये अंदाज-ए-गुफ्तगु क्या है

In reply to by मारवा

तिमा 02/12/2014 - 10:33
मी लिहिलेल्या शेरातली पहिली ओळ दुरुस्त करतो. जिक्र मेरा सुना तो चिढके कहा किस दिवानेकी बात करते हो|

स्वप्नज 01/12/2014 - 20:36
'अभिनंदन'... चांगलं हाणलंय... यिव द्याल आजून... मस्त लिहलीय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 01/12/2014 - 21:11
लिहित राहा.