पाण्यासारखी...
लेखनविषय:
एकदा मी तुला म्हटलं,
तू आहेस पाण्यासारखी...
जो रंग टाकावा,
तो सामावून घेणारी,
रंगाच्याही नकळत
रंगासारखी रंगणारी...
आज पुन्हा आठवतंय,
आज पुन्हा ते पटतंय
पण संदर्भ किती वेगळा...
पाणीसुद्धा काही वेळा
किती कोरडं असतं
मिसळू पाहणारं बरंच काही
त्याच्यासाठी उपरं असतं...
खरंच तू पाण्यासारखी आहेस
खरंच, आज पुन्हा पटलं
नकळत किती खरं सांगितलं मी
नवल? दु:ख मनात दाटलं...
वाचने
1324
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
कविता आवडली.. 'ती' कोण आहे हे
आवडली.
छान!