आज येऊर (ठाणे)येथे गेलो होतो.
ठाणे स्टेशन पश्चिम येथून१६ नंबर बस येऊरसाठी सुटते. सकाळी साडेपाच पासून दर अर्ध्या तासाने बस आहे. पंधरा रुपये तिकीट आहे अर्धा तास लागतो. शिवाईनगर स्टॉप नंतर 'भकेँद्र' स्टॉप आहे. तिथे केँद्र सरकारच्या वनखात्याचे कार्यालय आहे मागच्या अंगणात रुईची पंचवीसेक रोपटी लावली आहेत.याला फुलपाखरू उद्यान संबोधले आहे.येथे वनखात्याने नुकत्याच सुरु केलेल्या फुलपाखरे उद्यानात काही नाही .
इथून 'संजय गांधी उद्यान बोरिवली' या राष्ट्रीय उद्यानाची पूर्व हद्द सुरू होते. बसने शेवटच्या स्टॉपला उतरून संजय गांधी उद्यानात दोन तास भटकलो. दुपारच्या वेळेमुळे बिबळ्या झोपला होता.:) पण फुलपाखरे खूप असली तरी चपळ झाली होती:( फोटो नाही मिळाले. झाडांच्या फोटोवर मोबाईल कैमऱ्याची समजूत काढली.
१६नं बस रूट:ठाणे प॰, जांभळी नाका,शक्ती मिल, -आंबेडकर रोड-LBS-नाका,ठाणे एसटी आगार, लाइफलाइन हॉस्पीटल,खोपट,(हाइवेखालून) कैडबरी,जेकेग्राम,वर्तकनगर नाका,शास्त्री नगर,शिवाइनगर,खंडेलवाल इस्टेट,भकेंद्र (संजय गांधी उद्यान कमान),-घाट-एर फॉर्स,येऊर गाव,स्वानंद बाबा आश्रम, रोणाचा पाडा,पाटणपाडा,येऊर.
१)संजय गांधी उद्यान बोरिवली'मध्ये येऊरकडून अधिकृत प्रवेश नाही. ती पाटी.
२)आणि हे बिबट्याबद्दल सावध राहण्यासाठी
३)ही मुख्य वाट
४)एका ओढ्यात पाणी वाहत होते
५)काही झाडांनी पाने गाळली होती
६)चार सह्या केल्याशिवाय हे साहेब दिवस सुरू करत नाहीत
७)पाहुण्याचा आहारासाठी स्वागताला पांढरीरेशमी चादर पसरून दारात वाट पाहणारा कोळी
८)मंद उडणारे फुलपाखरु(SAILOR)
९)शेवाळ ?('लाइकन')
१०)वारूळ
११)अजून एक आतिथ्यशील
आणखी काही झाडे
१२)
१३)
१४)
१५)
१६)
१७)
१८)
विशेष सूचना:
१९ मे २०१६ । आज येऊरकडून संजय गांधी उद्यानात जाण्यासाठी गेलो होतो परंतू आता प्रवेशच बंद केला आहे.मोठी आठ फुटी भिंत घातली आहे.
वाचने
14318
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
चला... पुढचा फिरता कट्टा इथे करू या....
कट्टा यशस्वी होईल. येऊर गावात
फिरत्या कट्ट्याला हॉटेल कशाला?
In reply to कट्टा यशस्वी होईल. येऊर गावात by कंजूस
लहानपण आठवलं !! महीन्यातुन एक
उपवन तलावाची काही चित्रे जालावरून साभार
(No subject)
मस्त.
मस्त
उपयुक्त माहिती
बहुधा हेच शेवाळं पावसाळ्यात
In reply to उपयुक्त माहिती by बहुगुणी
काही दुवे
In reply to बहुधा हेच शेवाळं पावसाळ्यात by प्रचेतस
लय भारी...कुठे बघायला मिळेल
In reply to काही दुवे by बहुगुणी
lichen
In reply to उपयुक्त माहिती by बहुगुणी
भिमाशंकरला पावसाळ्यात वाळक्या
In reply to lichen by भुमन्यु
भिमाशंकरला
In reply to भिमाशंकरला पावसाळ्यात वाळक्या by कंजूस
वा मस्त भटकंती
दिपक ,खरं सांगायचं म्हणजे
छोटेखानी भटंकती . आवडली.
साद्यंत!
मग काय...काही "अतीपरिचित"
In reply to साद्यंत! by निखळानंद
झकास वृतांत कंजूस काका
प्रवासभाडे आणि भटकंतीसाठी
सचित्र वृत्तांत आवडला.