मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बलबन का मकबरा

स्वामी संकेतानंद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
क़ुतुब मीनारपासून थोड्याच अंतरावर महरौली Archeological Park आहे. तिथे आडवाटेला , काटेरी झुडपांत अनेक भग्नावशेष विखुरलेले दिसतात. आपण त्यातून मार्ग काढत पुढे जावे.एका मकबर्‍याचे भग्नावशेष दिसतील. खचलेल्या भिंती दिसतील. भिंती कसल्या! दगडमातीचा निव्वळ रचलेला थर ! त्यावर दिलेला मुलामा पार उडालाय. कधीकाळी भिंतींना मुलामा दिलेला होता, त्यावर नक्षीकाम होते ह्याची साक्ष देणारा एक छोटासा तुकडा तेवढा एका भिंतीवर दिसेल. छत कधीचेच उडालेय. या चार भिंतींच्या आत, आकाशाच्या छताखाली , लाल वालुकाश्मात बांधलेली एक कबर दिसेल. कबरीचे काही दगड गायब झाले आहेत, काही मोडकळीस आलेले आहेत. कधीतरी कबरीवर चढवलेली चादर ऊन-वारा-पाउस झेलत विरजलेली, एका फटीत अडकल्याने, नावापुरती का होईना, बकबरीवर दिसेल. ही कबर घियासुद्दीन 'बलबन'ची. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेला ग़ुलाम घराण्याचा एक प्रबळ सुलतान.उत्तर हिंदुस्थानावर बलबनने वीस वर्षे सत्ता गाजवली. बलबन अतिशय कठोर, न्यायप्रिय('न्यायकर्कश' म्हटलं तरी चालेल.) सुलतान होता. सुलतानाला साष्टांग दंडवत घालायची फ़ारसी 'ज़मीनबोस' पद्धत त्यानेच आणली. स्वतःला 'ज़िल-ए-इलाही'म्हणवून घ्यायचा. सरंजामांची 'चहलगनी' मोडून राज्याची सगळी सूत्रे स्वतःच्या नियंत्रणात राहतील अशी व्यवस्था केली. त्याचा शब्द अंतिम असायचा. प्रत्येकाने त्याच्याशीच निष्ठावान रहावे, फंदफ़ितुरीला थारा मिळू नये म्हणून त्याने अतिशय कार्यक्षम गुप्तचर यंत्रणा उभी केली होती. दिल्लीत येऊन लूटमार करणार्‍या मेवाती टोळ्यांचा त्याने बंदोबस्त केला. अशी जरब बसवली म्हणे की, त्याच्या काळात परत ह्या मेवाती लोकांनी दिल्लीकडे वाकड्या नजरेने पाहिले नाही. बलबनच्या मृत्यूनंतर त्याचा नातू 'क़ैक़ूबाद' सत्तेवर आला खरा, पण त्याच्यापाशी बलबनचा करिश्मा नव्हता. तो बलबनच्या उलट म्हणजे मवाळ, दुर्बळ आणि अकार्यक्षम होता. तो ना काही कमावू शकला ना बलबनने कमावलेले टिकवू शकला. जेमतेम तीन वर्षे त्याने कसाबसा कारभार साम्भाळला. शेवटी त्याला तख्तावरून हटवून फ़िरोज़ खिलजीने दिल्लीचा कारभार हाती घेतला. दिल्लीवरची गुलाम घराण्याची सत्ता संपली. बलबनचा मकबरा भारतात नवी वास्तुशैली घेऊन आला होता. भारतातले पहिले खरे 'कमान आणि घुमट'(arch and dome) शैलीचे बांधकाम म्हणजे बलबनचा मकबरा. ह्याचे श्रेय अर्थातच बलबनला द्यावे लागेल.( मुसलमान शासक जिवंतपणीच स्वतःचा मकबरा बनवून ठेवत. बलबनदेखील अपवाद नव्हता.) आज घुमटाचा लवलेशही नाही. कुठेकुठे कमानी उरल्या आहेत. परिसरात असलेले अनेक अवशेष बघता ही जागा कधीकाळी गजबजलेली होती,लोकांचा इथे राबता होता हे सहज लक्षात येते. आता मात्र मकब-याला भेट द्यायला कोणी येत नसावं. एखादा इतिहासवेडा वाट वाकडी करून इथे येतो, मकब-याचे अवशेष बघतो, उध्वस्त कबर बघतो आणि हळहळतो. दिल्लीवर २० वर्षे राज्य करणारा हा सम्राट खुद्द दिल्लीकरांनाच आठवत नसणार. बलबन गेला, कोणे एके काळी लोकांची येजा असलेला त्याचा मकबराही विस्मृतीत गेला. उरलेले अवशेषही जाणार. उरणार फक्त इतस्ततः विखुरलेल्या दगडांमध्ये वाढलेले दाट काटेरी रान... balban1 balban2 Balban4 Balban3 Balban5 Balban6 --- स्वामी संकेतानंद तळटीप :- इतिहासाच्या काही चुका असतील तर पदरात न घेता दुरुस्त करुन देणे.

वाचने 24473 वाचनखूण प्रतिक्रिया 45

प्रचेतस Fri, 11/21/2014 - 08:53
मस्तच स्वामीजी. बलबन बद्दल फारसे माहित नव्हते. मात्र हा कुतुबमिनार उभारणार्‍या कुतुबुद्दीन ऐबक याच्याच वंशंजांपैकी ना? गुलाम घराण्यालाच मामलूक घराणं म्हणत असे कुठेशीक वाचले होते.

In reply to by प्रचेतस

तसं म्हणता येणार नाही. कोण्या एका राजाचा एक गुलाम फार प्रबळ होतो नि राजा बनतो. मग त्याच्यापुढे त्याच्या दोनेक पिढ्या राजा बनतात. नंतर त्यांचा एक गुलाम प्रबळ बनतो. तो राजा बनतो. म्हणून ह्यांना गुलाम घराणे म्हणायचे. रक्ताचे संबंध सगळ्या राजांमध्ये नव्हते. साधारण दोन-तीन रक्ताच्या राजानंतर नवा कोणीतरी राजा बनायचा. म्हणजे ऐबक, अल्तमस आणि बलबन गुलाम घराण्याचे असले तरी तिघांमध्ये रक्ताचे संबंध नव्हते.

In reply to by स्वामी संकेतानंद

अरबस्तानात जीत लोकांना आणि इतर काही कारणाने परावलंबी लोकांना गुलाम बनवण्याची प्रथा इस्लामपूर्व काळापासून होती आणि ती इस्लामने अंगिकारली. ही प्रथा अगदी काही दशकांपूर्वीपर्यंत चालू होती... विशेषतः मुस्लीम नसलेल्या जीत लोकांच्या बाबतीत तरी. त्यामुळे राजेलोक व इतर अधिकारी/धनीक लोकांच्या पदरी अनेक गुलाम असत. गुलामांनी इस्लामचा स्विकार केल्यास किंवा मालकाची मेहेरनजर होईल असे काही खास काम केल्यास मालक खूष होऊन त्यांना त्याचे स्वातंत्र्य परत करत असत. राजांच्या पदरी असणारे अनेक हुशार गुलाम राजकारण / शासन / अर्थकारण याबाबतीत तज्ञ असत आणि (गुलाम असताना अथवा स्वतंत्र झाल्यावर) राजाच्या खास मर्जीतले सल्लागारही असत. यांच्यातील काही महत्वाकांक्षी गुलाम राजाला पदच्युत करून किंवा राजाच्या मृत्युनंतर राजपुत्र कमजोर असण्याच्या परिस्थितीत राज्य बळकावून स्वतः राजे झाले आहेत. त्यांच्या घराण्यांना गुलाम घराणे असे नाव पडले. त्यामुळे वेगवेगळ्या गुलाम राजांचा एकमेकाशी रक्तसंबंध असेलच असे नाही.

चौकटराजा Fri, 11/21/2014 - 09:12
आमच्या इतिहासाच्या पुस्तकात " बलबन" चा उल्ल्लेख होता. परीक्षेला " बलबनच्या सुधारणा" यावर एक टीप हमखास येत असे. आपल्या लेखाने बालपणात नेले. बेथलेहेम, नेबुचड नेझर , महमूद गावान ई नावे ही त्यायोगाने आठवली. धन्यवाद !

बॅटमॅन Fri, 11/21/2014 - 13:59
धन्यवाद. बलबनप्रमाणेच खिलजीची कबरही एकदम एका कोपर्‍यात आहे याच कुतुब कॉम्प्लेक्समध्ये. इतके महापराक्रमी पुरुष, आता मात्र अगदीच दुर्लक्षित पडलेत.

In reply to by बॅटमॅन

मदनबाण Fri, 11/21/2014 - 14:31
नविन माहिती समजली... इतके महापराक्रमी पुरुष, आता मात्र अगदीच दुर्लक्षित पडलेत. हेच आपल्या पराक्रमी भ्रष्टाचारी राजकारण्यांना देखील समजले पाहिजे ! कितीही पैसे खाल्ले तरी ते वरती घेउन जाता येणार नाही. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Nagin (Full Song) ;) { Bajatey Raho }

In reply to by बॅटमॅन

खिलजीची कबर किमान कॉम्प्लेक्समध्ये आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे लक्ष जात नसले तरी पुरातत्व विभाग तिकडे लक्ष ठेवतो, स्वच्छता वगैरे राखतो. बलबनची कबर कुतुब कॉम्प्लेक्सच्या बाहेर महरौली पुरातत्व उद्यानात आहे. तिकडे सरकारी बाबूंचेही लक्ष नाही. निव्वळ काटेरी रान माजले आहे. खिलजीची कबर चांगलीच लांबरुंद आणि रफ-टफ आहे आहे. हा आम्ही काढलेला फोटो> khilaji's qabr

In reply to by स्वामी संकेतानंद

बॅटमॅन Fri, 11/21/2014 - 19:33
येस! ते बाकी आहे म्हणा. बलबनची कबर या निमित्ताने पहायला तरी मिळाली. खिलजीची किमान बघता तरी येते. पण दिल्लीतली सर्वांत भारी कबर म्हणजे अकबराचा बाप हुमायूनची. डागडुजी इतक्या वेळेस करण्यात आलीय की आता अगदी पूर्ववत सगळं काही आहे- त्या जुन्या कारंज्यांसकट. बाकी तो मेहरौली काँप्लेक्स लै भारी आहे. तिथेच कुतुबमिनार, तिथेच विष्णुस्तंभ, तिथेच तो अपूर्ण अलई मिनार आणि त्या कुव्वतुल इस्लाम मशिदीकरिता पाडलेल्या देवळांचे अवशिष्ट खांब. त्या विष्णुस्तंभावर मध्यभागी एक नागरी लिपीतला शिलालेख आहे- विक्रमादित्य राजाचा. परंतु तो सोडून त्याच्या बेसजवळ जरा बारकाईने पहावे, देवनागरीतही दोनचार ओळींत कायतर लिहिले आहे. घाईघाईने लिहिल्यागत वाटते. जुना लेख आहे की नवीन आहे काय माहिती/

In reply to by बॅटमॅन

पायाकडे लक्ष गेले नव्हते. आता परत जाणे झाले तर नक्की लक्ष देणार. महरौली काँम्प्लेक्स खरंच लै भारी. मी दोनदा जाऊन आलोय. काही ना काही नवं सापडतं. परत भेट देणार आहे पुढच्या वर्षी. हूमायूँची कबर आता अगदीच पूर्वीच्या वैभवाला आणत आहेत. प्रवेशद्वारावरची कलाकुसर, रंगरंगोटी वगैरे सगळे करत आहेत. मी मागे डिसेम्बरला गेलो होतो तेव्हा दणक्यात काम सुरु होते. कामाचा आढावा घ्यायला परत जाणार आहेच. हा बू हलीमा गेटचा फोटो. अगदी नव्याने उभारले आहे असे वाटते. अगदी त्या काळात वापरलेलीच सामग्री वापरून रिस्टोरेशन करत होते. boo Halima Gate

In reply to by स्वामी संकेतानंद

बॅटमॅन Fri, 11/21/2014 - 19:58
बू हलीमा गेट, अरब सराई आणि ते चारबाग उद्यान सगळे एकदम मुळाबरहुकूम करत आहेत ते. महिन्याभरापूर्वीच तिकडे जाणे झाले होते. भारी मेंटेन केलेय. बाकी लाल किल्ला इ. देखील भारी आहे, परंतु याचा क्लास वेगळाच आहे. हुमायूनप्रमाणेच अकबराचे थडगेही अप्रतिम आहे. आग्र्यातील सिकंदरा भागात हे आहे, इन जण्रल तितके रडारवर दिसत नाहीये. पण लै भारी आहे.

In reply to by विजुभाऊ

दिल्लीत कुठल्या बोळात कोणा इतिहासप्रसिद्ध माणसाची कबर सापडेल सांगता येत नाही. 'मुर्दों का शहर दिल्ली' म्हणावं.. :)

पैसा Fri, 11/21/2014 - 14:47
खूप छान लिहिलंय स्वामी. या इमारतीचं बांधकाम सफाईदार घडीव दगडांचं किंवा मजबूत नाही असं फोटोवरून वाटतंय. त्यामुळे काळाच्या ओघात टिकलं नसावं. काळ सर्वात सामर्थ्यवान आहे हे अशी चित्रे पाहताना पुन्हा पुन्हा पटतं.

In reply to by पैसा

घडीव दगड खरंतर 'पेन्ट'चं काम करत असत त्या काळी. बाहेरून फक्त घडीव, नक्षी असलेली दगडे. मुख्य ढाचा चा असाच 'विटा-गोटे आणि माती' वापरून करत. आणि हा मजबूत असतो. काळाचे हल्ले झेलल्याने आता घडीव, नक्षीची दगडे गळून पडली आहेत( इन्टरलॉकिंग नसे ना) आणि इकडेतिकडे बांधकामात लोकांनी वापरली असेल. :D नीट पाहिले तर फोटो क्रं २ मध्ये तुम्हाला काही घडीव दगड दिसतील.

In reply to by स्वामी संकेतानंद

पैसा Fri, 11/21/2014 - 21:48
पण आपले महाराष्ट्रातले, आणि एकूणच दक्षिणेतले किल्ले किंवा प्राचीन देवळे बघ. सगळे काळ्या पाषाणाचे बांधकाम. भिंतीच्या मधे कुठे फटसुद्धा सापडणार नाही. त्या बांधकामात आणि या बांधकामात पटकन फरक दिसतो. असाच जमेल तेव्हा पुराना किला बघून ये. आम्हाला ती पांडवांची राजधानी म्हणून कोणीतरी सांगितले होते.

In reply to by पैसा

दिल्लीच्या तत्कालिन सुलतानांना ती कला अवगत नसावी बहुतेक. किंवा देवळे तोडून त्याचाच वापर बांधकामात केल्याने कदाचित त्यांनी क्ले अँड रबल तंत्र वापरले असावे. आपल्याकडे तर चुन्याचा गिलावा, इन्टरलॉक्ड पाषाण असायचे छान. पुढे मुगल काळातही मग व्यवस्थित तंत्रबद्ध काम झाले. पुराना किल्ला बघून आलोय. आतमध्ये पुरातन अवशेष सापडले आहेत. उत्खनन सुरुच आहे. मी उत्खनन पाहून आलोय. खूप जुने अवशेष सापडले आहेत. अगदी २ हजार वर्षांपेक्षा जास्त जुने. आणि मुख्य म्हणजे उत्खननावरुन लक्षात येते की इथे नेहमीच वस्ती राहिली आहे. प्रत्येक कालखंडाचे अवशेष सापडले आहेत. पुराना किल्ल्याच्या आत 'इंद्रप्रस्थ' नावाचे खेडेही होते. म्हणून हीच पांडवांची राजधानी असे म्हणण्यात येते. ते खेडे हटवण्यात आले नि किल्ल्याबाहेर वसवले. मग उत्खनन सुरु केले तर बरंच जुनंपुरानं काही सापडू लागलं.

बहुगुणी Fri, 11/21/2014 - 18:54
उत्सुकतेने विकीपिडियावर माहिती वाचली या घियासुद्दीन बलबनच्या रंजक इतिहासाची आणखी ओळख झाली. पाणक्याच्या नोकरीपासून सुरूवात करून रजिया सुलतानचा अमीर-ए-शिकार (lord of the hunt) आणि पुढे स्वतः ६०व्या वर्षी सुलतान होणं, वगैरे. (त्या विकी च्या लेखातील चित्रात कबरीवर शाल नाही, नंतर घातली असवी कुणीतरी.) बर्‍याच पुस्तकांत आणि नंतर चित्रपटांत ऐकलेला जिल्हे-इलाही (Zil-i-Ilahi:Shadow of God) हा किताब या सुलतानाने प्रथम स्वतःला घोषित केल्याचं गुलाम वंशावळीच्या या लेखात कळलं. अवांतरः 'खासदार' या शब्दाचा जो अर्थ त्या विकी च्या लेखात दिलाय तो राजकारण्यांना कळाला तर बरं असं वाटलं (Khasdar: King's personal attendant) :-)

In reply to by बहुगुणी

"जिल्हे-इलाही" =)) हाहाहा.... जिल्हाच्या इलाही नाही हो ,मी लिहीलंय तसं 'ज़िल-ए-इलाही', अल्लाची सावली. :D पाणक्याच्या नोकरीपासून सुरूवात करून रजिया सुलतानचा अमीर-ए-शिकार (lord of the hunt) आणि पुढे स्वतः ६०व्या वर्षी सुलतान होणं, वगैरे. >> त्या काळी बलबनने सुलतान बनल्यावर भाषण ठोकले असेल, 'ये वो मुल्क है जहाँ एक पाणी भरनेवाले सुलतान बन सकता है| "

In reply to by स्वामी संकेतानंद

hitesh Sat, 11/22/2014 - 07:13
जिल ए इलाहीचा अर्थ आज समजला. जिल्लेइलाही असाही उच्चार ऐकला आहे

विशाखा पाटील Sat, 11/22/2014 - 10:42
लेख आवडला. ह्या निमित्ताने एक शंका उपस्थित होते- इस्लामच्या तत्वांमध्ये कबर बांधण्याला विरोध आहे, असं म्हटलं जातं. किंबहुना, अरब देशांमध्ये एकही अशी कबर नाही. बलबनच्या राजवटीच्या सुमारासच अशाच एका मामलुक घराण्याने ईजिप्तवर दीर्घकाळ सत्ता गाजवली. तिथेही हा कबर बांधण्याचा प्रकार रुजला नाही. भारतातल्या इस्लामी राजवटीत मात्र कबर बांधण्याला फार महत्व होतं, हे विशेष.

In reply to by विशाखा पाटील

ज्याला सर्वसाधारणपणे वहाबी इस्लाम म्हणतात त्याच्याप्रमाणे केवळ कबर बांधणे नाही तर कोणाही मुस्लीम माणसाचा कोणताही अवशेष, त्याने वापरलेल्या वस्तू, त्याचे फोटो, इ जतन करणे निषिद्ध आहे. त्याने वापरलेल्या वास्तूचाही पवित्र अथवा अगदी प्रार्थना करण्याची जागा म्हणून वापर करण्यास मनाई आहे. यामुळेच महंमद पैगंबरांचे सौदी अरेबियातिल "तथाकथीत थडगे" लोक तेथे प्रार्थनेस जातात यासाठी जाड काँक्रिट्च्या आवरणाने झाकून टाकलेले आहे. तसेच पैगंबरांचा जेथे जन्म झाला आहे असा दावा केला जाणार्‍या मक्केतल्या काब्याशेजारच्या वास्तूच्या जागेवर धर्ममंडळाच्या पाठिंब्याने राजवाडा बांधण्याची योजना आमलात आणली जात आहे. सद्या या योजनेवर सौदी अरेबियात जोरदार चर्चा चालू आहे.

अनंत छंदी Sat, 11/22/2014 - 17:10
दिल्ली की एक घटना मित्रगण! हमारा देश भारत देश अत्यंत प्राचीन एवं प्राचीन समय से ही अध्यात्म का केंद्र रहा है! इस देश में आज भी कई ऐसे ऐसे स्थान हैं, जहां आज भी मनुष्य पाँव नहीं रख सका है! ये दुर्गम, अगम्य एवं मानव आबादी से दूर हैं! कुछ खंडहर हैं! पुराने खंडहर! कई कई वंशों के पालनकर्ता परन्तु आज उनका नामलेवा नहीं! कुछ पर आज भूत-प्रेत कब्ज़ा किये हुए हैं और कुछ अब जिन्नाती सरहद में हैं! एस ही एक जगह है दिल्ली में महरौली के पास! वहाँ गयासुद्दीन बहाउद्दीन बलबन की मज़ार है! आम लोगों को बलबन के बारे में अधिक मालूम नहीं हैं! लेकिन बलबन ने १२५६ से १२८६ तक दिल्ली में राज किया था! रज़िया सुल्तान का समकालीन था! इस वंश को गुलाम-वंश कहा जाता है! इसमें कई राजा हुए हैं, मुहम्मद गौरी ने पृथ्वीराज चौहान को हारने के पश्चात यहाँ गुलाम-वंश की नींव रखी थी, दिल्ली जीतने के बाद गौरी वापिस चला गया था लेकिन यहाँ अपना सबसे काबिल गुलाम क़ुतुबउद्दीन ऐबक को यहाँ का गवर्नर बना गया था! ऐबक के बाद उसका गुलाम और दामाद शम्सुद्दिन इल्तुतमिश या अल्तमश राजा बना! और उसके बाद अल्तमश की बेटी रज़िया, बीच में भी कई राजा हुए लेकिन मुख्य यही हैं! रज़िया सुल्तान की हत्या के बाद और भी कई छोटे-मोट राजा हुए लेकिन आखिर में गुलाम-वंश की कमान गयासुद्दीन बहाउद्दीन बलबन ने संभाली! वो एक महान राजा हुआ! इसी राजा बलबन की मज़ार के पास एक दूर दराज़ इलाके में, अभी वहाँ टूटे-फूटे खंडहर हैं, आज भी जिन्नाती बाज़ार लगता है! चीज़ों की खरीद-फरोख्त होती है! अदल-बदल होती है! महफिलें सजती हैं! नाच-गाना होता है! दावतें होती हैं! लेकिन कब? क्षमा कीजिये मित्रगण! ये मै आपको नहीं बता सकता! इसमें जान का जोखिम है! यहाँ करीब दो ढाई हज़ार जिन्नात आते हैं! और कुछ इंसान भी! मेरे जैसे इंसान! वहाँ हम एक दूसरे से मिलते भी हैं और ख़बरों का आदान-प्रादान भी होता है! ये बाज़ार या यूँ कहें कि मेला तीन दिनों का होता है! इसमें कई प्रकार के जिन्नात शिरक़त करते हैं! दूर दूर से आये हुए! मुझे ये खबर मेरे एक जानकार मित्र यशवंत से मिली थी! यशवंत सरकारी नौकरी करता था, वैसे तो रहने वाला हिमाचल का था, लेकिन नौकरी यहाँ दिल्ली में होने के कारण दिल्ली में ही परिवार सहित रहता था! वो इन जिन्नातों को लेकर बेहद उत्सुक और जिज्ञासु था! करीब २० साल उसने इनके बारे में खोज कर डाली थी! लेकिन हाथ कुछ नहीं लगा था! कभी जिन्नात से रु-ब-रु भी नहीं हुआ था! लेकिन दिल में ये ख्वाहिश पाल रखी थी कि जिंदगी में एक न एक बार जिन्न ज़रूर देखने हैं! इसी सिलसिले में उसने हिन्दुस्तान का एक एक राज्य छांट मारा था! तांत्रिकों से मिला, आलिमों से मिला, मुल्ला-मौलवियों से मिला लेकिन नतीजा वही सिफ़र का सिफ़र! लेकिन उसकी ख्वाइश उसे जीने नहीं दे रही थी! इसी सिलसिले में उसकी और मेरी एक बार मुलाक़ात हुई थी! वो कर्मठ प्रवृति का, जीवट वाला इंसान था! उसने भी मुझसे ऐसा प्रस्ताव रखा! पहले तो मुझे उस पर हंसी आई लेकिन उसने मेरा जीना मुहाल कर दिया! दिन में तीन तीन बार मुझसे मिलने आये, चार चार घंटे इंतज़ार करे! मै दिल्ली से बाहर होऊं तो वहाँ भी आ जाए! ऐसा करीब एक साल चला! मै उस से परेशान हो गया! मैंने शर्मा जी से कह कर उसको मेरे से मिलने को मना कर दिया! वो रोया! गिड़गिडाया! पांवों में लेटा! आखिर मै भी सोचने पर विवश हो गया! लेकिन वो 'कच्चा' था! और ये कच्चापन कहीं भी मरवा सकता था! एक दिन वो मेरे पास आया, वक़्त होगा कोई सुबह ९ बजे का! एक दम चुस्त-दुरुस्त और मुस्तैद! बोला," प्रणाम गुरु जी!" "प्रणाम यश! कैसे हो भाई?" मैंने पूछा, "बस आपकी कृपा है!" उसने कहा! "कैसे आये? ये बताओ?" मैंने पूछा, "गुरु जी एक खबर लाया हूँ" उसने कहा, "कैसी खबर?" मैंने पूछा, "गुरु जी महरौली में एक जगह है, वहाँ एक जिन्नाती बाज़ार सजने वाला है!!" उसने उत्सुकता से बताया! मै उसका आशय समझ गया था! "तुम्हे किसने बताया इस बारे में?" मैंने पूछा, "एक बेहद बुजुर्गवार से मेरी बात हुई थी अभी महिना भर पहले, कोई ४० साल पहले वो इस बाज़ार में शरीक हुए थे, उन्होंने ही बताया मुझे!" उसने पूरे जोश से कहा! "अच्छा! तो आप भी शरीक होना चाहते हो इस बाज़ार में! इंसानी बाज़ारों से मन उचाट हो गया है क्या तुम्हारा यश?" मैंने पूछा, "गुरु जी आप तो जानते ही हैं, कि मेरी क्या ख्वाहिश है!" उसने बताया, "तो आपकी ख्वाहिश भी तो अव्वल दर्ज़े की है यश!" मैंने कहा! "गुरु जी! अगर मेरी ख्वाइश ना पूरी हुई तो मेरे मरने के बाद भी मेरी रूह ऐसे ही भटकती रहेगी!" उसने कहा, "और जान का खतरा हुआ तो?" मैंने कहा, "नहीं होगा गुरु जी! मुझ पर विश्वास रखिये आप" उसने दृढ़ता से कहा! "देखो, मै विचार करूँगा, अभी नहीं कह सकता, वैसे कब है ये बाज़ार शुरू?" मैंने पूछा, "जी परसों से, परसों जुमे-रात है न, तब से!" उसने खुश होके कहा! मै उसका जोश देखकर हैरान था! कैसी अजीब सी ख्वाइश दिल में पाले हुआ था वो! "ठीक है, मै देखता हूँ, अगर मुझे ज़रुरत पड़ी तो मै आपको बुला लूँगा आज या कल में!" मैंने कहा! उसने झुक के मेरे पाँव छुए जैसे उसको टिकट मिल गया हो मेले का!! और नमस्कार करके चला गया! "शर्मा जी! बड़ा अजीब आदमी है ये! क्या करना है इसका?" मैंने पूछा, "गुरु जी! एक बार दिखा दो इसको! क्यूंकि भूत तो पीछा छोड़ देगा आपका, ये नहीं छोड़ने वाला!" उन्होंने मजाक में कहा! "ठीक है, परसों है बाज़ार! चलिए शर्मा जी! चलते हैं बाज़ार!" मैंने भी हंसके कहा! "तो कब बुलाऊं इसे?" उन्होंने पूछा, "आप इसको कल रात को बुलालो, उसके बाद ये घर नहीं जाएगा, यहीं रहेगा, फिर हम सीधे परसों वहीँ चलते हैं, रात को!" मैंने कहा, "ठीक है, कह देता हूँ मै!" उन्होंने कहा और यश को फ़ोन कर दिया! यश के आश्चर्य का ठिकाना ना रहा! अगले दिन यश रात ९ बजे मेरे पास आ गया! तैयार! "आ गए यश!" मैंने हंस के कहा, "हाँ जी! आपकी बड़ी कृपा हुई गुरु जी! मै धन्य हो गया!" उसने हाथ जोड़ के कहा! मैंने उसी रात शर्मा जी और यश को सशक्त कर दिया! उनको तंत्राभूषण धारण करवा दिए! स्वयं भी अभय-सिद्ध मंत्र जाप किया और हम तैयार हो गए! अब कुछ खाना-पीना नहीं था अगली रात तक! अब सिर्फ जिन्नाती दावत का मजा लेना था! अगले दिन मैंने प्राण-रक्षा मंत्र से हम तीनों को अभिमंत्रित कर लिया! और रात्रि ग्यारह बजे हम महरौली की तरफ चल पड़े! काफी यातायात था रात्रि के इस समय भी! खैर हम वहाँ पहुँच गए! वहाँ के खंडहरों पर प्रकाश डाला गया था! वातावरण पीला सा हो रहा था! यहाँ तक तो पहुँच गए थे, लेकिन बाज़ार था किधर? मैंने कलुष-मंत्र पढ़ा! सामने देखा तो कुछ भी नहीं दिखा! न अगल-बगल में और ना ही पीछे और न ही आगे! हाँ, कूदती-फांदती प्रेतात्माएं अवश्य दिख रही थीं! कभी झुण्ड सड़क पर आते और कभी उड़ जाते! कई रुक कर हमे देखते और फिर भाग जाते! क्या छोटे! क्या बड़े! क्या औरत! क्या मर्द! मैंने यश से कहा, "यश, यहाँ तो कोई बाज़ार नहीं है भाई? लगता है बुजुर्गवार ने मजाक किया आपसे!" मैंने कहा, "नहीं गुरु जी, एक ९० वर्ष का बुज़ुर्ग क्यूँ झूठ बोलेगा?" उसने कहा, बात में दम था! यहाँ मै कारिन्दा या खबीस बुला नहीं सकता था! बड़ी मुसीबत थी! मुझे एक युक्ति सूझी! मैंने कलुष-मंत्र के साथ साथ ताम-मंत्र पढ़ा! मुझे कोई एक डेढ़ किलोमीटर दूर जंगल में कुछ रौशनी दिखाई दी! वो रौशनी बड़ी ऊंची और लगातार हिलती-डुलती थी! यही थी जिन्नाती पैंठ! "यश भाई! आपके बुजुर्गवार ने सही कहा था! यहाँ है एक बाज़ार!" मैंने कहा! "कहाँ??" वो ख़ुशी से उछला! उसकी ख़ुशी देखते ही बनती थी! "है! यहीं है लेकिन आगे है! हमे आगे जाना पड़ेगा!" मैंने कहा, हम आगे बढे! और आगे! फिर उस रौशनी के अनुपात में आ गए! एक जगह गाडी खड़ी की, ये एक शराब का ठेका सा ही था, पक्का नहीं पता कि ठेका ही था! लेकिन जो कुछ भी था बंद पड़ा था, गाडी इसके पीछे ही खड़ी कर दी! और हम वहाँ उस रौशनी की तरफ पैदल ही चलने लग गए! मैंने शर्मा जी और यश को वहीँ रोका और कलुष एवं ताम-मंत्र से उनके नेत्र पोषित कर दिए! उन्होंने नेत्र खोले! "ओह! ये क्या है!" यश के मुंह से निकला! "ये जिन्नाती लौ है यश!" मैंने कहा, "मुझे विश्वास नहीं होता! ऐसा प्रकाश पूरी पृथ्वी पर कहीं नहीं है, ना मैंने देखा आज तक!" उसने कहा, "अभी तुम वो देखोगे जो कभी सपने में और कल्पना में भी नहीं सोच सकते! बस डरना नहीं, घबराना नहीं! मै हूँ तुम्हारे साथ! बात सिर्फ मै करूँगा! तुम नहीं बोलना कुछ भी जब तक मै न कहूँ!" मैंने कहा, "जैसी आपकी आज्ञा गुरु जी!" उसने कहा और वो रौशनी देख कर अवाक था! "चलिए अब आगे बढ़ें हम!" मैंने कहा! हम ऊंचे नीचे पत्थरों पर आगे बढे! जिन्नाती लौ की रौशनी में पत्थर नहाए हुए थे! एक एक पत्थर दिखाई दे रहा था! हम आगे गए! आगे गए तो सामने पैंठ का मुहाना दिखाई दिया! वहाँ ४ सन्तरी जिन्नात सर पर साफ़ बांधे पहरा दे रहे थे! मै रुक! मेरे साथ दोनों ही रुके! "यश! अगर केवल जिन्न देखने ही हैं तो सामने वो पहरेदारों को देख लो! और अगर बाज़ार देखना हो तो आगे चलो!" मैंने कहा, "गुरु जी! ऐसा मौक़ा फिर कभी नहीं मिलेगा! आप आगे चलिए!" वो अपलक उन चारों जिन्नातों को देखता रहा! "ठीक है!" मैंने कहा और आगे बढ़ा! दो पहरेदारों ने रोक लिया और अरबी भाषा में पूछा, "तुम तो आदमजात हो! यहाँ किस से मिलने आये हो?" "हम किसी से मिलने नहीं बस नज़ारा देखने आये हैं" मैंने कहा, "आलिम हो! जाओ! लेकिन अपनी कतार में ही रहना!" उसने चेताया! "शुक्रिया आपका!" मैंने कहा तो उसने मुस्कुरा के शुक्रिया कहा! हम अन्दर गए! यश ये सब देख चकित था! हज़ारों सवाल दिमाग में आते और निकल जाते! उसकी आँखों की पुतलियाँ फ़ैल गयीं थीं! वो ज्यादा से ज्यादा वो नज़ारा अपनी आँखों में क़ैद करना चाहता था! हम अन्दर धीरे धीरे चल रहे थे! नीचे ज़मीन पर मोटे-मोटे कालीन पड़े थे! आवाज़ ही नहीं निकल रही थी जूतों से! वहाँ जिन्नात एक दूसरे के गले में हाथ डाले घूम रहे थे! कई एक गुट बना के बैठे थे! उनकी नज़र हम पर पड़ती और हमारी उनपर! "सलाम आलेकुम आदमजात!" मुझे आवाज़ आई! मैंने देखा वो एक जवान जिन्न था! काले रंग की शेरवानी और स्वर्ण-खचित, पहने हुए! "सलाम जनाब!" मैंने कहा! "कहाँ से आये हो क़िबला?" उसने पूछा, "बस यहीं के वाशिंदे हैं हम जनाब!" मैंने जवाब दिया! "आइये आप मेरे साथ!" उसने कहा, यश घबराया! लेकिन मैंने उसको उसके कंधे पर दबा के आगे उसके पीछे जाने को कहा! हम उसके पीछे पीछे गए! वो एक जगह रुका और एक औरत से पास गया! वो बुर्के में थी! औरत उठी, अन्दर गयी और चांदी के गिलासों में शरबत ले आई! "लीजिये! हलक़ तर कर लीजिये!" उसने कहा! हमने अपने अपने गिलास उठाये और वो बेहतरीन शरबत पीना शुरू किया! मैंने उस से पूछा, "जनाब! शुक्रिया शरबत के लिए! आपका नाम जानना चाहूँगा!" मैंने कहा, "मुन्नवर हसन नाम है मेरा और जनाब आपका?" उसने सवाल किया, मैंने हम तीनों के नाम से उसको वाकिफ करा दिया! "तफरीह करने आये हो शायद आप लोग!" उसने कहा, "हाँ जनाब मुन्नवर!" मैंने जवाब दिया! "कीजिये कोई बात नहीं! आलिम लोग तो आते ही रहते हैं यहाँ!" उसने बताया! "जी शुक्रिया!" मैंने कहा, "आइये आपको एक ऐसी ही आलिम से मिलवाता हूँ मै, वो दरअसल पीछे की तरफ हैं!" उसने कहा, "जी चलिए! आपकी बड़ी मेहरबानी!" मैंने कहा! "काहे की मेहरबानी क़िबला! आप तो हमारे मेहमान हो!" उसने कहा! हम मुन्न्नवर के पीछे पीछे चल पड़े! ये एक कनात की तरह से बनाया हुआ तम्बू सा था, बाहर परदा पड़ा था, उसने परदा हटाया और हमे अन्दर ले गया! अन्दर मैंने एक और इंसान को देखा! वो एक औरत थी! उसने मुझे और मैंने उसे गर्दन हिला के अभिवादन किया! हम कालीनों पर बिछे चादरनुमा कपडे पर बैठे और मसनद लगा दी गयीं! उस औरत से मुझसे पूछा, " आप यहीं रहते हैं? मेरा मतलब दिल्ली में?" "हाँ! और आप?" मैंने भी सवाल किया, "मै आजमगढ़ के पास से आई हूँ, नाम है साईरा, यहाँ मेरा मोहसिन लाया है मुझे!" उसने बताया, "अच्छा! बहुत खूब!" मैंने कहा, "और आप किस सिलसिले में?" उसने पूछा, "बस यूहीं तफरीह करने!" मैंने हंस के कहा, "अच्छा! अच्छा!" उसने भी हंस के कहा, "कितनी 'पकड़' हैं आपके पास ऐसी?'' उसने पूछा, "जी, पकड़ तो काफी हैं, लेकिन मेरा मामला दूसरा है! मै इनसे काम नहीं लेता" मैंने बताया, "मै समझ गयी आपका मतलब" उसने बताया, "कितने बरस हुए आये यहाँ?" उसने पूछा, "आज पहली बार!" मैंने कहा, "अच्छा! और कहीं?'' उसने सवाल पूछना ज़ारी रखा, "हाँ, काफी जगह गया हूँ" मैंने बताया, "ह्म्म्म! और कहाँ? अगर बता सकें तो?" उसने पूछा, "माफ़ कीजियेगा, यहाँ नाम नहीं ले सकता मै" मैंने बताया, "आप अपना पता बता सकते हैं?" उसने पूछा, "आप खुद जान सकती हैं मोहतरमा!" मैंने कहा, "कहीं आपने पकड़ लिया तो?" उसने हंस के कहा! "हाँ मुमकिन हैं, वो पकड़ा जाए!" मैंने भी हंस के कहा, "तभी आपसे पता पूछा मैंने, अगर बुरा न मानें तो" उसने कहा, "ठीक है, आप मेरा पता ले लीजिये" और मैं उसको अपना पता मुन्हज़ुबानी बता दिया! उसके बाद साईरा ने खाने के लिए मिठाईयां मंगवा लीं! बड़ी बड़ी बर्फियां! जलेबियाँ! इमरतियाँ! पंजीरियाँ! खोवा! दूध! पिस्ते आदि आदि! उसने एक छोटी तश्तरी में थोडा थोडा सामान डाला और कहा, "लीजिये नोश फरमाइए!" "शुक्रिया!" मैंने कहा और मैंने एक बर्फी उठा ली! एक बर्फी ही कोई ४०० ग्राम के करीब! फिर उसने वो तश्तरी यश और शर्मा जी की तरफ बढ़ा दी! इतने में ही एक मजबूत, पहलवान किस्म का एक खूबसूरत जिन्न अन्दर आया! उनसे आते ही सलाम किया! और बैठ गया! "इनसे मिलये! ये हैं मेरे मोहसिन!" साईरा ने उस जिन्न की तरफ इशारा करते हुए कहा, उसने मुझे देखा और मैंने उसको और हमने एक दूसरे को हाथ उठाकर सलाम फरमाया! "मेरा नाम गुल मोहम्मद है और आपकी तारीफ़?" उसने कहा, मैंने अपना नाम उसको बता दिया! हमने मिठाई खा ली और वहाँ से उठ गए! साईरा ने रोका भी लेकिन हम वहाँ नहीं रुके और बाहर आ गए शुक्रिया कह के! घडी देखी, रात के तीन बजे थे! बाहर आये तो एक जगह पर नज़र पड़ी मेरी! वहाँ तीर-तलवार, खंज़र आदि रखे थे! ६-६ फुट की तलवारें! २-२ फुट के खंजर! और भी ऐसा ही सामान! "आपके लिए तो यहाँ कुछ नहीं आदमजात!" एक औरत ने कहा, "जी हाँ! हम ऐसे ही देखने लगे थे!" मैंने कहा, "कोई बात नहीं, हाथ में लेके देख लो!" उसने कहा, मैंने और शर्मा जी ने एक एक खंजर उठा के देखा! खंजर का वजन कम से कम १० किलो! हमने वहीँ रख दिए और आगे चल पड़े! अगली जगह गए! ये एक फल की सी दुकान थी! बड़े बड़े अनार! अंगूर! पपीते! "आइये आदमजात! क्या नोश फरमाएंगे आप?" एक बुसुर्ग ने कहा, "जी आपका शुक्रिया! हम देख रहे थे! हमारी ज़मीन पर ऐसी पैदावार कहीं नहीं होती साहब!" मैंने कहा, "हाँ! ये तो सही बात है!" उसने हंस के कहा और फिर थोड़े अंगूर दे दिए! एक एक अंगूर सेब के बराबर! हमे शुक्रिया किया और आगे चल पड़े! यहाँ एक जगह बर्तन-भांडे पड़े थे! काफी भीड़-भाड़ थी यहाँ! हमने भी देखा! इतने बड़े बड़े बर्तन कि २० इंसान एक में ही खा लें! हम वहाँ से भी आगे बढे! एक जगह नाच-गाना हो रहा था, तालियाँ बज रही थीं! अरबी संगीत की थिरकन थी वहाँ! बड़ा बेहतरीन नज़ारा था वहाँ! खूबसूरत औरतें नाच रही थीं! हमने भी नाच का लुत्फ़ लिया! तभी वहाँ मुन्नवर आ गया! बोला, "सुनिए जनाब! पौ फटने को है, जो खाना है खा लो! आपकी दुनिया शुरू होने को है!" मैंने घडी देखी, ५ बजे से ज्यादा का वक़्त हो गया था! हमको मुन्नवर ने खाना खिलाया! मिठाईयां खिलायीं! गोश्त खिलाया और फिर तभी एक तुरही बजी! मुन्नवर ने गले मिलके विदा ली! चमक गायब हुई! रौशनी गायब! मैंने कलुष और ताम-मंत्र वापिस किये! आँखें खोलीं तो हम खंडहरों के बीच खड़े थे! वहाँ झाड-झंखाड़ के अलावा कुछ भी ना था! परदे का मंजर बदल गया था! यश के पास रखे अंगूर कोयला बन गए थे! जहां हम खड़े थे वहीँ थोड़ी सी दूर एक मज़ार है! ये मज़ार खान शहीद की है, बलबन के बेटे की! यश को जैसे लकवा मार गया हो! मैंने उसको झकझोरा! उसके उठाया वो वहीँ एक पत्थर पर बैठ गया! वहीँ देखते हुए जहां उसने जिन्नातों की पैंठ देखी थी! यश संयत न हुआ तो मैंने और शर्मा जी ने भी वहीँ बैठना उचित समझा! सूरज निकल चुका था! अब यश बात कर सकता था! मुझे अपने पीछे किसी के चलने की आवाज़ आई! हमने पीछे मुड के देखा, ये साईरा थी! उसने सलाम किया और हमारे पास आ गयी! उसने कहा कि अगली बार भी यहीं मिलें तो अच्छा रहेगा! साईरा आज भी मेरे संपर्क में है, हाँ, ना तो उसे कोई काम पड़ा ना मुझे! वो अपने मोहसिन गुल मोहम्मद के साथ खुश है! यश की ख्वाइश पूरी हो गयी थी! अब कभी वो जिद करता है तो मै उसे सिरे से खारिज कर देता हूँ! मित्रो! इस संसार में अनेक और संसार भरे पड़े हैं! कभी हम तो कभी वो हमसे टकरा जाते हैं! आप कभी महरौली जाएँ तो बलबन की बेहतरीन मज़ार देखें और खान शहीद की मज़ार के सामने पूर्व दिशा में पड़ा एक खाली मैदान भी देखें! और उस से आगे है वो स्थान जहां कभी खान शाहिद ने वो ज़मीन जिन्नाती पैंठ के लिए दान दी थी! खान शहीद तो नहीं रहे! अब केवल मज़ार बाकी है उनकी! लेकिन वो पैंठ साल में तीन बार तभी से यहाँ लगातार लग रही है!

In reply to by अनंत छंदी

अगले वक्त बिना भुले मुझे जरूर बुलाईये ! मुझे बहूत ख्वाईश है जिन्नाती पैंठ देखनेकी । धन्यवाद ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

धडपड्या Sun, 11/23/2014 - 09:03
अगर ग्रुप टूर अरेंज करें, तो जनाब डिस्काउंट वगैरह दे दोगे ना? अगला "कट्टा" वहीपर करेंगे फिर... आपके जिन्नात भी खुश हो जाएंगे.. तो सोचीये, और बताइये..

कंजूस Mon, 11/24/2014 - 21:55
यातले एक दोन प्रतिसाद लेख म्हणूनच टाकावे ते उर्दू फारसी जरा डोक्यावरून जातंय. बरंच लिहायचंय पण धागा अगोदरच गच्च झालाय. स्वामींचे अधिष्टान दिल्लीत पक्के आहे हे मात्र खरंच.

विवेकपटाईत Sat, 01/02/2016 - 15:04
असे भरपूर किस्से वाचले आणि ऐकलेले आहेत. बाकी जुन्या किल्ल्याच्या संग्रहालयात किल्ल्यात झालेल्या खुदाईत सापडलल्या वस्तू आहेत. मौर्य काळाच्या पूर्वीच्या वस्तू सुद्धा खुदाईत सापडलेल्या आहेत.