मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उठ तरुणा उठ आता..!

चन्द्रशेखर गोखले · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
उ ठ तरुणा उठ आता घडवु या नव भारता गड्या रे घडउ या नवभारता ही बघ भारत जननी का अश्रु तिच्या त्या नयनी..? ना कळे तुला रे अजुनी..? का रडते वीरांगिनी...? निर्लज्जा परी स्वस्थ कसा तू..? तव मातेचे दुखः जाण तू अश्रु आईच्या नयनीचे चल उठ पुसू आता.. उठ तरुणा उठ आता घडवू या नवभारता याद कर भगतसिंगांची तू आठव राजगुरु धेय्या साठी आपण आपुल्या मरु पुन्हा अवतरु कुठे गेले ते गांधी आणिक कुठे गेले ते नेहरु....? हल्लीचे हे नव्हेत नेते हे तर माथेफिरु नकोत आम्हा उपदेश किंवा नकोच कोणी नेता अखंड भारत धेय्य आमुचे आम्हा हवी एकता..! उठ तरुणा उठ आता घडवू या नवभारता गड्यारे घडवू या नवभारता.....

वाचने 2245 वाचनखूण प्रतिक्रिया 7

प्रथमेश गोखले 02/11/2008 - 14:32
तुमची कविता मला तरी आवड्ली. जरा उशिराने वाचली ,या कवितेला चाल लावयला हरकत नाही

प्रथमेश गोखले 02/11/2008 - 14:32
तुमची कविता मला तरी आवड्ली. जरा उशिराने वाचली ,या कवितेला चाल लावयला हरकत नाही