नको ..
लेखनविषय:
मागे नको वळू कारण पुढे ठेच लागेल
मग निघेल जिभाळी अन जिव्हारी लागेल..
मागे नको वळू कारण मन वेडझवं
मागे वळून म्हणेल त्याला पुन्हा सगळं हवं..
मागे नको वळू कारण खोळंबत राहशील
सुकलेल्या पळांशी उगा झळंबत राहशील..
मागे नको वळू कारण मागे रस्ते नसतील
मागे नको वळू तुला माझे डोळे दिसतील..
वाचने
6105
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
लैच सेंटी लिवताय हो गवि..
आमचे २ पैसे..
In reply to आमचे २ पैसे.. by अर्धवटराव
गवि अन अर्धवट रावांना पूर्ण
नको म्हटलेलंच करावंसं वाटतं मनाला !
नको..
गवि आणि अर्धवटराव.
In reply to गवि आणि अर्धवटराव. by प्रचेतस
+१
मस्त कविता आवडली
__/\__!
मागे नको वळू तुला सहन नाही
रचना आवडली.
वेडझवं हा शब्द इनसर्ट केलेला वाटला चपखल नाही
In reply to वेडझवं हा शब्द इनसर्ट केलेला वाटला चपखल नाही by मारवा
शब्द पटला, रुचला.... कधी कधी
श्री ४२० ची नादिरा आणि
गवि = कवि
जे न देखे कवि, ते देखे गवि...
नव्या दमाचे जुनेच कवी गवि आणि
वाह