ऐका सत्य नारायणाssssची कथा!
तुंम्ही म्हणाल...
अहो ..हे सर्व तुंम्ही आंम्हाला कशाला सांगत आहात??? तर..त्याचं कारण असं की आता पुढे तुंम्ही सत्यनारायणाच्या कथेचे २ प्रकार ऐकणार आहात.ते नेमके कशामुळे तयार झाले..याची पूर्वपीठिका माहित असावी. हे सर्व बदल (गेल्या दहा वर्षात..) करत असताना माझ्या(मना)समोर एकच उद्दिष्ट आहे. ते म्हणजे माझ्यासमोर येणार्या धर्म:श्रद्ध माणसाला धर्माच्या नावाखाली मिळणारी पारंपारिक मूल्य मी शक्यतोवर मला टाळता यावी..आणि त्याच्या जागी आधुनिक्/पुरोगामी असं काहि देता आलं नाही..तरी किमान नितीची उपासना घडायला काहितरी कारणीभूत होइल असं काहि देता यावं..आता यातंही एक अडचण नेहमीचीच असते/असणार आहे. ती म्हणजे एखाद्या यजमानानी ही कथा किंवा असा बदल त्याला नको असला,(जसे की कन्या-दानाच्या जागी ..मी आणलेला वधू/वर स्विकाराचा विधी!..होमाशिवाय'ची वास्तुशांत! इत्यादी..) तर मी काय करतो? त्याला हवं ते (पारंपारिक ) काम देऊन मोकळा होतो. असं का बरं मग? कारण तो मला त्याला हवं ते करवून घेण्याचेच पैसे देत असतो. आणि मी ही कुणी समाजसुधारक नव्हे तर एक भटजी आहे. (फारतर..धर्मसुधारणेची इच्छा असलेला भटजी आहे ..असे म्हणता येइल.) त्यामुळे ही मर्यादा मला केवळ पैश्यालाच नव्हे,तर यजमानाला भारतीय घटनेनी दिलेल्या धर्मोपासनेच्या स्वातंत्र्याचा मान राखून पाळावीच लागणार. अर्थात..मी जे जे बदल करतो..ते ही केवळ मला हवे असतात म्हणून नव्हे..तर त्यालाही चालणारे असतात..म्हणूनच! असो..बरच पुराण लावलं. आता मूळ विषयाकडे वळू. सत्यनारायणाच्या कथेत..मी केलेले बदल म्हणजे,नक्की आहे तरी काय??? अध्याय पहिला :- यात सुरवातीच्या काहि वाक्यांनंतर येणारं कर्मविपाकाचं मुल्य मी सरळ उडवुन लावलेलं आहे. आणि पुढे इहलैकिक दु:खांचा पूर्वजन्मात झालेल्या पापांशी असलेला समंधही ...मी रद्दबातल केला आहे. तसेच नारद आणि विष्णुच्या संवादात..ही पूजा पौर्णिमेला केली असता मिळणारं..अधिक फळ! हे टाळून कोणताही शुभकारक दिवस आणि आपलं मन प्रसन्न असेल अशी वेळ..म्हणजेच चांगला मुहुर्त असा फेरबदल केलेला आहे. बाकि पुजेमुळे होणारे फायदे/तोटे तर संपूर्ण कथेत कुठेच शिल्लक ठेवलेले नाहीत. अध्याय दुसरा:- या अध्यायापसून सत्य-देव किंवा सत्य-नावाचा-नारायण असे सूचक उल्लेख पुढे सर्वत्र मी केले आहेत. आणि शतानंद ब्राम्हणाला देव त्याची गरिबी जाऊन श्रीमंती यावी..म्हणून हा उपाय सांगतो..असं जे प्र-लोभन दाखवलय..ते सोडून मी त्याला "हे पूजन केल्यानी तुझी दु:ख दूर होऊन..तुला सन्मार्गाचं दर्शन घडेल(आणि त्या योगेच तू सुखी होशिल!) असं वाक्य टाकलय. पुढे हा शतानंद (लॉट्री लागल्या सारखा) पूजेवर पूजा(स्वतःच्या घरी!) करुन सुखी होत नाही..तर स्वतःजवळ असलेली विद्या इतरांना प्रसादासारखी वाटतो,आणि त्यायोगे लोकप्रतिष्ठा/राजप्रतिष्ठा मिळवुन सुखी होतो..(आणि याची जाणिव) म्हणून त्याला वाटेल तेंव्हा पूजा करतो ..असं दाखवलय. त्यापुढचा त्याला मोळिविक्या भेटण्याचा प्रसंगही बदलवून त्यात पूजेऐवजी नामस्मरण ही पण (वेळप्रसंगी..) पूजा होऊ शकते असं मांडलय. शिवाय या गरीब मोळिविक्याला प्राचिन कथेत कचकाऊन प्रलोभनं/अमिषं दाखवली आहेत..त्यांनाही मी टाळलेलं आहे. थोडक्यात..परमेश्वरी आशिर्वादाच्या योगे माणसाच्या जीवनात मुळातच असलेला प्रयत्नवाद..सदाचरण हेच फळ-मिळायला कारणीभूत असतं...हे मी या दुसर्या अध्यायाचं बीज बनवलं आहे. अध्यात तिसरा:- हा फेमस साधुवाणी एपिसोड आहे.. भरपूर चमत्कार..लबाड्या केल्या तरी फळणारा देव..तसेच निष्कारण त्रासात टाकणारा आणि पूजा केल्यावर-सोडणारा असा-देव..मी उडवून लावलेला आहे. किंबहुना पहिल्यांदाच राजा उल्कामुख हा..हे पूजन पुत्रप्राप्तीसाठी करतो..असं दाखवलय तिथुनच बदल सुरु केलाय.. राजा हे पुजन कशासाठी करतो..? तर राज्य चालविण्यासाठी जी बुद्धी इच्छा शक्ति लागते..ती देणारा(अश्या मनोकामना)पूर्ण करणारा हा देव आहे म्हणून!.. नंतर साधुवाणी हेच पूजन का करतो? तर.. मूळ कथेत अपत्यप्राप्तीसाठी पूजा हा हेतू दर्शविलाय..मी तो बदलून..आयुष्यात जे न्यून आहे..ते(योग्य मार्गानी.) पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना साधुवाण्याकडून करविली आहे.पुढे मग साधुवाण्याची बायको(मुलं झाल्यावर..साधुवाण्याला देवाचे ऋण मानावे म्हणून पूजा करायला लावते..तो ती टाळतो..आणि नंतर पुढे बोलल्याप्रमाणे मुलिच्या विवाहावेळी करत नाही..वचनभंग करतो..त्यामुळे त्याला चोरिचा आळ येऊन तुरुंगात पडावं लागतं.. हा भाग साधारण तसाच ठेवलाय.(कारण आरपार बदलेली कथा कुणालाच अवडत नाही..हा अनुभव आहेच!) तरिही पुन्हा तुरुंगातून सुटायला पुन्हा पूजेचा प्रकार मी ठेवलेला नाहीच.. शिवाय इकडे साधुवाण्याच्या घरच्यांनी पुजा प्रार्थना केली..आणि लगेच तो (त्या योगे) तिकडे सुटला ..हा चमत्कारिक पणा बदलून..मी त्या चंद्रकेतू राजाला..नीट तपास पूर्ण झाल्यावर हे कळलं..की हे दोघं चोर नसून व्यापारीच आहेत..आणि मग त्यांनी यांना सोडलं..असं सांगुन या अध्यायाला शेवटाला आणलय..मूळ कथेत हे सर्व राजाला सत्यनारायणानी स्वप्नात येऊन ..कुठलिहि कारणमिमांसा न देता "हे चोर नाहीत..यांना सोडून दे " असं सांगितलेलं आहे. (पुढे हिच गोष्ट्/कथा चवथ्या आध्यायात पूर्ण होते..) अध्याय चवथा:- या अध्यायात साधुवाण्याने घरीजाताना मार्गात विघ्ने येऊ नयेत म्हणून ब्राम्हणांना दक्षिणा देऊन प्रवास सुरु केला असा मुद्दा आहे.. हा मी सुरवातीपासूनच कधिही सांगितलेला नाही. पुढे सत्यनारायण संन्यासी वेष धारण करुन येतो..नौकेत काय आहे? विचारतो..साधुवाणी खोटं बोलतो..त्याची परिणिती नौकेतल्या द्रव्यनाशात होते..मग पुन्हा संन्याशाचे पाय धरणे..संन्याश्याने त्याला पूजेविषयी सुनावणे..साधुवाण्याने त्याला हो'कार देणे..नौकेतील धनंद्रव्य पुन्हा मिळविणे..यात मी.. प्रसंग तोच ठेऊन मूल्यबदल केलाय..आधिच्या कथेत सांगितल्या प्रमाणे साधुवाण्याला दामदुप्पट धन विनासायास मिळतं..मग फुकट मिळालेल्या धनानी माणूस असत्य बेताल वर्तन करतो..त्याला यामुळेच जवळ असलेलं धन..द्र्व्य सुख देत नाही..(नष्ट होतं..पालापाचोळ्यासमान होतं) हा मानवी जिवनातला धागा पकडून नंतर..हे साधुवाण्याच्या लक्षात येतं..पैश्याची आसक्ती संपते..देवाला केवळ मूर्तीतच नाही तर दिन दु:खितांमधेही पहावं.. सदाचरणी राहुन परमेश्वराचं नाव घेण्याचा मार्ग अवलंबावा .. हे सर्व कळतं... असा बदल मी त्यात केला आहे.. पुढे साधुवाण्याचं घरी जाणे..त्याच्या बायकोने(लीलावतीने) मुलिला(कलावतीला) "सत्यनारायण पूजा करुनच यांना भेटायला नदिवर ये" असं सांगणे..तिने पूजा करुन,परंतू प्रसाद न घेता येणे..मग नौका बुडणे..कलावतीने "पति पुन्हा प्राप्त झाला नाही,तर त्याच्या पादुका घेऊन सती जाइन" असं बोलणे..मग साधुवाण्याने पूजा केल्यावर नौका जावयासह परत वरती येणे.. हा सर्व चमत्कारीक आणि अनैतिक कथा भाग..वगळून..मी त्या जागी- साधुवाणी घरी येतो..संन्याश्याच्या दर्शनानी/उपदेशानी आपलं जीवन कसं सन्मार्गी झालं..हे कुटुंबियांना सांगतो..पुढचं सगळं आयुष्य हा साधुवाणी त्याला वाटेल तेंव्हा* (कृतज्ञता म्हणून..) सत्यदेवाचं नामस्मरण/पूजन करुन सदाचारी जीवन जगण्यात घालवतो..आणि या पद्धतीनी जगल्यावर त्याला शेवटी फळं काय मिळतं बरं??? तर वृद्धापकाळी मृत्यु जवळ आल्यानंतर/येइपर्यंत, त्याची इहलोकावरची आस(स्वार्थपूर्णआशा)..पूर्ण संपलेली असते..सुखी अंतःकरणानी तो भगवंताच्या भेटीला जाऊ शकतो.. असं दाखवून..मी या प्रकारच्या प्राप्त होणार्या अवस्थेला..इहलौकिक मोक्ष अश्या नव्या संकल्पनेत सादर केलेलं आहे. ..याच मुद्द्यावर हा अध्याय संपवलेला आहे. (* :- मूळ कथेत साधुवाणी पुढे आयुष्यभर दर पौर्णिमेला ही पूजा करतो..असं सांगुन हा जो..प्रॉडक्ट गिर्हाइकाला अॅटेज करण्याचा प्रयत्न सर्व कथेत झालेला आहे..तो मी उडवला आहे.) अध्याय पाचवा:- ही अंगध्वज राजाची गोष्ट..हा राजा जंगलात जातो..शिकार खेळतो..तिथे गोपालकांनी केलेल्या पूजेला नमस्कार करत नाही..त्यांनी दिलेला प्रसादंही जमिनीवर टाकतो..याची परिणीती म्हणून देवाचा कोप होऊन..त्याचं राज्य जातं..शंभर मुलांचा मृत्यू होतो..सत्यनारायण परत केल्यानी हे सगळं परत मिळतं..असा हा कथाभाग आहे..आणि शेवटी या पाच अध्यायातल्या गोष्टींना आधाराला धरून..लोकांना ही पूजा करण्याचं महत्व..काहि प्रमाणात भीती आणि मोह घालून सांगत हे सर्व संपवलेलं आहे. मी यात राजाला शिकार खेळण्याचं व्यसन आहे असं दाखवून..गोपालकांनी दिलेल्या प्रसादाचा त्याग इथपर्यंत सर्व तसच ठेऊन..त्याची परिणीती त्याचं राज्य शत्रुनी बळकावण्यात दाखवली आहे..पुढे हा राजा दु:ख्खी अंतःकरणानी,राज्य गेलं..म्हणून जंगलात इतस्ततः भटकत असताना याच गोपालकांच्या दृष्टीला पडतो..असं दाखवून्,गोपालकां कडून राजाला एक उपदेश करवलाय..त्यात ते राजाला असं सांगतात..की -हे राजन.. तू प्रसाद टाकलास तेंव्हाच तुला ..हे असं काहितरी फळ मिळणार हे आंम्ही ओळखलं होतं..अभक्त सुद्धा(जे अधार्मिक असतात असे लोक...) ते ही प्रसाद अन्न समजुन खातात.(फेकून देत नाहीत..) याच वर्तनाला प्रथमधर्म..म्हणजे मनुष्यधर्म म्हणतात.. तुझ्याकडे हा मनुष्यधर्म नव्हता..म्हणूनच राजधर्म(हा त्यानंतरच येणारा..) दुसरा धर्मही नव्हता/राहिला नाही ..म्हणून तुझ्याकडे राज्यपालनाची बुद्धी राहिली नाही(शिकारी खेळत बसलास) आणि राज्य शत्रूनी नेलं..."या स्पष्टी-करणानंतर..राजा देवासमोर पश्चाताप बुद्धिनी अशी शपथ घेतो..की- "मी तुझ्या आशिर्वादानी आणि माझ्या बळावर राज्य तर परत मिळविनच..परंतू तू मला तिथे राजधर्म पाळता यावा यासाठी मनुष्यधर्म पालन करण्याची बुद्धी दे".. मग..पुढे हा राजा,राज्य परत मिळवतो..बोलल्यासारखं वागून दाखवतो.. सुखी होतो..मोक्षाचा अधिकारी होतो..इथे हे सर्व संपवून.. शेवटी ही (म्हणजे अशी सांगितली गेलेली..) कथा ही बोधकथे सारखी असते..असं सांगून या शेवटच्या अध्यायाचा आणि एकंदर कथेचा समारोप मी केलेला आहे... आता..वरती या पाच अध्यायांचं जे काही विवेचन मी केलेलं आहे ते खाली दिलेल्या या दोन रेकॉर्डिंग वर आपल्याला ऐकायला मिळणार आहे..या पैकी एक प्रकार मराठी कथेचा..तर दुसरा हिंदी कथेचा आहे.. दोन्ही रेकॉर्डिंग..ही मी गेल्या सिझनमधे केलेल्या पूजांमधे केलेली आहेत (live आहेत..) त्यामुळे वर केलेल्या विवेचना प्रमाणे ती अगदी शंभर टक्के असतीलच असे नाही..(८० टक्के नक्की आहेत..) परंतू कथाभागातले बदल जसेच्या तसे (ठेवलेले)आहेत.. सर्व कथा बोली भाषेत आहेत.. मूळ कथेतले चमत्कार नाहीत..तसेच फापटपसाराही त्यात नाही..जे नको ,ते उडवलं किंवा बदललं आहे.आणि हवं किंवा असावं..ते घातलेलं आहे..याखेरीजंही जे बदल तुंम्ही सुचवाल सांगाल..ते यथामती यथायोग्य (यापुढे..) स्विकारले जातीलच.. तेंव्हा ..मि.पा.करांन्नो.. चला आता (या आत्मू भटाची.. ;) )
ऐका सत्य नारायणाssssची कथा!!!
१) मराठी कथा:- ही कथा सांगताना मोबल्या थोडा लांब होता..त्यामुळे शब्दश्रुती साठी जरा लक्षपूर्वक ऐकावी लागेल..क्षमस्व! http://mfi.re/listen/ibszayaiki3vm2d/satya_narayan_katha2.mp3 २) हिंदी कथा:- ही कथा एका बँकेत झालेल्या पूजेच्या वेळेची आहे..बँक नॉनमहाराष्ट्रीयन असल्यानी तिकडून आलेले त्यांचे हिंदी भाषिक साहेब्/उपसाहेब..यांच्या आग्रहानी मी ही हिंदित सांगितली आहे..(या रेकॉर्डिंगमधे..सुरवातीला थोडा प्रार्थनेचा भाग आलाय..नंतर लगेच कथा सुरु झालीये..ही कथा जास्त प्रासादिक आणि ठणठणीत शब्दात बद्ध झालेली आहे..मराठी पेक्षा ऐकाला सुरसही वाटेल..) http://mfi.re/listen/edbym84erbqw3po/hindi_satya_katha.ogg (कथा ऐकल्यानंतर साहेब असा आनंदून गेला..की त्यानी ती रेकॉर्ड केलेली कथा नंतर दिवसभर बँकेत अखंड लावली होती..माझ्या हिशोबी "हे" जरा जास्तच लाइव्ह झालं! :) ..असो.) ====================================================
दोन्ही कथाप्रकार ऐकून/ आस्वादून आपला अभिप्रायंही जरूर द्या . :)In reply to व्वा (१स्त) by टवाळ कार्टा
In reply to सुरेख हो आत्मुबुवा. by प्रचेतस
In reply to +१ by बॅटमॅन
In reply to +५ by नाखु
In reply to +१ by बॅटमॅन
In reply to लेख फार आवडला by मधुरा देशपांडे
In reply to स्तुत्य by राही
आपण जेंव्हा ही पूजा आपल्या गुरुजिंकडून कराल,तेंव्हा ही कथा तिथे लाऊन ऐका..तुमच्या गुरुजिंना मूळ कथा न सांगण्याबद्दल आनंदानी विनंती करामाझ काम थोडं पुढं सरकल्यासारखं होइल. :) @विरोधही झाला असेल. त्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक. >>> विरोध म्हणजे..सुरवातीच्या काळात झाला..पण त्याला माझी अविवेकी बोलण्याची पद्धत कारणीभूत होती.. (ते विरोधी मताचा मनावर पगडा पडलेले सुरवातीचे दिवस होते) पण नंतर आणि अगदी आजंही माझ्या लोकांमधे मी या वर्तवणूकीमुळे थोडा फेमस..पण बराचसा बदनाम आहे..मला अंनिसचा गुर्जी .. ब्रिगेडी हस्तक .. कट्टर सावरकरवादी(म्हणजे वेड लागलेला..) अशी टोपणनावं आहेत. (आमच्यातली..) माझ्यावर राग असलेली काही खास लोकं मला वावदूक आणि चार्वाक असेही म्हणतात. मी या सगळ्याकडे पूर्वी दुर्लक्ष करत होतो..ते आजही करतोच..पण नुकत्याच (गेल्या ५ वर्षातल्या..)व्यवसायात आलेल्या मुलांना हे सर्व नक्की काय आहे..हे पण सांगतो. आमच्यातले अनेकजण माझ्या विचारांचा धसका घेऊन त्यांची मत माझ्यासमोर मांडतच नाहीत.. ही मात्र वाइट गोष्ट आहे.. :( मी हे सर्व जास्तीत जास्त सकारात्मक करण्याच्या प्रयत्नात आजंही आहे..यापुढेही रहाणार.. बघू काय काय होतं ते! :)
In reply to @पण हे बदल इतर गुरुजींनी by अत्रुप्त आत्मा
In reply to +१ गुर्जी, आपल्याबद्दल आदर by हाडक्या
In reply to +१११११ by टवाळ कार्टा
In reply to मस्तच बुवा! लोकांचा काय by बोका-ए-आझम
In reply to @लोकांचा काय प्रतिसाद आहे by अत्रुप्त आत्मा
In reply to सस्केस रेट्च्या बाबतीत म्हणाल..तर तो अतीशय मंद आहे..... by मुक्त विहारि
In reply to @निदान आमच्या घरात तरी हे काल by अत्रुप्त आत्मा
In reply to आता खूद्द गुरुजींकडूनच हिरवा झेंडा मिळाला.... by मुक्त विहारि
In reply to गुर्जी by दिपक.कुवेत
In reply to गुर्जींच्या पोटावर पाय आणताय by हाडक्या
In reply to हो नाहीतर स्काईप आहेच. by खटपट्या
In reply to आणी RTGS/NEFT सुद्धा आहेच. by यसवायजी
In reply to गुर्जी ऑनलाईन सर्विसेस सुरु by हाडक्या
In reply to खूप छान. अशा गुरुजींची by खटपट्या
In reply to ज्जे बात गुर्जी... by अर्धवटराव
In reply to मानलं तुम्हाला.मलाही अशाच by भाग्यश्री कुलकर्णी
In reply to लेखनावरून हा माणूस एवढा हुशार by पाषाणभेद
In reply to कैच्या कै प्रतिसाद. by प्यारे१
In reply to “हर युग में बदलते धर्मों को” आदर्श बनवण्याची आपली करामत आवडली! by नरेंद्र गोळे
In reply to आत्मुस साष्टांग नमस्कार by स्पंदना
तरीही स्वतःच्या स्वर्थापल्याड जाऊन तुम्ही जे काही करता आहात त्याला तोड नाही.हेच्च आणि असंच म्हणायचंय मलाही. फक्त या गोष्टी स्वत: आचरणात आणतानाच तुम्ही बरोबरच्या दहा लोकांनाही जमेल तसं हे शिकवत रहा असं प्रामाणिकपणे सांगू इच्छितो.
आमच्याकडे पूजा सांगायला एक गुर्जी आला होता, चांगला पिकलेला होता, कथा सांगता सांगता त्याने आधुनिक महिलांच्या कपड्यावर, स्वयापाकावर आणि इतर अनेक गोष्टींवर फालतू शेरेबाजी केली, माझा तोंडपट्टा मोठ्या मुश्किलीने कंट्रोल केला होता, त्या दिवसानंतर आजपर्यंत कुठल्याही गुरुजीशी गुरुजी म्हणून संबंध ठेवलेला नाही, मित्र म्हणून बरेच आहेत.>>> हम्म्म... हे सनातन प्रभातवादी हल्ली भरपूर वाढले आहेत..त्यांना आपला स्वतःचा जन्म समाजाच्या धर्मप्रणीत-निती-उत्थानासाठी झालेला आहे..असा भ्रम झालेला असतो. मला असं वाटतं कि तुंमच्या सारख्यांनी असा आवश्यक विरोध ..(कार्यक्रम करवून घेतल्यानंतर आणि दक्षिणा देण्याआधी..) करायला हवा. तो तुमचा अधिकार देखिल आहे. कारण अश्या लोकांचा जागेवर बौद्धिक पराभव होणं आवश्यक असतं. आणि तो करविण्यात काहिच गैर नाही. @आता यापुढे कधी पूजा करण्याचा प्रसंग आला तर आधीसारखा कडाडून विरोध न करता, अनुमोदन देईन आणि 'गुरुजी मी शोधेन तोच' असंही सांगेन. फक्त किती दिवस आधी बुकिंग करायला लागतं ते सांगून ठेवा. इतक्या वर्षानंतर कुठल्या गुरुजीसमोर खाली वाकलोच नमस्कार करायला तर त्याला कारण तुम्हीच असाल. >> बदलाचा यथोचित परिणाम झाला..हे पाहून.., मि ही आपला अत्यंत आभारी राहू इच्छितो. :) .. खरच भरून पावलो आज! __/\__ आमच्या परंपरेच्या मागासपणाची माझ्या एकट्याकडून तरी का होइ ना? आवश्यक ती नविन भर घालून ..चालायला सुरवात झाली.. याची..अशी दखल-दिसत असेल...तर मग -हेच खरं प्रायःश्चित्त!!! :) ============
In reply to त्या "बघा देश बुडतो की नाही" by कैलासवासी सोन्याबापु
In reply to @गोपाळराव अन बळवंतरावांस by अत्रुप्त आत्मा
In reply to अहो आम्हाला कसला सलाम करताय by कैलासवासी सोन्याबापु
In reply to अहो आम्हाला कसला सलाम करताय by कैलासवासी सोन्याबापु
In reply to सत्य योग नारायणाची कथा by जयन्त बा शिम्पि
In reply to शिंचे by कपिलमुनी
In reply to शिंचे by कपिलमुनी
In reply to गुर्जी by बोका-ए-आझम
In reply to @(जितका जुना विधी तितकी by अत्रुप्त आत्मा
जे मनानी आधुनिक(होत) आहेत,ते उलट असा बदल मिळण्याची वाट पहात असतात..मनाने आधुनिक होणे म्हणजे ही सगळी कर्मकाण्डेच बंद करणे असा अर्थ होऊ शकत नाही का? --अत्मकुंथित प्रचेतस.
In reply to जे मनानी आधुनिक(होत) आहेत,ते by प्रचेतस
In reply to चान चान by अत्रुप्त आत्मा
In reply to चान चान by अत्रुप्त आत्मा
In reply to जे मनानी आधुनिक(होत) आहेत,ते by प्रचेतस
मनाने आधुनिक होणे म्हणजे ही सगळी कर्मकाण्डेच बंद करणे असा अर्थ होऊ शकत नाही का?गुरुजींच मत माहित नाही, ( कर्मकांडेच असावीत की नाही हा वेगळ्या वादाचा मुद्दा आहे त्याला मी येथे हात लावत नाही.) समजा बगाड नावाची परंपरा आहे त्यात व्यक्तीला इजा होणार नाही अशा पद्धतीने एखादी खुर्ची बसवावी असे मला वाटते त्या साठी संपूर्ण बगाड परंपरा बंदच केली पाहीजे असे नाही कर्मकांडात सुयोग्य बदल केले जाणे गरजेचे आहे. श्रीकृष्णाने इंद्र प्रवर्तीत शक्रपूजा बंद करून त्याच्या गुराखी बांधवांना पर्वत पूजन सुचवले (इती म.भा.खीलपर्व). हल्ली स्त्रीया पूजा करतात मुलींच्या मुंजी होतात हे कर्मकांडे बंड न करता मनाने जरासेतरी आधूनिक होण्याची उदाहरणे असावीत. रांगोळी काढणे हे कर्मकांड असू शकते किंवा कर्मकांडा वगळून बदलता येऊ शकणारी संस्कृती म्हणून त्यात बदलही करता येऊ शकतात. सत्यनारायण पूजा कथेतच मला बर्याचदा व्यवस्थापन शिक्षण पाँईट ऑफ व्ह्यू काही बदल करून आधूनिक पद्धतीने ही कथा पुर्नलेखीत करण्याची बर्याचदा इच्छा होते. संस्कृतीतील काही कर्मकांडे त्याज्य असू शकतात ती काळानुसार बदलावयास हवीत हे निश्चीत पण म्हणून संपूर्ण संस्कृती मोडीत काढण्याची गरज असते असेही नाही. भारतीय (हिंदू) संस्कृतीत कौटूंबीक परंपरा बदलण्याची दोन वेळा अधिकृत म्हणजे घरातील लग्नादी शुभकार्य प्रसंगानंतर अथवा घरातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर परंपरा बदलता येतात असे ऐकुन आहे जाणकारांनी अधिक माहिती द्यावी.
In reply to मनाने आधुनिक होणे म्हणजे ही by माहितगार
In reply to असाच काहीसा प्रतिसाद by प्रचेतस
असाच काहीसा प्रतिसाद गुर्जींकडून अपेक्षित होता पण त्यांनी नुसतं 'चान चान' म्हणून पळवाट काढली.@ गुर्जीं आमचं उत्तर जरा जरा पटलेलं दिसतय :) आम्ही तुमचे काम परभारे हलके केले असे झाले असल्या कै कमिशन डिस्काऊंट इत्यादी संधी आहे का ? :)
In reply to जे मनानी आधुनिक(होत) आहेत,ते by प्रचेतस
सगळी कर्मकाण्डेच बंद करणेपोटावर पाय देउ नकोस रे !
In reply to @(जितका जुना विधी तितकी by अत्रुप्त आत्मा
पण हे प्रमाण खुपच कमी आहे हे मात्र नक्की!तुमच्यासारख्या गुणांनी युक्त सहकार्यांची कमतरता जाणवतेय का? की या जागृतीत आपण कुठे कमी पडतोय असे वाटते का? . (मामा मिसळीपाशी कॅमेरामन न घेता मिपा तक चॅनेलकडून अभ्या.)
In reply to जियो गुरूजी.. by विशाल कुलकर्णी
In reply to जियो गुरूजी.. by विशाल कुलकर्णी
(तुम्ही माझ्याकडे केलेली पुजा ही शेवटची पुजा होती. ती सुद्धा पुजेच्या कर्मकांडावर नसला तरी देव किंवा ती जी काही आपल्या आकलनाशक्तीच्या पलीकडे असलेली शक्ती आहे तिच्यावर मन:पूर्वक विश्वास आहे म्हणूनच. आणि तुमच्याबद्दल, तुमच्या पुजेबद्दल ऐकून असल्याने घरातली शेवटची पुजा एका योग्य 'माणसा'च्या हातून व्हावी ही इच्छा होती म्हणूनच तुम्हाला बोलावले होते. तुम्हाला आठवत असेलच)होय.आठवतं आहे. __/\__
In reply to हिन्दू धर्मातील कर्मकांडे by हेमंत लाटकर
In reply to काय हो, आता मुंज करणे मला पटत by संदीप डांगे
In reply to तस नाही डांगे साहेब, by अत्रुप्त आत्मा
In reply to येवढाच चिखल आहेत तर त्या by सूड

व्वा (१स्त)