(पाठ शिवा हो पाठ शिवा)
लेखनविषय:
पाठ शिवा हो पाठ शिवा
वार्धक्यातही वाघ रडवला
डाव टाकूनि नवा नवा
बन कमळांचे मुदित* सापळे
लपायास मज असे मोकळे
सत्तांधाला काय का कधी
शिवाशिवीचा खेळ नवा?
टिकटिकविरहित जरी तव पाऊल
अचूक मला पण लागे चाहूल
कित्येकांची चळते बुद्धी
तुझ्या ऐकता पायरवा
उमटू न देईन साद पाऊली
सर्रकन जाईन जशी सावली
सामावून मज घेईल अलगद
हा कमळांचा उभा थवा
मालकी घेशील परी कशाची
तुझ्या पदांची तुझ्या यशाची
पाठलाग मग कुठे संभवे
महाराष्ट्र जर तुला हवा !! ;)
*मोद-मोदी-मुदित
वाचने
5565
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
है....................फटका एकदम! ;)
सौ सुनार की....
जियो!!!
मान गये !!!
फार वाईट वाटतयं अन डोक उठलयं.
शिवसेनेला खरच अक्कल नाही. एव्हध मिळाल होतं बहुमत तर सत्तेत बसुन दाखवायच होतं, काय मिळणार आहे टेबल बडवुन देव जाणे.
आवडली !!!
टिकटिकविरहित जरी तव पाऊल अचूक मला पण लागे चाहूल कित्येकांची चळते बुद्धी तुझ्या ऐकता पायरवा उमटू न देईन साद पाऊली सर्रकन जाईन जशी सावली सामावून मज घेईल अलगद हा कमळांचा उभा थवालई म्हंजे लई बेष्ट!!!
झकास
आवडेश एकदम
मस्तच...
मातोश्रीवर जमले सगळे
फसलेल्या बैठकीतले हे मावळे ?
कोण कुठला अफजलाखान तो
कात्रजात सापडलेल्यांना समजेना... ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnershipआहा!!! मस्ताड बे एकदम.
हाय्च्च्य्यान कडक ! मस्त !
शॉलिट्ट कवन!
कुणीतरी व्याघ्रसैनिक हे वाचतायत का?
अरे कुठे नेऊन ठेवलीये आमची व्याघ्रसेना? डरकाळी विझली, उरलाय नुसता आक्रस्ताळेपणा!!
सगळ्या बातम्या वाचून जाम डोकं उठलंय. जबरदस्त लिहिलंस, पण हे ज्यांच्यापर्यंत पोचायला हवं ते डोळे झाकून गप बसलेत सगळे!
कविता आवडली.
सद्यस्थितीवर अचुक भाष्य !!!
मस्त!
सद्यस्थितीला चपखल !
कविता आवडली.
आवडलं.
है....................फटका