दर्शनतेचा प्रत्यय यावा अशी लेखणी चालावी,
सहजाच्या अलगद वार्याने रूपातुनं ती बोलावी.
सांगायाचे जे जे असते शब्दातुनं ते समजावे,
काव्य जरी ते ना ठरले तरी अर्थातुन ते तोलावे.
विषय शब्द तो साचा साधा प्रतिमांची बळंजोरी नको,
माळेची गुंफण असू दे ती करं-कचलेली दोरी नको.
कुणी म्हणो तिज काव्य/मुक्तिका कुणी म्हणो तिज रचना ही,
कुणी म्हणो तिज शेरं-शायरी कुणी म्हणो तिज काहिही!
काव्याचे हे मर्म असे की भिडल्या वाचुन मुक्ति नव्हे!
भिडण्यास्तव ते करता यावे अशी कोणती युक्ति नव्हे!!!
काव्याच्या या शाळेमधला कायमचा मी विद्यार्थी,
कळले इतुके जितुकी झाली शाळा माझी त्या अर्थी.
धडा कधी हा संपत नाही कैसे मजला मी सांगू???
समजो तेंव्हा तसे बापडे चला आज येथे थांबू. :)
=================================
अतृप्त..
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6696
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगलीय !! आवडली !!
विषय शब्द तो साचा साधा
वा गुरूजी आज चांगलीच मारलीय
धन्यवाद हो पा.भे.
In reply to वा गुरूजी आज चांगलीच मारलीय by पाषाणभेद
सुरेख कविता ओ गुर्जी.
हे कडवे..
जिल्बी कवीहीवाचतील. मूळ अवांतर. बुवांचे स"कस" काव्या बद्दल अभिनंदन.अगदी असेच म्हणतो.
In reply to हे कडवे.. by नाखु
बुवा....१२०-३०० चांगलंच रंगलंय...मजा आली
दर्शनतेचा प्रत्यय यावा अशी
धन्यवाद हो पा.भे.
पाभेंच्या आभाराचा सपाटा लावलाय का ओ गुर्जी?
In reply to धन्यवाद हो पा.भे. by अत्रुप्त आत्मा
गोंधळाचे राजकारण!
In reply to पाभेंच्या आभाराचा सपाटा लावलाय का ओ गुर्जी? by माम्लेदारचा पन्खा
तुमच्या नेहमीच्या धाटणीच्या
+१
In reply to तुमच्या नेहमीच्या धाटणीच्या by सूड
@तुमच्या नेहमीच्या धाटणीच्या
In reply to तुमच्या नेहमीच्या धाटणीच्या by सूड
>>आपल्या प्रतिसादावरूनंही तेच
In reply to @तुमच्या नेहमीच्या धाटणीच्या by अत्रुप्त आत्मा
अपेक्षित !
In reply to >>आपल्या प्रतिसादावरूनंही तेच by सूड
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- L&T Info to hire joint CEOs by month end; but all decisions funnelled through AM Naikआवडली कविता!
आवडली
सुंदर !!!!
कविता आवडली...
झक्कास ।।।
कविता आवडली
@ मात्र दर्शनता या शब्दाशी
In reply to कविता आवडली by पैसा
क्या बात .. क्या बात .. क्या