मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बरळप्रहरी..

गवि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
हातात आहे ग्लास आणि सर्वकाही सत्य आहे बहरत्या या बरळप्रहरी सर्वकाही शक्य आहे फेसाळती शाम-ए-गझल अन बेगडीसा सूर आहे आज सच्ची काहीबाही वाहवाही शक्य आहे अधभरा अन अधरिकामा जीवनाचा जाम आहे याच प्रहरी भाडखाऊ फलसफाही शक्य आहे और जामे-आरजू गर मुठ्ठिमध्ये घट्ट आहे बाकी सारे मिथ्य कहेना या प्रवाही शक्य आहे यकृताच्या गाळणीला कुछ पलांचे काम आहे याचवेळी काव्य काही अर्थवाही शक्य आहे

वाचने 6561 वाचनखूण प्रतिक्रिया 20

स्वप्नज 05/11/2014 - 12:55
>>>>>यकृताच्या गाळणीला कुछ पलांचे काम आहे याचवेळी काव्य काही अर्थवाही शक्य आह क्या बात.....!

यकृताच्या गाळणीला कुछ पलांचे काम आहे याचवेळी काव्य काही अर्थवाही शक्य आहे हे विषेश आवडले पैजारबुवा,

मारवा 05/11/2014 - 15:08
अगदि खर विचारल मला एक शंका होती गवि निबंध नाही लिहु शकणार म्हणजे प्रकृतीला सुटेबल नाही म्हणुन. परंतु वरील कविता वाचली आणी माझी खात्री झाली गवि कुठलाही फॉर्म हाताळु शकतात ली....ल.....या.... उदा. त्यांना कोणी नितंब हा विषय दिला निबंधा साठी तरी बघा एक झकास निबंध ते लिहुन देतात की नाही. सुरुवात थोडी नॉस्टॅल्जीक करतील स्वभावाप्रमाणे म्हणजे थोडीशी अशी एक काळ होता आमच बुड टेकायच सहजच जुन्या अ‍ॅटलस च्या आखुड सीट वर आणि आम्ही सहज शेअर करायचो शाळेत एका बाकड्यावर च तीन बुड. पर अब वो बात नही रही और अब ये आलम है की तशरीफं टिकती नही हमारी ... गवि कविता जबराट आवडली !!! (सहज गंमत जंमत केली कृपया रागावु नका आदरवाइज घेउ नका )

आयुर्हित 05/11/2014 - 22:18
"बरळप्रहर" एक नवीन प्रहर जन्माला घातल्या बद्दल आभार. आता गविंना "प्रहरपिता" म्हणून संबोधनात यावे. आजपासून संपूर्ण दिवसात(अहोरात्र) ९ प्रहर राहतील याची सर्व पंचांगकर्ते व ज्योतिषी यांनी नोंद घ्यावी. संगीत तज्ञांनो या नवीन प्रहरासाठी कोणकोणते राग गावेत हे स्पष्ट करावे! गजल फारच छान जमली आहे.

psajid 06/11/2014 - 14:43
"यकृताच्या गाळणीला कुछ पलांचे काम आहे याचवेळी काव्य काही अर्थवाही शक्य आहे" अर्थात घेतल्याने सर्व शक्य आहे आधी घेतलेची पाहिजे हेच खरं ! पण काहीही असू दे गझल आवडली !