Skip to main content

पंचप्राण

लेखक चलत मुसाफिर यांनी बुधवार, 29/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
ती नसेल तर होईल आर्त एक कल्लोळ झपाटलेल्या पिंपळावर विरहविजेचा लोळ ती नसेल तर होईल विरक्त जीवनगाणे बैराग्याच्या थाळीतले भकास पै-आणे ती नसेल तर होतील प्रश्नच अंतर्धान जपून ठेवेन मुठीत विझते पंचप्राण
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2645
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

कविता आवडली. बाकी - ती कोण, कुठे भेटली, जपून ठेवेन मुठीत विझते पंचप्राण दुसर्या कुणाची वाट पाहण्यासाठी, अनेक प्रश्न येतात मनी. *man_in_love* *IN%%_%%LOVE* *IN LOVE*

In reply to by विवेकपटाईत

बायको नियमितपणे आंतरजालावर संचार करत असते. त्यामुळे आपल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. माफी असावी. :) :)

छान.

चांगलीय !! "ती"ने वाचली पाहीजे पण !!